Current Affairs of 3 January 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (3 जानेवारी 2017)
अग्नी-4 ची यशस्वी चाचणी :
- भारताने दीर्घ पल्ल्याच्या अत्याधुनिक “अग्नी 4” या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची यशस्वीपणे चाचणी घेतली.
- बंगालच्या उपसागरात ओडिशाजवळ असलेल्या अब्दुल कलाम बेटांवरून रोड मोबाईल यंत्रणेद्वारे ही चाचणी घेण्यात आली.
- “अग्नी 4”चा पल्ला चार हजार किलोमीटरचा आहे. युद्धसामग्री वाहून नेण्याची क्षमता असलेल्या या क्षेपणास्त्रामध्ये अनेक नवीन तंत्रज्ञानाचा समावेश केला असल्याने हे जगभरातील अत्याधुनिक क्षेपणास्त्रांपैकी एक समजले जात आहे.
- संरक्षण दलातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्षेपणास्त्रामधील यंत्रणेमध्ये एव्हिऑनिक्स तंत्रज्ञानाचा वापर केला असल्याने त्याची विश्वासार्हता वाढली आहे. क्षेपणास्त्रातील स्वदेशी बनावटीचे लेझर तंत्रज्ञान आणि मायक्रो नेव्हिगेशन सिस्टीम यांचीही चाचणी घेण्यात आली.
- इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) या क्षेपणास्त्राची निर्मिती केली आहे.
- मध्यम पल्ल्याच्या अग्नी वर्गातील क्षेपणास्त्रांमधील हे चौथे क्षेपणास्त्र आहे. या पूर्वीची अग्नी-1, 2 आणि 3 या पूर्वीच लष्करात दाखल झाली आहेत.
- भारतीय शहरे टप्प्यात आणणाऱ्या चीनच्या क्षेपणास्त्रांना उत्तर म्हणून “अग्नी-4” कडे पाहिले जात आहे.
Must Read (नक्की वाचा):
शैलेश देव हवाई दलाचे नवे उपप्रमुख :
- नागपूरचे सुपुत्र असलेले एअर मार्शल शैलेश बी.देव यांनी येथील ‘वायू भवन’ मुख्यालयात 2 जानेवारी रोजी भारतीय हवाई दलाच्या उपप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली.
- पदग्रहणाआधी त्यांनी इंडिया गेटवर जाऊन ‘अमर जवान ज्योती’ येथे आदरांजली वाहिली. नंतर त्यांना समारंभपूर्वक मानवंदना देण्यात आली.
- लढाऊ वैमानिक म्हणून हवाई दलात दाखल झालेल्या एअर मार्शल देव यांनी अनेक महत्वाची पदे भूषविली. उपप्रमुख होण्याआधी ते हवाई दलाच्या पश्चिम कमांडचे प्रमुख होते.
- 37 वर्षांच्या सेवेत बजावलेली गुणवत्तापूर्वक सेवा आणि उत्तम व्यावसायिक कौशल्य या बद्दल राष्ट्रपतींनी त्यांचा ‘परम विशिष्ठ सेवा मेडल’, ‘अति विशिष्ठ सेवा मेडल’, ‘वायू सेना मेडल’ आणि ‘विशिष्ठ सेवा मेडल’ देऊन गौरव केला आहे.
- तसेच राष्ट्रपतींचे ‘एडीसी’ म्हणून काम करण्याचा बहुमानही त्यांना मिळाला.
बीसीसीआयमधून अनुराग ठाकूर बडतर्फ :
- लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर सर्वोच्च न्यायालयाने 2 जानेवारी रोजी निर्णायक आसूड ओढला आणि मंडळाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर व चिटणीस अजय शिर्के यांची त्या पदांवरून तडकाफडकी निलंबित केले.
- तसेच येत्या 19 जानेवारीस मंडळावर प्रशासक मंडळ नेमले जाईल व हे प्रशासक लोढा समितीच्या देखरेखीखाली मंडळाचा कारभार करेल, असेही आदेश न्यायालयाने दिला.
- क्रिकेट संघटनांमध्ये पादर्शकता आणि उत्तरदायित्व आणण्यात अपयशी ठरल्याप्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष (बीसीसीआय) अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांना पदावरून हटविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले.
पिंपरीतील दोन विद्यार्थ्यांची गिनिज बुकात नोंद :
- गिनिज बुक ऑफ द वर्ल्डमध्ये विक्रम नोंदविण्यासाठी थायलंड येथे समुद्राच्या पाण्याखाली तयार केलेल्या मानवी साखळीत पिंपरीतील दोन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यांचे शहरवासीयांकडून कौतुक करण्यात येत आहे.
- पिंपरीतील पोदार शाळेत शिकणाऱ्या सोहम ठाकूर (पाचवी), तनिषा ठाकूर (आठवी) या विद्यार्थ्यांनी विश्वविक्रम नोंदविलेल्या (स्क्युबा डायव्हिंग मानवी साखळी) उपक्रमात सहभाग घेतला. त्यांना या सहभागाबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
- तसेच यापूर्वी अशाच प्रकारचा विश्वविक्रम 173 लोकांनी इटली येथे एकत्रित येऊन नोंदवला होता. थायलंड येथे नुकत्याच नोंदवल्या गेलेल्या या विश्वविक्रमात 182 जणांचा सहभाग होता.
दिनविशेष :
- 3 जानेवारी हा महिला मुक्ती दिन आहे, तसेच बालिका दिन पण आहे.
- 3 जानेवारी 1931 ही आधुनिक भारतातील प्रथम स्त्री शिक्षिका, समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन आहे.
- महात्मा गांधीनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी गोलमेज परिषदेची स्थापना 3 जानेवारी 1931 रोजी केली .
- 3 जानेवारी 1950 रोजी पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेची सुरुवात झाली.
- स्वतंत्र भारतात पहिल्या राष्ट्रीय निवडणुका 3 जानेवारी 1952 रोजी झाल्या.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा