चालू घडामोडी (29 नोव्हेंबर 2015)
आगामी तीन महिन्यांत देशात 35 शहरांत सैनिकांची निवड :
- पुढील तीन महिन्यांत देशात सुमारे 35 ठिकाणी लष्कर भरती मोहीम राबविली जाणार असून, त्यांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.
- डिसेंबर महिन्यात राज्यात भरती मोहीम नसली, तरी नवीन वर्षात नागपूर आणि कोल्हापूर येथे भरती होणार आहे.
- डिसेंबर महिन्यात आठ भरतीप्रक्रिया राबविल्या जाणार आहेत. त्यात महाराष्ट्रात मात्र एकाही ठिकाणी भरती नाही.
- पुणे-जामनगर विभागाची येत्या 10 डिसेंबरला जामनगर (गुजरात) येथे भरती होईल. तसेच 10 ते 13 डिसेंबर असे तीन दिवस प्रक्रिया चालेल. त्यात साधारण जामनगर, पोरबंदर, राजकोट, अमरेली, भावनगर, जुनागड, सुरेंद्रनगर, कूच, गिर सोमनाथ, मोरंबी, देवभूमी, द्वारका आदी जिल्हे यावर भर आहे.
- येत्या जानेवारीत नागपूरला 6 ते 25 तारखेला भरती आहे. नागपूर, वर्धा, वाशीम, अमरावती, बडनेरा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला, यवतमाळ जिल्ह्यांतील युवकांसाठी भरती आहे.
- याशिवाय जालंधर-पातियाळा संगूर येथे 4 ते 10 जानेवारी, जयपूर झोनतर्फे 4 ते 14 जानेवारीला जयपूरला, चेन्नईला काकीनाडा येथे 5 ते 14 जानेवारी, मुजफ्फरपूरला 5 ते 15 जानेवारी आणि पुन्हा 2 ते 13 मार्चला भरती आहे.
- वाराणसी झोनतर्फे गोरखपूरला 5 ते 19 जानेवारीला, बेंगळूर झोनतर्फे बरेली येथे 6 ते 10 जानेवारीला, मिझोराम झोनतर्फे 20 ते 24 जानेवारीला ऐजावाल येथे, अंबाला हमीरपूर येथे 28 जानेवारीला, कोलकता येथील बीरभूमी येथे जानेवारीच्या अंतिम आठवड्यात भरती आहे.
महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनावर “सत्यशोधक” चित्रपट :
- थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनावर “सत्यशोधक” हा चित्रपट येत आहे. त्यात अभिनेता संदीप कुलकर्णी महात्मा फुले यांच्या भूमिकेत तर लवकरच चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.
- “समता फिल्म्स” या बॅनरखाली दिग्दर्शक व लेखक नीलेश जळमकर या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.
- त्यांचा “महानायक” चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जीवनप्रवास या चित्रपटात रेखाटण्यात आला आहे.
- “डोंबिवली फास्ट”, “श्वास”, “मेड इन चायना”, “अधांतरी”, “प्रेमसूत्र”, “साने गुरुजी” आदी चित्रपटांत विविध प्रकारच्या भूमिका साकारणारे अभिनेते संदीप कुलकर्णी फुले यांच्या भूमिकेत आहेत.
- त्यांच्या 125 वी पुण्यतिथी दिवशी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली.
सीमा सुरक्षा दलातही प्रथमच महिलांना अधिकारी :
- हवाई दलात फायटर पायलट म्हणून महिलांना सामावून घेण्याच्या ऐतिहासिक निर्णयापाठोपाठ आता सीमा सुरक्षा दलातही प्रथमच महिलांना अधिकारी म्हणून सहभागी करून घेतले जाणार आहे.
- पुढील वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) येथील टेकनपूरच्या “बीएसएफ” ऍकॅडमीत महिलांची पहिली तुकडी प्रशिक्षणार्थी म्हणून सहभागी होणार आहे.
- “बीएसएफ”च्या स्थापनेला एक डिसेंबर रोजी पन्नास वर्षे पूर्ण होत असून, आपल्या सुवर्णमहोत्सवी वर्षात महिलांना दलात सहभागी करून घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
- पारंपरिक वैद्यकीय आणि कारकुनीसारखी केवळ नोकरी न करता महिलांना युद्धभूमीवर प्रत्यक्ष लढण्यासाठी संधी दिली जाणार आहे.
- 2008 मध्ये बीएसएफमध्ये 745 महिलांना हवालदार (कॉन्स्टेबल) म्हणून भरती करण्यात आले होते. आता मात्र अधिकारी म्हणून सामावून घेतले जाणार आहे.
नागपूर महापालिकेचा वाहतूक धोरणाला पहिला क्रमांक :
- नागपूर महापालिकेने दिल्लीत अर्बन मोबिलिटी प्रदर्शनात सादर केलेल्या वाहतूक धोरणाला पहिला क्रमांक मिळाला.
- ग्रीन बसवर आधारित धोरणाचे सादरीकरण आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केंद्रीय नगर विकास विभागातील अधिकारी तसेच जागतिक बॅंकेच्या प्रतिनिधींपुढे केले.
- उत्तम वाहतूक धोरणाच्या स्पर्धेत देशातील 40 महापालिकांचा समावेश होता. आता नागपूर महापालिकेच्या धोरणाचे सादरीकरण वॉशिंग्टनमध्ये होणार असल्याचे मनपातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले.
फेसबुकने केला मातृत्व आणि पितृत्व रजेचा विस्तार :
- सोशल मीडिया कंपनी फेसबुकने मातृत्व आणि पितृत्व रजेचा विस्तार करत आता अमेरिकेच्या बाहेर इतर देशांत कार्यरत पूर्णवेळ कर्मचाऱ्यांनाही याचा लाभ देण्याची घोषणा केली आहे.
- कंपनीच्या मनुष्यबळ विभागाचे प्रमुख लॉरी मटलोफ गोलेर यांनी फेसबुकवर ही घोषणा केली.
- तत्पूर्वी फेसबुकचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी ते दोन महिन्यांची पितृत्व रजा घेणार असल्याचे घोषित केले होते.
- कंपनी सध्या अमेरिकेत कार्यरत कर्मचाऱ्यांनाच चार महिन्यांची पगारी मातृत्व व पितृत्व रजा देते. मात्र नव्या घोषणेमुळे अमेरिकेबाहेरील कर्मचाऱ्यांनाही या सुविधेचा लाभ मिळेल.
- नव्या धोरणांनुसार, अमेरिका आणि इतर देशांत कार्यरत कंपनीच्या सर्व महिला व पुरुष कर्मचाऱ्यांना येत्या एक जानेवारीपासून चार महिन्यांची पगारी पितृत्व व मातृत्व रजा देण्यात येईल. याशिवाय आधीपासूनच सुरू असलेल्या मातृत्व रजेची सुविधाही सुरू राहील.
पॅरिस येथील चर्चेत 150 देशांचे राष्ट्रप्रमुख सहभागी होणार :
- पॅरिस येथील चर्चेत 150 देशांचे राष्ट्रप्रमुख सहभागी होणार मानवजातीचे भवितव्य ठरविणाऱ्या हवामानबदलाविरोधात पूर्ण ताकदीनिशी एकवटत 150 देशांचे
- राष्ट्रप्रमुख पॅरिस येथे भरणाऱ्या जागतिक परिषदेला सोमवारी हजेरी लावणार आहेत.
- सहा वर्षांपूर्वी कोपनहेगन येथे भरलेल्या परिषदेनंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असून आता हरितगृह वायूंच्या उत्सर्जनाला प्रभावीपणे प्रतिबंध करणारा जागतिक करार प्रत्यक्षात आणण्यात पॅरिस परिषद सफल होईल, अशी आशा वर्तवली जात आहे.
- तसेच कोपनहेगन परिषदेत विकसित राष्ट्रांनी हरितगृह वायूचे उत्सर्जन कमी करण्याकरिता विकसनशील राष्ट्रांना 2020 पासून 100 बिलियन डॉलरचे अर्थसहाय्य करण्याचे मान्य केले होते.
ग्लोबल स्कूल्स फाउंडेशन या संस्थेने भारतात पाच शाळा सुरू करण्याचे जाहीर :
- सिंगापूर येथील अनिवासी भारतीयांच्या ग्लोबल स्कूल्स फाउंडेशन या संस्थेने भारतात येत्या दोन वर्षांत पाच शाळा सुरू करण्याचे जाहीर केले आहे.
- 2002 मध्ये या संस्थेची स्थापन झाली असून येत्या दोन वर्षांत पुणे, मुंबई, नागपूर व बंगळुरू येथे पाच शाळा सुरू केल्या जाणार आहेत, असे फाउंडेशनचे प्रमुख कमल गुप्ता यांनी सांगितले.
- या संस्थेच्या आंतरराष्ट्रीय शाळा या सिंगापूरमध्ये असून त्यात अनिवासी भारतीयांची मुले शिकतात पण तेथे सीबीएसईचा अभ्यासक्रम शिकवला जातो.
- सिंगापूरमधील त्यांच्या शाळांमध्ये 52 टक्के आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आहेत. टोकियो व कोफू येथील शाळांमध्ये 40 टक्के जपानी विद्यार्थी आहेत.
- संस्थेने गणित व इंग्रजी सीबीएसई पद्धतीने शिकवण्याचा निर्णय घेतला कारण त्यांचा अभ्यासक्रम चांगल्या दर्जाचा आहे.
- 2017 पर्यंत सिंगापूर येथे 10 कोटी डॉलर्स खर्चून शिक्षण केंद्र सुरू केले जाणार आहे.
- भारत, आग्नेय आशिया व जपान येथे संस्थेच्या 20 शाळा असून सप्टेंबरमध्ये दुबईतही शाळा सुरू केली.