Current Affairs of 29 June 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (29 जून 2016)

ऑस्ट्रेलियातील बांधकाम कंपनीचे भारतासोबत करार :

  • मुंबईत किरकोळ आणि आतिथ्य विकास प्रकल्प विकसित करण्यासाठी ऑस्ट्रेलियातील एका प्रमुख बांधकाम कंपनीने भारतीय कंपनीसोबत 169.5 दशलक्ष डॉलरचा करार केला आहे.
  • सीआयएमआयसी समूहातील कंपनी लेटन एशियाने आपली सहयोगी लेटन इंडिया कॉन्ट्रॅक्टर्सद्वारे मुंबईत मेकर मॅक्सिटी प्रकल्पाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी समझोता केला.
  • तसेच हे प्रकल्प पूर्ण करण्याने लेटन एशियाला 169.5 दशलक्ष डॉलरचे उत्पन्न होईल.
  • प्रमुख किरकोळ आणि आतिथ्य केंद्र बनविण्याची ही योजना आहे.
  • लेटन एशियाचे व्यवस्थापकीय संचालक मॅन्युएल अल्वारेज मुनोज म्हणाले की, मेकर समूहाशी मिळून आम्ही पहिला मोठा प्रकल्प करीत आहोत.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (28 जून 2016)

प्राध्यापकांच्या निवृत्ती वयात बदल :

  • राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्रात कार्यरत अध्यापकीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 62 वर्षे करण्याबाबत 2011-12 दरम्यान घेण्यात आलेल्या निर्णयांचा पुनर्विचार करून त्यांच्या सेवानिवृत्तीचे वय आता 60 वर्षे करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिपरिषदेच्या बैठकीत घेण्यात आला.
  • तसेच प्राचार्यांच्या सेवानिवृत्तीचे वय सरसकट 65 वर्षे करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
  • राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील शासकीय संस्था तसेच महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाशी संलग्नीत शासकीय तंत्र महाविद्यालये, पदविका संस्था आणि महाविद्यालयांमधील अध्यापकांच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीचे वय यापूर्वी म्हणजे 2011-12 दरम्यान 58 वरून 62 वर्षे करण्यात आले होते.
  • त्याचप्रमाणे अकृषी विद्यापीठे, तंत्रशास्त्र विद्यापीठे व संलग्नीत अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील शिक्षक, ग्रंथपाल, उपग्रंथपाल, सहायक ग्रंथपालतसेच संचालक, उपसंचालक व सहायक संचालक, शारीरिक शिक्षण यांच्या सेवानिवृत्तीचे वय 60 वरून 62 वर्षे करण्याबाबतही यापूर्वी निर्णय घेण्यात आला होता.
  • या सर्व निर्णयांचा पुनर्विचार करून त्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विश्वनाथन आनंद यांना डॉक्टर ऑफ सायन्स उपाधी :

  • चौषष्ट घरांचा राजा आणि भारताचा पहिला ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याला (दि.28) आयआयटी कानपूरने 49 व्या दीक्षान्त सोहळ्यात डॉक्टर ऑफ सायन्स ही उपाधी दिली.
  • आयआयटी सीनेटच्या वतीने आनंदला या उपाधीने गौरविण्यात आले.
  • या कार्यक्रमादरम्यान आनंदने विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की, 1998 साली मी भारताचा पहिला ग्रँडमास्टर बनलो, परंतु तरीही मी शिकत राहिलो. मी त्यानंतर जागतिक विजेतेपद या माझ्या पुढील लक्ष्याच्या दिशेकडे वाटचाल केली.
  • तसेच तुम्ही देखील पदवीधर म्हणून बाहेर जाणार आहात. खूप आनंद साजरा करा, परंतु, आपल्या आयुष्यातील पुढील लक्ष्याचाही विचार करत रहा.
  • आजही मी बुध्दिबळाच्या बाबतीत अधिकाधिक गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो.
  • कारण, आपण जे काही शिकतो किंवा जे काही ज्ञान घेतो, ते कधीही वाया जात नाही.

‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डाउन टाउन’ तर्फे आई महोत्सव :

  • ‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डाउन टाउन’‘पॉल पेरापिल्ली परिवारा’तर्फे रिटा पॉल यांच्या स्मरणार्थ नुकताच आई महोत्सव घेण्यात आला.
  • तसेच या कार्यक्रमात प्रतिकूल परिस्थितीत मुलांना वाढवलेल्या नऊ मातांचा सत्कार करण्यात आला.
  • डॉ. अरुण पाटील यांची संकल्पनेतून हा महोत्सव सावित्रीबाई फुले नाट्यगृहात झाला.
  • माजी पोलीस आयुक्त भुजंगराव मोहिते, पॉल पेरापिल्ली, निखित धूत यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आले.
  • शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, स्मृतिचिन्हाबरोबर साडी, डॉ. पाटील यांचे ‘वाचाल तर वाचाल’ हे पुस्तक, ज्योती साठवणे यांच्यातर्फे ‘गोलघुमट’ पुस्तक, पापरी भौमिकतर्फे भेटवस्तू त्यांना देण्यात आल्या.

अजिंक्य पाटीलला आऊटस्टँडिंग स्टुडंट पारितोषिक :

  • न्यूयॉर्क सिटीमधील ब्रॉडवे डान्स सेंटर संस्थेत सहा महिन्यांपूर्वी नृत्य दिग्दर्शकाचे धडे गिरवण्यासाठी गेलेल्या उरण तालुक्यातील बोकडविरा गावच्या अजिंक्य पाटील याने आऊटस्टँडिंग स्टुडंट पारितोषिक पटकावले आहे.
  • अजिंक्य पाटील या उरण तालुक्यातील 25 वर्षांच्या तरुणाला आंतरराष्ट्रीय हॉलीवूडमध्ये ख्याती असलेल्या अमेरिकेतील न्यूयॉर्क सिटीमधील ब्रॉडवे डान्स सेंटर संस्थेने नृत्य दिग्दर्शकाचे धडे गिरविण्यासाठी आमंत्रित केले होते.
  • सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी अजिंक्य पाच महिन्यांपूर्वी न्यूयॉर्क सिटीकडे गेला आहे.
  • नृत्य प्रशिक्षणाची आवड असल्याने 2010 साली अजिंक्यने देशातील बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक शामक डावर यांच्याकडे नृत्याचे धडे गिरवले.
  • अ‍ॅकॅडमीत नृत्याचे धडे देण्याबरोबरच मुंबई, नवी मुंबई, पनवेलमध्येही काही संस्थांमध्ये नृत्य प्रशिक्षणाचे धडे देणाऱ्या संस्थेतील विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन देण्याचेही काम केले.

दिनविशेष :

  • नेदरलँड सैनिक दिन.
  • 1871 : श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, प्रसिध्द नाटककर, साहित्यिक व विनोदी लेखक यांचा जन्म.
  • 1976 : सेशेल्सला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (30 जून 2016)

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

2 years ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

2 years ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago