चालू घडामोडी (29 डिसेंबर 2016)
दिल्लीच्या नायब राज्यपालपदी अनिल बैजल :
- दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांचा राजीनामा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वीकारला.
- जंग यांच्या जागी दिल्लीचे नायब राज्यपाल म्हणून माजी प्रशासकीय अधिकारी अनिल बैजल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- आपल्या पदाचा दीड वर्षांचा कार्यकाळ शिल्लक असतानाच जंग यांनी 22 डिसेंबर रोजी राजीनामा दिला होता. यानंतर पुन्हा शिक्षण क्षेत्राकडे वळण्याचा त्यांचा मानस आहे.
- 1969 च्या बॅचमधील ‘आयएएस’ अधिकारी असलेले बैजल 2006 मध्ये केंद्रीय नगरविकास मंत्रालयाचे सचिव म्हणून निवृत्त झाले.
- ‘जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण अभियान’ (जेएनएनयूआरएम) या मोहीमेची संकल्पना आणि अंमलबजावणीत बैजल यांचा मोलाचा वाटा होता.
विरल आचार्य रिझर्व्ह बँकेचे नवे डेप्युटी गव्हर्नर :
- रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी अर्थशास्त्राचे प्राध्यापक विरल आचार्य यांची नेमणूक करण्यात आली आहे.
- देशाचे पतधोरण निश्चित करताना आता आर. गांधी, एस. एस. मुंदडा व एन. एस. विश्वनाथन यांच्यासमवेत आचार्य यांचादेखील सहभाग असणार आहे.
- ऊर्जित पटेल यांची गव्हर्नरपदी नेमणूक झाल्यानंतर रिक्त झालेल्या डेप्युटी गव्हर्नरपदी आचार्य यांची नियुक्ती झाली आहे.
- रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्याप्रमाणे विरल यांना शैक्षणिक पार्श्वभूमी लाभलेली आहे.
- न्युयॉर्क युनिव्हर्सिटी स्टर्न स्कुल ऑफ बिझनेस येथे 2008 सालापासून अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
- बँका आणि वित्तीय संस्था आणि कॉर्पोरेट कर्जाचे मूल्यांकन यासारख्या विषयांमध्ये आचार्य यांनी संशोधन केले आहे.
चीनने उभारलेल्या अणुप्रकल्पाचे उद्घाटन :
- पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी 340 मेगावॅट ऊर्जानिर्मिती करणाऱ्या अणुऊर्जाप्रकल्पाचे 28 डिसेंबर रोजी उद्घाटन केले.
- पाकिस्तानातील मिआनवली जिल्ह्यात या अणुप्रकल्पाचे ठिकाण असून चष्मा 3 असे या प्रकल्पाला नाव देण्यात आले आहे.
- पाकिस्तान ऍटोमिक एनर्जी कमिशन (पीएईसी) व चायना नॅशनल न्यूक्लिअर कॉर्पोरेशन (सीएनएनसी) यांच्या संयुक्त भागीदारीतून हा अणुऊर्जा प्रकल्प साकारण्यात आलेला आहे.
- तसेच आगामी वर्षामध्ये चष्मा 3 च्या धर्तीवर सी 4 प्रकल्प उभारणी करण्यात येणार आहे.
चित्ता ही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर :
- ताशी सुमारे 110 ते 120 किलोमीटर वेगाने धावणारा, सर्वांत वेगवान आणि चपळ प्राणी म्हणून ओळखला जाणारा चित्ता नामशेष होण्याच्या मार्गावर असून, संपूर्ण जगामध्ये आता केवळ 7100 चित्ते उरले असल्याचे एका नव्या संशोधनात समोर आले आहे.
- सध्या ‘असुरक्षित’ (vulnerable) म्हणून गणल्या जाणाऱ्या चित्त्याचे वर्गीकरण ‘धोक्यात असलेला, चिंताजनक’ असे करणे आवश्यक आहे. चित्त्यांची संख्या वेगाने कमी होत आहे.
- आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनेच्या वतीने धोक्यात आलेल्या प्रजातींची यादी तयार करण्यात येते. त्यामध्ये चित्ता सध्या ‘असुरक्षित’ या वर्गामध्ये आहे. त्याला आता ‘चिंताजनक’ (endangered) म्हणून गणना करण्याची आता वेळ आली आहे, असे संशोधकांनी म्हटले आहे.
- चित्त्यांच्या ऐतिहासिक रहिवासापैकी आतापर्यंत 91 टक्के रहिवास संपुष्टात आला आहे. एकेकाळी संपूर्ण आफ्रिका आणि आग्नेय आशियामध्ये चित्त्यांचा रहिवास विस्तारलेला होता.
- चित्ता आशिया खंडातून तर आता अदृश्यच झाला आहे. माणूस आणि वन्यजीव यांच्यातील जमीन धारणा आणि इतर धोक्यांची गुंतागुंत वाढल्याने चित्त्यांवर हा विपरीत परिणाम झाला आहे.
गुरुग्राममध्ये धावणार देशातील पहिली कॅटरपिलर ट्रेन :
- हरियाणामध्ये देशातील पहिली कॅटरपिलर ट्रेन धावणार आहे. प्रवासी वाहतूक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी गुरुग्राममध्ये कॅटरपिलर ट्रेनची सुविधा सुरू करण्यात येणार आहे.
- विशेष म्हणजे कॅटरपिलटर रेल्वेचे डिझाईन भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याने तयार केले आहे.
- तसेच यासाठी भारतीय रेल्वेतील अधिकाऱ्याला अमेरिकेतील एमआयटीचा पुरस्कारदेखील मिळाला आहे.
- हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी त्यांच्या कार्यालयाला कॅटरपिलर ट्रेनच्या प्रकल्पात प्राधान्याने लक्ष घालण्यास सांगितले आहे.
- अश्वनी उपाध्याय या रेल्वे अधिकाऱ्याने इमिल जेकब यांच्या मदतीने कॅटरपिलर ट्रेनची संकल्ना विकसित केली.
- कॅटरपिलर ट्रेनचे वजन कमी असते. ही ट्रेन मेट्रो किंवा मोनोरेलसारखी असते. एका कॅटरपिलर ट्रेनच्या रुळांवरुन दुसरी ट्रेनदेखील जाऊ शकते.
- एक ट्रेन रुळांवरुन जात असताना दुसरी ट्रेन रुळांच्या खालील बाजूने जाऊ शकते, हे कॅटलपिलर ट्रेनचे वैशिष्ट्य आहे. तसेच 100 किलोमीटर प्रतितास वेगाने कॅटरपिलर ट्रेन धावू शकते.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा