चालू घडामोडी (3 जानेवारी 2016)
लष्करी सुधारणांना चीनमध्ये वेग :
- चिनी लष्करामधील सुधारणांची आज घोषणा करण्यात आली असून, जवानांची संख्या तीन लाखांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- लष्कर अधिक शक्तिशाली करण्याचे धोरण चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी अवलंबिले असून, तसे त्यांनी मागील महिन्यात जाहीर केले होते.
- जवानांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी लष्कराची ताकद वाढविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत.
- लष्करी सुधारणांबाबत केंद्रीय लष्करी आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. लष्कराच्या सर्व प्रशासकीय गोष्टींची जबाबदारी आता आयोगाकडे सोपविण्यात आली आहे.
- तसेच जागतिक पातळीवरील बदलती समीकरणे आणि नव्या आव्हानांना तोंड देण्यासाठी चिनी लष्कर अधिक मजबूत करण्यासाठी अनेक बदल करण्यात आले आहेत.
- चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीमध्ये (पीएलए) नवे तीन विभाग निर्माण करण्यात आले आहेत. पीएलए रॉकेट फोर्स, आर्मी जनरल कमांड आणि धोरणात्मक सहाय्य दल असे हे तीन नवे विभाग आहेत. या तिन्ही विभागांना ध्वज प्रदान करण्याचा पार पडला आहे.
ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते ए. बी. वर्धन यांचे निधन :
- भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (भाकप) ज्येष्ठ नेते ए. बी. वर्धन (वय 92) यांचे दिल्लीतील जी. बी. पंत रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.
- वर्धन हे महाराष्ट्रातील कामगार संघटनांचे महत्त्वाचे नेते होते. मूळचे नागपूरचे असलेल्या वर्धन यांचा जन्म 24 सप्टेंबर 1924 रोजी झाला होता. त्यांनी भाकपचे महासचिव म्हणून जबाबदारी सांभाळली.
राहुल गांधी लवकरच कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी :
- कॉंग्रेसच्या उपाध्यक्ष राहुल गांधी हे लवकरच कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान होतील.
- आपल्या युरोप दौऱ्याबाबत राहुल गांधी यांनी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ट्विटरद्वारे माहिती दिली होती. दरम्यान 8 जानेवारी रोजी कॉंग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. याच बैठकीत पक्षांतर्गत निवडणुकीची प्रक्रियेविषयी निर्णय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
- तसेच याबाबतचा अंतिम निर्णय वर्तमान अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या हातात आहे.
नव्या वर्षात मोदींचे विदेश दौरे होणार कमी :
- नव्या वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी कमीत कमी विदेश दौरे करणार असून ते केवळ काही निवडक देशांचेच दौरे करणार आहेत. तसेच केवळ काही विशेष आंतरराष्ट्रीय संमेलनालाच उपस्थित राहणार असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.
- गेल्या 19 महिन्यात मोदींनी तब्बल 33 देशांना भेटी दिल्या. 2015 मध्ये मोदींनी 26 देशांना भेटी दिल्या.
ट्रान्स हार्बर लिंकला दोन महत्त्वाच्या मंजुरी :
- शिवडी ते न्हावा या 22 किलोमीटर लांबीच्या ट्रान्स हार्बर लिंकच्या मार्गातील दोन मुख्य अडथळे आता दूर झाले असून, केंद्र सरकारने कोस्टल रेग्युलेटरी झोन (सीआरझेड) आणि वनविषयक मंजुरी या प्रकल्पाला दिली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
- 11 हजार कोटी रुपये खर्चाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी अर्थसाहाय्य करणार असलेल्या जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सीशी (जायका) एक महिन्याच्या आत करार केला जाईल आणि या प्रकल्पाच्या उभारणीसाठीची निविदा येत्या फेब्रुवारी किंवा जास्तीत जास्त मार्चच्या सुरुवातीला काढण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
- तसेच मार्चपर्यंत मुंबईकरिता हाउसिंग रेग्युलेटर नेमण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
- तसेच संस्कृत ही ज्ञानभाषा आहे. या भाषेत जगाला मार्ग दाखविण्याची क्षमता आणि शक्ती असल्याने महाराष्ट्रातही या भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी लवकरच संस्कृत अकादमी स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
शेतकऱ्यांना लवकरच नव्या पीक विमा योजनेची भेट :
- देशातल्या शेतकऱ्यांना नव्या वर्षात मोदी सरकारकडून नव्या पीक विम्याच्या आकर्षक योजनेची भेट मिळणार आहे.
- केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 2 डिसेंबरला पीक विम्याच्या प्रिमियमविषयी विस्ताराने चर्चा झाली होती. सद्य:स्थितीत विविध पिकांच्या विम्यासाठी साधारणत: 3.5 ते 8 टक्के दराने प्रिमियम आकारला जातो. हा दर बराच महागडा असल्याने बहुतांश शेतकरी पिकांचा विमा उतरवण्याचे टाळतात.
दोन दीर्घिकांचे मीलन प्रथमच चित्रित :
- नासाच्या हबल दुर्बिणीने छायाचित्रे टिपण्यात प्रथमच यश नासाच्या हबल या अवकाश दुर्बिणीने पृथ्वीपासून 23 कोटी प्रकाशवष्रे दूर असलेल्या दोन दीर्घिकांचे मीलन प्रथमच चित्रित केले आहे. शौरी तारकापुंजात (हरक्युलिस) या दीर्घिका आहेत.
- अतिशय विलोभनीय अशी ही प्रतिमा नासा व युरोपीय अवकाश संस्थेच्या कॅमेऱ्यांनी टिपली आहे. ही छायाचित्रे प्रथम बघितल्यानंतर ती विचित्र आकाराची एकच दीर्घिका आहे असे वैज्ञानिकांना वाटले परंतु त्यात दोन दीर्घिका मीलन होताना दिसत आहे, त्यातून नवी बाल दीर्घिका जन्म घेत असते. यातील मोठी दीर्घिका एनजीसी 6052 क्रमांकाची आहे.
दिनविशेष :
- महिला मुक्ती दिन.
- बालिका दिन.
- 1931 : महात्मा गांधीनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी गोलमेज परिषदेत केली.
- 1950 : पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेची सुरुवात झाली.
- 1952 : भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या.
- 1952 : स्वतंत्र भारतात पहिल्या राष्ट्रीय निवडणुका.
- 1957 : विद्युत घाटांवर चालणारे पहिले घड्याळ बाजारात.
- 1958 : सर एडमंड हिलरी हे दक्षिण ध्रुवावर पोहोचले.
- 1831 : सावित्रीबाई फुले, आधुनिक भारतातील प्रथम स्त्री शिक्षिका, समाजसुधारक, महात्मा जोतीराव फुले यांची पत्नी यांचा जन्म.