चालू घडामोडी (29 मे 2017)
सीबीएसई बारावीत रक्षा गोपाल देशात प्रथम :
- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा घेतलेल्या इयत्ता 12 वीच्या परीक्षेत देशभरातील 10 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांमधून प्रथम येण्याचा मान दिल्लीच्या रक्षा गोपाल या विद्यार्थिनीने तब्बल 99.6 टक्के (500 पैकी 498) गुण मिळवून पटकाविला आहे.
- चंदीगडची भूमी सावंत-डे या विद्यार्थिनीने 500 पैकी 497 गुण मिळवून दुसरे स्थान मिळविले आणि 500 पैकी 496 एवढे समान गुण मिळालेल्या आदित्य जैन व मन्नत लुथ्रा या दोघांनी देशात तिसरे स्थान पटकावले आहे.
‘जीएसएलव्ही एमके-3’च्या उड्डाणासाठी इस्रो सज्ज :
- ‘भारताच्या भूमीतून भारतीयाला अवकाशात नेऊ शकणारे भारतीय रॉकेट’ असे वर्णन केल्या जाणाऱ्या ‘जीएसएलव्ही एमके-3’ या रॉकेटच्या उड्डाणासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) सज्ज असल्याचे या संस्थेचे संचालक किरणकुमार यांनी सांगितले. पुढील आठवड्यात आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा या प्रक्षेपण केंद्रावरून हे प्रक्षेपण होणार आहे.
- ‘जीएसएलव्ही एमके-3’ हे भारताने आतापर्यंत तयार केलेले सर्वांत अवजड रॉकेट असून, सर्वांत अवजड उपग्रह अवकाशात वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे.
- तसेच याव्दारे अवजड उपग्रह प्रक्षेपणाच्या अब्जावधी डॉलरच्या बाजारात प्रवेश करण्यास ‘इस्रो’ सिद्ध आहे. या रॉकेटची पुढील आठवड्यात होणारी चाचणी यशस्वी झाल्यास पुढील दशकभरात याच रॉकेटव्दारे भारतीय अवकाशवीर अवकाशात जाऊ शकेल.
यदू जोशी यांना ‘रंगाअण्णा वैद्य’ पुरस्कार जाहीर :
- सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा पत्रमहर्षी रंगाअण्णा वैद्य स्मृति राज्यस्तरीय पुरस्कार यदू जोशी यांना जाहीर झाला आहे.
- स्व. बाबुराव जक्कल स्मृति जिल्हास्तरीय पुरस्कार पत्रकार संजय पाठक यांना दिला जाणार असल्याची माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी दिली़.
- 25 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे राज्यस्तरीय पुरस्काराचे स्वरूप आहे. तर 15 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे जिल्हास्तरीय पुरस्काराचे स्वरूप आहे.
संरक्षण क्षेत्रात ‘पब्लिक प्रायव्हेट’ पार्टनरशिप सर्वोत्तम :
- संरक्षण क्षेत्रामध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी संरक्षण साहित्य आणि शस्त्रास्त्रांची निर्मिती देशामध्येच झाली पाहिजे, यावर भर देण्यात आला आहे.
- संशोधन आणि संरक्षण उपकरणांचे उत्पादन या दोन बाबी महत्त्वाच्या आहेत.
- परदेशातील ज्ञानावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वयंपूर्णतेवर भर देण्यात आला आहे. यासाठी संरक्षण क्षेत्रात ‘पब्लिक प्रायव्हेट’ पार्टनरशिप हा सर्वोत्तम पर्याय आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी केले.
- ‘डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी’ (डीआयएटी) अभिमत विद्यापीठाच्या नवव्या पदवी प्रदान समारंभात जेटली बोलत होते.
तुरनोई सॅटेलाइट स्पर्धेत भारताच्या भवानीदेवीला सुवर्णपदक :
- भारताच्या सी.ए. भवानीदेवी हिने आइसलँड येथील रेकजाविक येथे झालेल्या तुरनोई सॅटेलाइट तलवारबाजी स्पर्धेत सायबर प्रकारात सुवर्णपदक जिंकले.
- 27 मे रोजी झालेल्या अंतिम फेरीत सी.ए. भवानीदेवी हिने ग्रेट ब्रिटनच्या सारा जेन हॅम्पसन हिचा 15-13 असा पराभव केला.
- चेन्नईच्या या महिला खेळाडूने उपांत्य फेरीत ब्रिटनची एक अन्य खेळाडू जेसिका कोरबी हिला 15-11 अशा फरकाने नमवले होते.
- तसेच त्याबरोबर भवानीदेवी ही आंतरराष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय बनली आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा