चालू घडामोडी (3 मार्च 2017)
रिझर्व्ह बँकेकडून सायबर सुरक्षेसाठी नवी समिती :
- सायबर सुरक्षेला असलेल्या धोक्याचा अभ्यास करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने आंतरशाखीय स्थायी समितीची स्थापना केली आहे.
- सध्याचे तंत्रज्ञान आणि आगामी काळात येऊ शकणारे तंत्रज्ञान अशा दोन्ही संदर्भात समिती अभ्यास करणार आहे.
- ही 11 सदस्यांची समिती सुरक्षाविषयक मानके आणि शिष्टाचार याचा अभ्यास समिती करेल, तसेच सायबर सुरक्षा मजबूत करण्यास योग्य धोरणात्मक हस्तक्षेपाबाबत शिफारशी करील.
- रिझर्व्ह बँकेच्या कार्यकारी संचालक मीना हेमचंद्र यांच्या नेतृत्वाखाली ही समिती काम करणार आहे. आणखी जाणकारांना समितीवर घेतले जाऊ शकते, तसेच विशिष्ट मुद्द्यांच्या अभ्यासासाठी उपसमित्यांची स्थापनाही होऊ शकते.
- रिझर्व्ह बँकेने जूनमध्ये देशातील सर्व बँकांसाठी सायबर सुरक्षेबाबत काळजी घेण्याचे निर्देश दिले होते. त्यासाठी काही मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या होत्या.
- रिझर्व्ह बँकेने म्हटले की, “या सूचनांनंतर बँकांनी सायबर सुरक्षेसाठी पावले उचलली. तथापि, हल्ल्याचे स्वरूप ठरीव साच्यातील नसते. कुठल्याही स्वरूपात हल्ले होऊ शकतात. त्यामुळे सुरक्षेचा आढावा घेणे आवश्यक आहे. त्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.”
नरसिंग यादवकडून पूर्णा रावराणेचा गौरव :
- तुर्कस्थान येथे गतवर्षी झालेल्या जागतिक शालेय अॅथलेटिक्स स्पर्धेत चमकदार कामगिरी करुन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करणाऱ्या पूर्णा रावराणेचा स्टार मल्ल नरसिंग यादवच्या हस्ते गौरव करण्यात आला.
- मुंबई अॅथलेटिक्स स्पर्धांत कायम आपली छाप पाडणाऱ्या दहिसर येथील व्हीपीएम स्पोटर्स क्लबच्या 27व्या वार्षिक पुरस्कार कार्यक्रमात नरसिंगची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. यावेळी, क्लबच्या गुणवान खेळाडूंना नरसिंगच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
- जागतिक शालेय स्पर्धेत पूर्णाने गोळाफेक प्रकारात राष्ट्रीय विक्रमाची नोंद करत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली होती. मात्र, पदकाने तीला थोडक्यात हुलकावणी दिली.
- विशेष म्हणजे फारशा सुविधा नसतानाही पूर्णाने केवळ व्हीपीएम क्लबमधील कठोर सरावाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय झेप घेत लक्षवेधी कामगिरी केली. त्याचप्रमाणे कॉसमॉस परेरा यांना व्हीपीएम भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच राष्ट्रीय स्तरावर चमकलेल्या क्लबच्या एकूण 12 खेळाडूंनाही यावेळी गौरविण्यात आले.
पृथ्वीवरील सर्वांत जुन्या जीवाश्मांचा शोध :
- वैज्ञानिकांनी पृथ्वीवरील सर्वात जुन्या जीवाश्मांचा शोध लावला आहे. कॅनडात शोधलेले सूक्ष्मजीवांचे हे अवशेष 3.8 ते 4.3 अब्ज वर्षांपूर्वीचे असल्याचा दावा करण्यात येत आहे. या अवशेषात सूक्ष्म तंतू आणि ट्यूब्स आहेत.
- कॅनडातील क्विबेक शहरात एका चमकणाऱ्या दगडात हे अवशेष आढळून आले आहेत. हे सूक्ष्म जीव लोखंडावर राहत होते. असे जीव 3770 दशलक्ष वर्षांपूर्वी आढळत होते, असे संशोधकांनी सांगितले.
- समुद्राच्या हायड्रोथर्मल सिस्टीममध्ये हे जीव राहत होते. ही समुद्रातील अशी जागा आहे जिथे ज्वालीमुखीच्या हालचाली कमी होतात. या भागातील गरम पाण्यामुळे हे जीव येथे वाढले असावेत, असाही दावा करण्यात येत आहे.
- यूनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनचे या टीममधील एक सदस्य मॅथ्यू डोड यांनी सांगितले की, पृथ्वीच्या निर्मितीनंतर काही काळातच समुद्रात या जिवांची निर्मिती झाली. ज्यावेळी हे जीव पृथ्वीवर होते तेव्हा मंगळावर पाणी होते, असा दावाही यात करण्यात आला आहे.
- पृथ्वीवरील हे सर्वात जुने जीव असल्याचे संशोधकांचे म्हणणे असून विश्वात इतरत्र जीवनाच्या खुणा शोधण्यासही याचा उपयोग होईल, असा दावा केला जात आहे.
रेल्वे तिकिटासाठी ‘आधार कार्ड’ बंधनकारक :
- रेल्वेने आता ऑनलाइन तिकिटांसाठी आधार कार्ड बंधनकारक करण्याचे ठरविले आहे. आधार कार्ड नसलेल्यांना यापुढे ऑनलाइन तिकिटांची खरेदीच करता येणार नाही.
- काही जण तिकिटांची बोगस नावाने एकगठ्ठा खरेदी करतात आणि नंतर ती जादा भावाने विकतात. दलालांनाही आळा घालणे हा आधार कार्ड सक्ती करण्याचा हेतू आहे.
- आयआरसीटीसीच्या साइटवर वन टाइम रजिस्ट्रेशनसाठी आधार कार्डचा क्रमांक अनिवार्य असेल. त्यामुळे खोटी ओळख देऊन तिकीट आरक्षित करणाऱ्यांना आळा बसेल, असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
- रेल्वे तिकिटांवर सवलत मिळवण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना येत्या 1 एप्रिलपासून आपला आधार क्रमांक द्यावा लागणार आहे. कॅशलेस तिकीट विक्रीला चालना देण्यास सहा हजार पॉइंट ऑफ सेल मशिन्स बसवण्यात येणार आहेत.
दिनविशेष :
- 3 मार्च 1839 रोजी टेलिफोनचा जनक ग्रॅहॅम बेल यांचा जन्म झाला.
- प्लेग प्रतिबंधक लस शोधणाऱ्या डॉ. हापकीन यांचा जन्म 3 मार्च 1860 रोजी झाले.
- 3 मार्च 1991 रोजी रेल्वे कर्मचाऱ्यांचे पहिले मराठी साहित्य संमेलन झाले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा