चालू घडामोडी (29 सप्टेंबर 2015)
भारतीय वेधशाळा ‘अॅस्ट्रोसॅट’चे अवकाशात प्रक्षेपण :
- अॅस्ट्रोसॅट ही संशोधन वेधशाळा यशस्वीपणे अवकाशात सोडून भारताने ऐतिहासिक भरारी घेतली आहे.
- खगोलीय वेधशाळा अवकाशात सोडणाऱ्या मोजक्या देशांमध्ये भारताला स्थान मिळाले आहे.
- विश्वाचे सखोल आकलन करण्यासाठी वेधशाळेच्या रूपातील अॅस्ट्रोसॅट या उपग्रहाचा उपयोग होणार आहे.
- या मोहिमेत अमेरिकेसारख्या देशातील एका कंपनीचे चार उपग्रह प्रथमच भारतीय अवकाशतळावरून सोडण्यात आले.
- किफायतशीर अवकाश मोहिमांमध्येही भारताने आणखी एक पाऊल टाकले आहे.
- भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोच्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाचे हे 31 वे यशस्वी उड्डाण होते.
- या प्रक्षेपकाने अॅस्ट्रोसॅटसह एकूण सात उपग्रह अवकाशात सोडले आहेत.
- येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून हा प्रक्षेपक सकाळी झेपावला व त्याने अवघ्या 25 मिनिटांत या उपग्रहांना कक्षेत प्रस्थापित केले.
- अॅस्ट्रोसॅट या उपग्रहास क्ष-किरण दुर्बीण असून तिला ‘मिनी हबल’ असेही म्हटले जाते.
- अमेरिकेच्या नासा या अवकाश संस्थेने 1990 मध्ये हबल दुर्बीण सोडली होती.
- खगोलाच्या निरीक्षणासाठीच ही व्यवस्था करण्यात आली होती.
- आतापर्यंत जपान, अमेरिका, रशिया व युरोपीय समुदाय यांनी अवकाश वेधशाळा सोडल्या आहेत.
- तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वेल डन इस्रो’ असा संदेश पाठवला असून वैज्ञानिकांचे अभिनंदन केले आहे.
- सॅनफ्रान्सिस्को येथील एका कंपनीचे चार लघुउपग्रह या वेळी सोडण्यात आले.
- त्यासाठी इस्रोच्या अँट्रिक्स कार्पोरेशनशी करार करण्यात आला होता.
- इंडोनेशियाचा लापान ए2 हा सागरी सर्वेक्षण उपग्रह तसेच कॅनडाचा एनएलएस 14 (इव्ही 9) हा उपग्रह या वेळी या प्रक्षेपकाच्या मदतीने सोडण्यात आला.
- लेमूर लघुउपग्रह हे सॅनफ्रान्सिस्कोच्या स्पायर ग्लोबल इन्कार्पोरेशन या कंपनीचे आहेत, हे उपग्रह दिसणार नाहीत, इतके लहान आहेत.
- पीएसएलव्ही प्रक्षेपकाचे हे 30 वे यशस्वी उड्डाण होते.
- या प्रक्षेपकाने वीस देशांचे 51 परदेशी उपग्रह सोडले असून, त्यात जर्मनी, फ्रान्स, जपान, कॅनडा, ब्रिटन या देशांच्या उपग्रहांचा समावेश होता.
मंगळ ग्रहावर गोठलेल्या अवस्थेत पाणी :
- मंगळ ग्रहावर गोठलेल्या अवस्थेत पाणी आहे.
- एवढेच नव्हे तर उन्हाळ्यात मंगळावर खाऱ्या पाण्याचे प्रवाह वाहतात, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
- जीवसृष्टीसाठी पाणी हा अत्यावश्यक घटक आहे, त्यामुळे सोमवारी शास्त्रज्ञांनी जाहीर केलेला शोध महत्त्वाचा ठरणार आहे.
- मंगळ ग्रहावर पाणी असल्याचा दावा अनेक वर्षांपासून केला जातो. मात्र, ताजा निरीक्षणांमधून हे स्पष्ट झाले आहे की, उन्हाळ्यात मंगळावरील उतारांवरून खाऱ्या पाण्याचे प्रवाह वाहताना दिसतात.
- मंगळावरील उन्हाळ्याच्या काळात जेव्हा सर्वाधिक तापमान असते, त्या वेळी गोठलेले पाणी वितळण्यास सुरवात होते.
- त्यामुळे उतारांवरून खाऱ्या पाण्याचे झरे वाहत असल्याचे आढळून आल्याचे मत शास्त्रज्ञांनी मांडले आहे.
- मिठामुळे पाण्याचा गोठण बिंदू कमी होतो, त्यामुळे पाण्याचे प्रवाह तयार होतात, असे शास्त्रज्ञांनी सांगितले.
- मंगळ ग्रहावर अतिसूक्ष्म जिवांच्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ करत असून, त्यादृष्टीने आजचा शोध महत्त्वाचा ठरणार असल्याचे सांगण्यात येते.
- 2006 पासून मंगळाच्या भोवती फिरत असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्रीय अवकाश संशोधन संस्थेच्या (नासा) “मार्स ऑर्बिटर”ने पाठविलेल्या माहितीच्या आधारे शास्त्रज्ञांनी मंगळावरील पाण्याच्या अस्तित्वाबद्दल नवा शोध लावला आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या साहाय्याने देशातील 500 रेल्वे स्थानकांवर वाय-फाय सेवा उपलब्ध :
- माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील लोकप्रिय सर्च इंजिन असलेली गुगल कंपनी पुढील वर्षात भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या साहाय्याने देशातील 500 रेल्वे स्थानकांवर वाय-फाय सेवा उपलब्ध करून देणार आहे.
- गुगल कंपनीच्या मुख्यालयाच्या भेटीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली.
- गुगल कंपनी सुरवातीला भारताच्या 100 रेल्वे स्थानकांवर ब्रॉडबॅंड इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देईल.
- त्यानंतर पुढच्या वर्षाअखेरीस आणखी 400 रेल्वे स्थानकांवर वाय-फाय सेवा उपलब्ध करण्यात येईल, अशी माहिती गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी दिली.
- तसेच अँड्रॉइड युजर्ससाठी लवकरच 11 भाषेत टायपिंग करता येणारी नवी प्रणाली उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा गुगलने केली.
- देशातील 125 कोटी जनतेचा विचार करून गुगलने सामान्यांसाठी फायदेशीर ठरेल असे ऍप तयार करावे, असे मोदी म्हणाले.
- क्वॉलकॉम : 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार; हा पैसा स्टार्टअप कंपन्यांना देणार. भारतात चीप डिझाइन करणार
- मायक्रोसॉफ्ट : भारतात लवकरच क्लाऊड डाटा सेंटरची घोषणा करणार. 5 लाख खेड्यांना “आयटी”शी जोडणार
- गुगल : भारतातील 500 रेल्वे स्टेशनवर वाय-फाय सुविधा देणार, 11 भारतीय भाषांमध्ये इंटरनेट अँड्रॉइड फोन लॉंच करणार
- ऍपल : भारतात मॅन्युफॅक्चरिंग प्रकल्प सुरू करण्यास आणि “ऍपल पे” जनधन योजनेसोबत जोडण्यास संमती दिली
राज्यातील बचत गटांसाठी अम्मा मोबाईल योजना सुरू :
- राज्यातील बचत गटांसाठी अम्मा मोबाईल योजना सुरू करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री जयललिता यांनी विधानसभेत केली.
- बचत गटातील प्रशिक्षणार्थींना मोबाईल आवश्यक असल्याने त्यांना अशा प्रकारची सुविधा मिळणे आवश्यक आहे, असे जयललिता म्हणाल्या.
- अम्मा मोबाईलमध्ये एक विशेष ऍप्लिकेशन असणार आहे. या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून बचत गटांची माहिती उपलब्ध होणार आहे.
- शिवाय, प्रत्येक सभासदाला आपल्या खात्यामधील रक्कम, कर्जाबाबतची माहिती व बैठकीची तारीख कळू शकणार आहे.
- प्रत्येक बचत गटाच्या प्रमुखामार्फत हे मोबाईल दिले जाणार आहेत.
- राज्यात 6 लाख 8 हजार बच गट आहेत. या बचत गटामधील महिला सभासदांची संख्या 92 लाख एवढी आहे. पहिल्या टप्प्यात 20 हजार प्रशिक्षणार्थींना मोबाईल देण्यात येणार असून त्याची किंमत 15 कोटी इतकी असेल.
- “अम्मा मोबाईल”मध्ये बचत गटासंदर्भातील सॉफ्टवेअर असून त्याची माहिती महिलांना दिली जाणार आहे. तमिळनाडूत अम्मा नावाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यापैकी अम्मा सिमेंट, अम्मा मिनरल वॉटर आणि अम्मा कॅंटीन. आता अम्मा मोबाईल नावाने नवीन योजना
- कार्यान्वित होत आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा पुन्हा सुरू करण्यात आली :
- धार्मिक तणाव निर्माण होऊ नये, यासाठी तीन दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये बंद ठेवण्यात आलेली मोबाईल इंटरनेट सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
- इंटरनेटचा दुरुपयोग करून कोणी धार्मिक तणाव निर्माण करू नये, यासाठी खबरदारी म्हणून येथील राज्य सरकारने ईदच्या वेळी इंटरनेट सेवेवर प्रतिबंध घातले होते.
- त्यानुसार ब्रॉडबॅंड आणि जीपीआरएस अशा दोन्ही इंटरनेट सेवांवर ही बंदी घालण्यात आली होती.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार संगीतकार प्रभाकर जोग यांना जाहीर :
- राज्य शासनातर्फे प्रदान करण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2015 या वर्षासाठी ज्येष्ठ व्हायोलिनवादक व संगीतकार प्रभाकर जोग यांना जाहीर करण्यात आला आहे.
- 5 लाख रुपये, मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
- सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीतील संगीतकार अजय व अतुल यांनी प्रभाकर जोग यांच्या नावाची शिफारस केली.
- या समितीत सांस्कृतिक कार्य सचिव वल्सा नायर सिंह, श्रीधर फडके, आशा खाडिलकर, स्वानंद किरकिरे, श्रेया घोषाल यांचा समावेश आहे.
महिला बॉक्सर मेरी कोम ऑलिम्पिक स्पर्धेनंतर बॉक्सिंगमधून निवृत्ती घेणार :
- भारताची दिग्गज महिला बॉक्सर मेरी कोम हिने आपल्या निवृत्तीचे संकेत देताना आगामी रिओ ऑलिम्पिक माझ्यासाठी शेवटची असून, या स्पर्धेनंतर बॉक्सिंगमधून निवृत्ती घेणार, असे सांगितले.
- त्याच वेळी यानंतर खेळाडू या नात्याने नाही मात्र प्रशिक्षक म्हणून बॉक्सिंगशी कायम जोडली जाणार, असेही मेरीने सांगितले.
स्वच्छ भारत मोहिमेसाठी सचिन तेंडुलकर यांनी दिला आवाज :
- स्वच्छ भारत या मोहिमेसाठी माजी क्रिकेटपटू खासदार सचिन तेंडुलकर यांनी आपला आवाज दिला आहे.
- रालोआ सरकारने स्वच्छ भारत ही जनचळवळ व्हावी यासाठी पुढाकार घेत जनजागृतीवर भर दिला आहे.
- शंकर-एहसान-लॉय या त्रिकुटाने या मोहिमेचा भाग म्हणून हे गीत साकारले आहे.
- येत्या 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी ते जारी केले जाणार असून तो स्वच्छ भारत मोहिमेचा पहिला वर्धापनदिनही आहे.
- प्रसिद्ध गीतकार प्रसून जोशी यांनी हे गीत लिहिले असून मुकेश भट यांनी तयार केलेल्या व्हिडिओत जोशी यांनाही दाखविण्यात आले आहे.
- सचिन यांनी काही ओळी गात रेकॉर्डिंगच्या वेळी काही सूचनाही केल्या आहेत.
सीआयएसएफने धोनी, विश्वनाथन व धनराज या तिघांकडे प्रशिक्षण देण्याची धूरा सोपवली :
- विमानतळावरील सुरक्षा कर्मचारी प्रवाशांसोबत उद्धटपणाने वागतात अशी अनेक प्रवाशांची तक्रार असते.
- मात्र आता सुरक्षा कर्मचा-यांना शिष्टाचार व चांगल्या वागणुकीचे धडे देण्यासाठी दस्तुरखुद्द महेंद्रसिंग धोनी मैदानात उतरला आहे.
- केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) धोनी, विश्वनाथन आनंद व धनराज पिल्ले या तिघांकडे कर्मचा-यांना शिष्टाचाराचे प्रशिक्षण देण्याची धूरा सोपवली आहे.
- देशभरातील विमानतळांच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाकडे (सीआयएसएफ) आहे.
- सीआयएसएफने धोनी, धनराज पिल्ले व विश्वनाथन आनंद यासारख्या खातनाम सेलिब्रिटी खेळाडूंना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला.
- शिष्टाचार, चांगली वर्तवणुकीसोबतच जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी प्रेरणादायी भाषण देण्यास या तिघांना सांगण्यात आले आहे.
नासाची नवीन रोव्हर गाडी 2020 मध्ये मंगळावर सोडली जाणार :
- नासाची नवीन रोव्हर गाडी 2020 मध्ये मंगळावर सोडली जाणार असून ती अणुइंधनावर चालेल.
- आताच्या क्युरिऑसिटी व अॅपॉरच्युनिटी रोव्हरगाडय़ांपेक्षा ती जास्त प्रगत असणार आहे.
- ही गाडी आता तयार करण्यात येत आहे. अनेक बाबतीत ही गाडी आधीच्या रोव्हर गाडय़ांपेक्षा वेगळी आहे.
- स्पेस डॉट कॉमच्या वृत्तानुसार नवीन रोव्हर गाडी वजनदार असेल व तिची चाके लांब व जास्त जड असतील त्यामुळे ही गाडी मंगळावर वेगळ्या पद्धतीने मार्गक्रमण करणार आहे.
- क्युरिऑसिटी गाडीपेक्षा ही गाडी जास्त वेगाने चालू शकेल.
- अलगॉरिथमच्या मदतीने तिची दिशा हवी तशी बदलता येईल.
- थोडक्यात ती स्मार्ट म्हणजे चतूर असेल. गाडी चालवण्यात अडचणी असणार नाहीत किंबहुना त्यावर फार वेळ खर्च होणारच नाही.
- मंगळावरील महत्त्वाच्या भागांवर ही गाडी जाईल तसेच तेथील वैज्ञानिक माहिती पाठवेल.
- जेनिफर यांच्या मते क्युरिऑसिटीपासून विचार केला, तर त्या गाडीची कार्यक्षमता 55 टक्क्य़ांवरून 80टक्के केली होती.
- आता 2020 मध्ये मंगळावर जाणाऱ्या रोबोट रूपातील या रोव्हर गाडीची कार्यक्षमता 95 टक्के इतकी असेल.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित मंत्रिमंडळ बैठकींची कागदपत्रे सार्वजनिक केली :
- नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित फाइल्स अवर्गीकृत केल्यानंतर पश्चिम बंगाल सरकारने सोमवारी नेताजी व त्यांच्याशी संबंधित विषयांवरील 1938 ते 1947 या काळातील मंत्रिमंडळ बैठकींची कागदपत्रे (कॅबिनेट पेपर्स) सार्वजनिक केली.
- ही कागदपत्रे स्वातंत्र्यपूर्व काळात कदाचित गोपनीय असतीलही, परंतु आज ती सर्वासमोर आणण्याची आवश्यकता आहे.
- ही कागदपत्रे राज्याचे पुराभिलेख संग्रहालय, राज्य माहिती केंद्र आणि मध्यवर्ती ग्रंथालय येथे नागरिक, संशोधक, इतिहासतज्ज्ञ आणि विद्यार्थी यांना पाहण्यासाठी उपलब्ध राहतील, असेही त्या म्हणाल्या.
- वरील कालावधीतील मंत्रिमंडळाच्या 401 बैठकांबाबतची माहिती असलेली एक सीडीही बॅनर्जी यांनी जारी केली.
- यात ‘भारत छोडो’ चळवळ, बंगालमधील भीषण दुष्काळ आणि बंगालची फाळणी यांसारख्या महत्त्वाच्या घटनांचाही समावेश आहे.
- यापूर्वी राज्य सरकारने नेताजींशी संबंधित 64 फायली खुल्या केल्या होत्या.
- या फायलींच्या डिजिटायझेशनचे काम 2013 साली सुरू झाले होते.
- 1947 नंतरच्या 10 वर्षांमधील मंत्रिमंडळ बैठकीच्या कागदपत्रांचे डिजिटायझेशन सध्या सुरू असल्याचे बॅनर्जी म्हणाल्या.
दिनविशेष :
- आर्जेन्टिना संशोधक दिन
- 1943 : दुसरे महायुद्ध – इटलीने शस्त्रे खाली ठेवली.
- 1991 : हैतीमध्ये लश्करी उठाव.