चालू घडामोडी (3 मे 2016)
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांसाठी कोटींचा निधी मंजूर :
- महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारने 188 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
- तसेच यात नाशिकसाठी 34.9 कोटी आणि सिंधुदुर्गसाठी 82.76 कोटी रुपयांचा समावेश आहे.
- मंजूर केलेल्या निधीपैकी 30.23 कोटी महाराष्ट्र सरकारला आधीच दिले आहेत.
- केंद्रीय पर्यटनमंत्री महेश शर्मा यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
- शर्मा म्हणाले, पर्यटन स्थळांची ओळख पटविणे आणि तेथे पर्यटकांसाठी सुविधा विकसित करणे हे राज्य सरकारचे काम आहे. राज्य सरकारने नाशिक येथे एकूण 49 पर्यटन स्थळे चिन्हित केलेली आहेत.
- तसेच त्यात त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, इगतपुरी, कोटामगाव, चंदवाद, ताकेड, अंजनेरी, मांगीतुंगी मंदिर, नंदूर, बालाजी मंदिर, हरिहर किल्ला, तपोवन, पांडव लेणी, पंचवटी, सीता लेणी, श्री सोमेश्वर मंदिर, गंगा गोदावरी मंदिर, रामकुंड, अण्णा गणपती मंदिर आणि माधमेश्वर यांचा समावेश आहे.
- तर थीम आधारित पर्यटन विकासासाठी केंद्र सरकारने ‘प्रसाद’ आणि ‘स्वदेश दर्शन’ अशा दोन योजना सुरू केल्या आहेत.
- ‘स्वदेश दर्शन’अंतर्गत महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग तटवर्तीय सर्किटच्या विकासासाठी 82.76 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
चार नगरपंचायीतीचे आरक्षण जाहीर :
- जिल्ह्यात नव्याने जाहीर झालेल्या पलूस पालिका आणि कडेगाव, खानापूर, कवठेमहांकाळ, शिराळा नगरपंचायत निवडणुकीसाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादीसह भाजप आणि शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तयारी सुरू केली आहे.
- प्रत्येक ठिकाणी 17 प्रभागांचे आरक्षण जाहीर झाले आहे.
- पलूस पालिका आणि कडेगाव, खानापूर, कवठेमहांकाळ, शिराळा नगरपंचायतींसाठी प्रथमच निवडणूक होत असली तरी या ठिकाणी पारंपरिक कॉंग्रेस व राष्ट्रवादी या दोन पक्षातच लढतीचे चित्र सध्या आहेत.
- विधानसभा निवडणुकीपासून जिल्ह्यातील बदललेल्या राजकीय घडामोडींची या निवडणुकीवर छाप पडणार आहे.
- मात्र माजी सभापती बापू येसुगडे यांच्या भूमिकेवर दोन्ही पक्षाचे भवितव्य आहे.
- आरक्षण जाहीर होताच विविध राजकीय पक्षांनी व्यूहरचनेस सुरवात केली आहे.
- नगरपालिका किंवा नगरपंचायतीची घोषणा झाल्यापासून किमान सहा महिन्यांत निवडणुका घ्याव्यात, असा नियम आहे.
भारत-अमेरिकेमध्ये नौदलला अधिक सहकार्य :
- भारत आणि अमेरिकेमध्ये हिंदी महासागरामधील पाणबुड्यांवर लक्ष ठेवण्यासाठी एकमेकांस मदत करण्यासंदर्भातील चर्चा सुरू असल्याचे वृत्त असून, यामुळे दोन देशांमधील संरक्षणात्मक सहकार्य आणखी बळकट होण्याची शक्यता आहे.
- दक्षिण चिनी समुद्र आणि हिंदी महासागरामधील चीनच्या वाढत्या आक्रमकतेच्या पार्श्वभूमीवर भारत व अमेरिकेमधील संरक्षणात्मक सहकार्य अत्यंत संवेदनशील मानले जात आहे.
- गेल्या महिन्यामध्येच भारत व अमेरिकेमध्ये ‘लॉजिस्टिक्स सपोर्ट ऍग्रिमेंट’ (एलएसए) करारास तत्त्वत: मान्यता देण्यात आली असून, दोन्ही देशांच्या नौदलांमध्येही पाणबुडीविरोधातील अत्यंत संवेदनशील तंत्रज्ञानासंदर्भात (अँटी सबमरिन वॉरफेअर) चर्चा होणार आहे.
- अशा स्वरूपाच्या निर्णयांमधून दोन्ही देशांच्या नौदलांमधील सहकार्याने टप्प्याटप्प्याने विकसित होईल, असा आशावाद ओबामा प्रशासनामधील एका उच्चाधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.
- ‘एलएसए’ करारान्वये दोन्ही देशांच्या लष्करांस आवश्यक असलेल्या साहित्याचा पुरवठा, पायाभूत सुविधा एकमेकांच्या भूमीवर उपलब्ध करून देता येणे शक्य आहे.
- तसेच या कराराचा वापर संयुक्त लष्करी सराव, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन व शांतिकाळात केला जाऊ शकतो.
महात्मा फुलेंच्या जीवनावर चित्रपट :
- थोर समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांच्या जीवनावरील चित्रपट निर्मितीचा प्रश्न 12 वर्षे रेंगाळलेला आहे.
- तसेच या प्रस्तावावर तत्काळ कार्यवाही सुरू करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला, त्यामुळे या थोर समाजसुधारकाच्या 125 व्या स्मृती वर्षात चित्रपटाची निर्मिती आणि प्रदर्शन होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, याद्वारे सरकारकडून त्यांना अनोखी आदरांजली अर्पण केली जाणार आहे.
- महात्मा फुले यांच्या जीवनावर पूर्ण लांबीचा चित्रपट निर्माण करण्याचा निर्णय 24 जुलै 2002 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता.
- तसेच 15 मार्च 2003 रोजी सरकारचा निर्णय झाला, यानुसार हा चित्रपट केंद्र सरकार, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकार यांच्या वतीने तयार करण्याचे ठरविण्यात आले होते.
- निर्मितीची जबाबदारी राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळावर (एनएफडीसी) सोपविण्यात आली होती.
- राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने चित्रपटासाठी आवश्यक असणाऱ्या खर्चाचा सुधारित आराखडा सादर केला आहे.
- तसेच याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी या चित्रपटाच्या निर्मितीबाबत तत्काळ कार्यवाहीचा आदेश दिला आहे.
पुण्याच्या संघात जॉर्ज बेलीचा समावेश :
- प्रमुख खेळाडूंना दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर पडावे लागल्याने त्रासलेल्या ‘रायझिंग सुपरजायंट्स पुणे’ या ‘आयपीएल’मधील संघाने आता ऑस्ट्रेलियाच्या जॉर्ज बेलीला करारबद्ध केले आहे.
- कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघातील केवीन पीटरसन, फाफ डू प्लेसिस, मिशेल मार्श आणि स्टीव्ह स्मिथ हे चार प्रमुख परदेशी खेळाडू जायबंदी झाले आहेत.
- पीटरसन दुखापग्रस्त झाल्यानंतर पुण्याने ऑस्ट्रेलियाच्याच उस्मान ख्वाजाशी करार केला, तो अद्याप संघात दाखल झालेला नाही.
- तसेच फाफ डू प्लेसिसही बाहेर पडल्याने त्याच्याऐवजी बेलीची निवड करण्यात आली.
- बेली आतापर्यंत ‘आयपीएल’चे 34 सामने खेळला आहे. त्यात त्याने 129.82 च्या स्ट्राईक रेटने 579 धावा केल्या आहेत.
- आतापर्यंत ‘रायझिंग सुपरजायंट्स पुणे’ संघाचे आठ सामने झाले आहेत. त्यात त्यांना दोनच विजय मिळविता आले असून सहा पराभव झाले आहेत.
- चार गुणांसह पुण्याचा संघ सध्या गुणतक्त्यात सहाव्या स्थानी आहे.
जन संघाचे संस्थापक बलराज मधोक यांचे निधन :
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते आणि भारतीय जन संघाचे संस्थापक बलराज मधोक (वय 96) यांचे (दि.3) वृद्धापकाळाने निधन झाले.
- 1961 आणि 1967 मध्ये दिल्ली आणि दक्षिण दिल्लीत लोकसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते.
- त्यांचा जन्म जम्मू आणि काश्मिरातील स्कर्डू येथे 25 फेब्रुवारी 1920 रोजी झाला होता.
- तसेच ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संस्थापक सचिव होते.
- जनसंघ, अभाविपबरोबरच त्यांनी साप्ताहिक “ऑर्गनायझर”चे आणि ‘वीर अर्जुन’चे संपादकपदही भूषविले होते.
दिनविशेष :
- 1898 : चित्रपट महर्षी भालजी पेंढारकर, मराठी चित्रपट दिग्दर्शक यांचा जन्म.
- 1913 : ‘राजा हरिश्चंद्र’ हा पहिला भारतीय चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.
- पोलंड, जपान संविधान दिन.
- आंतरराष्ट्रीय सूर्य दिन.
- जागतिक श्वसनदाह निवारण दिन.
- पत्रकारिता अभिस्वातंत्र्य दिन.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा