चालू घडामोडी (3 फेब्रुवारी 2016)
राज्य नावीन्यता परिषदेच्या नोंदणीला मंत्रिमंडळाची मान्यता :
- राज्य शासनाने स्थापन केलेल्या राज्य नावीन्यता परिषदेला संस्था नोंदणी अधिनियमानुसार स्वतंत्र शासकीय संस्था म्हणून नोंदणी करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
- तसेच या परिषदेचे सहअध्यक्ष म्हणून ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांची निवड करण्यात आली आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या स्टार्ट अप योजनेला चालना देण्यासाठी राज्य नावीन्यता परिषदेच्या नोंदणीला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
- राज्य नावीन्यता परिषदेच्या पदसिद्ध अध्यक्षपदी राज्याचे मुख्य सचिव असतील.
- स्टार्ट अपला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने रिझर्व्ह बॅंक सहाय्य करणार आहे.
- तसेच या योजनेअंतर्गत नवउद्योजकांना पुरेशा प्रमाणात भांडवल उपलब्ध व्हावे, यासाठी बॅंकेकडून कृती आराखडा तयार केला जाणार आहे, अशी माहिती बॅंकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी (दि.2) दिली.
- व्याप्ती :
- नव्या संकल्पनांचा आराखडा तयार करणे
- नव्या संकल्पनांचा शोध घेण्यासाठी विद्यार्थी, तरुणांना मार्गदर्शन करणे
- पूरक वातावरणाची निर्मिती करणे
- जोखीम भांडवलाच्या उभारणीसाठी मदत करणे
- सर्व जिल्ह्यांत जिल्हा नावीन्यता परिषदेची स्थापना करणार
उत्तर प्रदेश सरकारने नवे पर्यटन धोरण :
- पर्यटनाला आणखी चालना देण्याच्या दृष्टीने उत्तर प्रदेश सरकारने नवे पर्यटन धोरण तयार केले असून, नव्या हॉटेलच्या बांधणीला दहा कोटी रुपयांपर्यंतचे अंशदान हे त्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
- राज्य विधानसभेची निवडणूक एक वर्षावर आलेली असताना मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या सरकारने हे नवे धोरण जाहीर केले आहे.
- राज्याच्या नोकरशाहीत अनेक जबाबदाऱ्या पार पाडणारे पर्यटन विभागाचे मुख्य सचिव नवनीत सहगल यांनी हे धोरण जाहीर केले.
- या नव्या पर्यटन धोरणामुळे उत्तर प्रदेशातील पर्यटनच केवळ वाढणार नाही, तर सरकारलाही फायदा होईल, अशा पद्धतीने त्याची आखणी करण्यात आली आहे.
ऑलिम्पियन संजीव राजपूतनला रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी कोटा प्राप्त :
- दोन वेळचा ऑलिम्पियन संजीव राजपूतने आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत पुरुष गटात 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये चौथे स्थान पटकाविले.
- तसेच याबरोबरच त्याने आगामी रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी कोटा प्राप्त केला.
- भारतासाठी हा 12 वा असा विक्रमी कोटा ठरला, राजपूतच्या या कामगिरीनंतर क्रीडासंग्रामात आता भारताचे आतापर्यंतचे सर्वाधिक नेमबाज सहभागी होणार आहेत.
- चार वर्षांपूर्वी लंडन येथे भारताने 11 नेमबाजांची टीम पाठविली होती.
- डॉ. कर्णी सिंह शूटिंग रेंज येथे आठ खेळाडूंच्या फायनलमध्ये 249.5 गुण मिळवत राजपूतने देशासाठी कोट प्राप्त केला, त्याने 1163 या स्कोअरसह चौथा क्रमांक मिळवत फायनलसाठी पात्रता मिळवली होती.
व्हॉटस्अॅपचे जागतिक स्तरावर एक अब्ज युजर्स :
- मोबाईल मॅसेजिंग व्हॉटस्अॅपने गेल्या पाच महिन्यांत 10 कोटी वापरकर्ते (युझर्स) जोडून घेऊन जागतिक स्तरावर एक अब्ज युजर्सचा टप्पा ओलांडला आहे.
- व्हॉटस्अॅपने ब्लॉगपोस्टवर म्हटले आहे की, आजच्या तारखेत एक अब्ज लोक व्हॉटस्अॅपचा वापर करीत आहेत.
- पृथ्वीवरील प्रत्येक सात व्यक्तींतील एक जण आपल्या प्रियजनांच्या संपर्कात राहण्यासाठी दरमहा व्हॉटस्अॅपचा वापर करीत आहे.
- फेब्रुवारी 2015 मध्ये व्हॉटस्अॅपचा फेसबुकद्वारे 19 अब्ज डॉलरमध्ये ताबा घेण्यात आला आहे.
- फेसबुकवरील एका पोस्टमध्ये सह संस्थापक जॉन कोऊम यांनी म्हटले आहे की, या प्लॅटफॉर्मवर प्रत्येक दिवशी 42 अब्ज संदेश, 1.6 अब्ज फोटो आणि 25 कोटी व्हिडिओज पाठविले जातात.
भारताच्या फुटबॉल संघाची घोषणा :
- गुवाहाटी येथे होणाऱ्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी (सॅग) केवळ चार दिवस बाकी असताना अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) 28 खेळाडूंच्या संभावित भारतीय संघाची घोषणा केली.
- विशेष म्हणजे, 31 जानेवारीपासून गुवाहाटी येथे सुरू झालेल्या सराव शिबिरामध्ये यापैकी 21 खेळाडू याआधीच सहभागी झाले आहेत.
- ‘अ’ गटात समावेश असलेल्या भारतापुढे गटात श्रीलंका व मालदीव यांचे आव्हान असेल.
- भारताचा सलामीचा सामना 6 फेब्रुवारीला श्रीलंकेविरुद्ध होईल.
राज्यात ‘मेगा’ पोलीस भरती जाहीर :
- राज्य पोलीस दलात रिक्त असलेल्या तब्बल 4 हजार 14 पोलीस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया (दि.3) फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.
- 3 ते 18 फेब्रुवारीपर्यंत इच्छुक उमेदवारांचे ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत, यंदा महिलांना प्राधान्य देण्यात आले आहे.
- तसेच यंदापासून धावण्याचे अंतर कमी करण्यात आले, यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 5 कि.मी.ऐवजी 1600 मीटर व महिला उमेदवारांसाठी 3 कि.मी.ऐवजी 800 कि.मी. धावण्याची चाचणी घेण्यात येणार आहे.
- राज्य पोलीस दलात 10.48 टक्के महिला पोलीस कार्यरत आहेत.
- पोलीस दलात महिलांच्या प्रतिनिधित्वात वाढ होण्यासाठी रिक्त पदांच्या 30 टक्के पदे महिला उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.
- तसेच बँड पथकातही महिलांनी अर्ज करून भरती व्हावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
- कारागृह शिपाई पदासाठी वेगळी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
- रिक्त जागा राहिल्यास या पोलीस शिपाई भरतीमध्ये प्रतीक्षा यादीवर असलेल्या इच्छुक उमेदवारांची भरती केली जाणार आहे.
रिझर्व्ह बॅंकेकडून रेपो दर स्थिर :
- अपेक्षेप्रमाणे रिझर्व्ह बॅंकेने (दि.2) पतधोरण आढाव्यात रेपो दराला कोणताही हात न लावता तो कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.
- सध्या 6.7 टक्के रेपो दर पुढील पतधोरण आढाव्यापर्यंत कायम ठेवण्यात आला आहे.
- तसेच त्याचबरोबर रोख राखीवता प्रमाणामध्येही (सीआरआर) बॅंकेने कोणताही बदल केलेला नसून, तो 4 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे.
- रिझर्व्ह बॅंकेचा चालू आर्थिक वर्षातील सहावा द्विमासिक पतधोरण आढावा (दि.2) गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी जाहीर केला.
- आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे सध्याचे दर आणि सर्वसामान्य मान्सूनची शक्यता गृहीत धरून चलनवाढीचा दर 5 टक्क्यांचा आसपास राहण्याचा अंदाज रिझर्व्ह बॅंकेने वर्तविला आहे.
- चालू आर्थिक वर्षातील विकास दर 7.4 टक्क्यांपर्यंत राहण्याचा अंदाच बॅंकेने वर्तविला आहे.
दिनविशेष :
- 1925 : भारतातील पहिली विद्युत रेल्वे मुंबई ते कुर्ला या लोहमार्गावर सुरु झाली.
- 1963 : रघुराम राजन, भारतीय अर्थशास्त्री यांचा जन्म झाला.
- 1966 : रशियाने ‘लूना-9’ हे अवकाशयान चंद्रावर उतरवले.
- 1984 : स्पेस शटल चॅलेंजरच्या अंतराळवीरांनी अंतराळात प्रथमतः अनिर्बंध पदार्पण केले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा