Current Affairs (चालू घडामोडी) of 3 January 2015 For MPSC Exams
अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर यांचे निधन |
2. | भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी रावसाहेब दानवेंची निवड निश्चित |
3. | साठेबाजीविरोधी कायद्यात बदल |
4. | ‘बुर्ज खलिफा’चा विश्वविक्रम |
5. | “ज्ञानसंगम” बैठक पुण्यात सुरू |
6. | दिनविशेष |
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर यांचे निधन :
- ज्येष्ठ शास्त्रज्ञ वसंत गोवारीकर यांचे शुक्रवारी सकाळी पुण्यात निधन झाले.
- अवकाश संशोधन, हवामान शास्त्र आणि लोकसंख्या क्षेत्रातील त्यांचे संशोधन अत्यंत महत्वपूर्ण मानले जाते.
भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी रावसाहेब दानवेंची निवड निश्चित :
- भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदासाठी जालना मतदारसंघाचे खासदार रावसाहेब दानवे यांचे नाव निश्चित करण्यात आले.
- यांना 30 वर्षाचा राजकीय अनुभव असून ते भाजपच्या मराठवाड्यातील महत्वाच्या नेत्यांपैकी एक आहे.
साठेबाजीविरोधी कायद्यात बदल :
- साठेबाजीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकार साठेबाजीविरोधी कायद्यात बदल करणार असून या कायद्यातील कमकुवत तरतुदी दूर करणार आहे.
- अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी घोषणा केली.
- सध्याच्या कायद्यानुसार साठेबाजीतील दोषींवर जमीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येत होता.
- यात बदल करत अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याची तरतूद करून कायदा कडक करण्याची तरतूद करून कायदा कडक करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
‘बुर्ज खलिफा’चा विश्वविक्रम :
- इमारतीला नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला 70.000 एलईडी बल्बची रोषणाई करण्यात आली होती.
- ‘बुर्ज खलिफा’ही इमारत जगातील सर्वात उंच इमारत असून तिच्यावर करण्यात आलेल्या रोषणाईने विश्वविक्रम केला आहे.
“ज्ञानसंगम” बैठक पुण्यात सुरू :
- देशाच्या वित्तीय सेवा क्षेत्राविषयीचे व्यापक विचारमंथण करण्यासाठी पुण्यातील एनआयबीएममध्ये पंतप्रधान मोदी यांनी “ज्ञानसंगम” बैठक सुरू केली आहे.
- सार्वजनिक क्षेत्रातील बँका, विमा कंपन्या आणि वित्तीय संस्थांच्या प्रमुखांच्या उपस्थितीत सरकारी बँकांचे प्रमुख या बैठकीला हजर राहणार आहेत.
- तसेच सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्या आणि वित्तीय संस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सहभागी होणार आहेत.
- सर्व खात्यांचे राज्यमंत्री, मुख्य अर्थ सल्लागार , वित्त सचिव, केंद्रीय अर्थमंत्री, वित्तीय सेवा विभागाचे सचिव, रिझर्व बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन, डेपोटी गव्हर्नर हेही सहभागी होणार आहे.
दिनविशेष :
- 3 जानेवारी – अॅक्युपेशन दिन
- 3 जानेवारी – बालिका दिन
- 1831 – सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन
- 1950 – पुण्याच्या राष्ट्रीय रसायनिक प्रयोगशाळेचे पंडित नेहरू यांच्या हस्ते उद्घाटन
- 2004 – नायगाव (ता. खंडाळा) येथील सावित्रीबाई फुले यांचे जन्मघर राज्य संरक्षित स्मारक राष्ट्राला अर्पण.