Current Affairs of 3 August 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (3 ऑगस्ट 2016)

चालू घडामोडी (3 ऑगस्ट 2016)

आंतरराष्ट्रीय आयएलओ स्पर्धेत आलोक साठेला ब्राँझपदक :

  • भाषिक कौशल्याची आणि ज्ञानाची कसोटी पाहणाऱ्या महत्त्वाच्या अशा आंतरराष्ट्रीय लिंग्विस्टिक ऑलिंपियाड (आयएलओ) या स्पर्धेत पुण्यातील आलोक साठे या विद्यार्थ्याने सलग दुसऱ्यांदा ब्रॉंझपदक पटकाविले.
  • म्हैसूर येथे ही स्पर्धा पार पडली, तब्बल 32 देशांतील 180 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यात आलोकने ही नेत्रदीपक कामगिरी केली आहे.
  • वैयक्तिक आणि सांघिक कामगिरीच्या आधारावर अंतिम निकाल लावण्यात आला.
  • भारताच्या दोन संघांतील एकूण आठ विद्यार्थ्यांमधून आलोकने हे पदक मिळविले आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (2 ऑगस्ट 2016)

चीन जनुकीय संपादनाची चाचणी करणार :

  • चिनी वैज्ञानिकांनी जगात प्रथमच जनुकीय संपादनाची चाचणी माणसांवर करण्याचे ठरवले आहे.
  • तसेच या महिन्यात फुफ्फुसाच्या कर्करोगावर उपचारासाठी जनुकीय संपादनाची चाचणी करण्यात येणार आहे.
  • चेंगडू येथील सिनचुआन विद्यापीठाच्या वेस्ट चायना रूग्णालयात हा प्रयोग केला जाणार असून यात सीआरआयएसपीआर (क्रिस्पर) कॅस 9 या तंत्रज्ञानाच्या मदतीने जनुकीय संपादन करून त्या पेशी पुन्हा रूग्णाच्या शरीरात सोडल्या जाणार आहे.
  • क्रिस्पर या तंत्रज्ञानाचे पूर्ण नाव ‘क्लस्टर्ड रेग्युलरली इंटरस्पेस्ड शॉर्ट पालिनोड्रॉमिक रिपीट्स’ असे असून 2015 मध्ये या तंत्रज्ञानाचा उल्लेख महत्त्वाचा शोध म्हणून अमेरिकेच्या ‘सायन्स’ या नियतकालिकाने केला होता.
  • तसेच या तंत्रज्ञानाच्या मदतीने जनुकीय भाग संपादित करून त्यात डीएनएचे नवीन धागे टाकले जातात.

भारतीय कंपन्या चीनच्या तुलनेत अधिक कार्यक्षम :

  • चिनी कंपन्यांच्या तुलनेत भारतीय कंपन्या अनेक बाबतीत वरचढ असल्याचे ‘एस अँड पी ग्लोबल रेटिंग्स’ या संस्थेच्या अहवालातून समोर आले आहे.
  • पायाभूत सुविधा मिळण्यात भारतीय कंपन्यांना काही अडचणी असल्या, तरीदेखील या कंपन्या कार्यक्षम आणि गुणवत्तायुक्त असल्याचे अहवालात म्हटले आहे.
  • तसेच याबाबत अधिक माहिती देताना संस्थेचे विश्‍लेषक मेहुल सुक्कावाला यांनी सांगितले, की या अहवालासाठी भारतातील आघाडीच्या 200 कंपन्यांचा अभ्यास करण्यात आला.
  • यामध्ये संबंधित कंपन्यांची चीनमधील स्पर्धक कंपन्यांशी तुलना केली असता, चीनमधील कंपन्यांमध्ये सरकारी हस्तक्षेप मोठ्या प्रमाणावर आढळला.
  • यामुळे कंपन्यांना मुक्तपणे काम करण्यात अडचणी येत असून, भारतीय कंपन्याच त्यांच्यापेक्षा वरचढ ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

रिओ ऑलिम्पिकसाठी रशियाच्या वेटलिफ्टिंग संघावर बंदी :

  • आठ खेळाडूंचा समावेश असलेल्या रशियाच्या वेटलिफ्टिंग संघाला रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यास मनाई करण्यात आली आहे.
  • उत्तेजक सेवनाला प्रोत्साहन देत असल्याच्या आरोपांवरून आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग संघटनेने (आयडब्ल्यूएफ) त्यांच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
  • आतापर्यंत रशियाच्या एकूण 117 खेळाडूंवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामध्ये अ‍ॅथलेटिक्समधील 67 खेळाडूंचा समावेश आहे.
  • रशियाने रिओसाठी 387 खेळाडूंचे पथक जाहीर केले होते.
  • उत्तेजक प्रकरणांमुळे रशियावर सरसकट बंदी घालावी, अशी मागणी अमेरिका, कॅनडा यांच्यासह अनेक देशांनी केली होती.
  • मात्र रशियाला जागतिक स्तरावर असलेले मोठे स्थान लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने त्यांच्यावर सरसकट बंदी न घालण्याचा निर्णय घेतला आहे.

रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची मुदत चार वर्षे असावी :

  • अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हच्या गव्हर्नरची मुदत चार वर्षे आहे, तर बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरचा कालावधी आठ वर्षांचा असतो.
  • जगभरात सर्वत्र मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरची मुदत पाच ते सहा वर्षे असून, भारतातही रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची मुदत चार वर्षे करावी, अशी मागणी काँग्रेसचे सदस्य राजीव शुक्ला यांनी राज्यसभेत केली.
  • शून्य प्रहरात हा विषय उपस्थित करताना ते म्हणाले की, रघुराम राजन यांच्याबाबतीत उलटसुलट विधाने करून सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी गोंधळ घातला.
  • भारतात रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची मुदत तीन वर्षे असून, त्यांना आणखी एकदा मुदतवाढ देण्याची तरतूद आपल्याकडे आहे.
  • अन्य देशांप्रमाणे पाच ते आठ वर्षे गव्हर्नरचा कालावधी ठरवणे शक्य नसले तरी ती मुदत किमान चार वर्षे करणे योग्य ठरेल.

दिनविशेष :

  • 1900 : फायरस्टोन टायर कंपनीची स्थापना.
  • 1946 : अमेरिकेत नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनची स्थापना.
  • 1956 : बलविंदरसिंग संधू, भारतीय क्रिकेट खेळाडू जन्म दिन.
  • 1957 : देवदास गांधी, हिंदुस्थान टाइम्सचे संपादक व महात्मा गांधींचे सुपुत्र यांची पुण्यतिथी.
  • 1960 : नायजरला फ्रांसपासून स्वातंत्र्य.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (4 ऑगस्ट 2016)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.