Current Affairs of 3 November 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी 3 नोव्हेंबर 2016)

स्त्री सन्मान साहित्य संमेलन पुरस्कार जाहीर :

  • मुंबई येथे साहित्यक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सुप्रसिद्ध स्त्री साहित्यिका गिरीजा कीर माधवी कुंटे यांनी ऋजुता फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘स्त्री सन्मान साहित्य संमेलना’चे विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.
  • गिरीजा कीर यांना ‘स्त्री सन्मान साहित्य पुरस्कार’ आणि माधवी कुंटे यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
  • साहित्याच्या नभांगणातील एक लखलखीत नक्षत्र असा लौकिक असलेल्या गिरीजा कीर यांनी कथा, कादंबरी, व्यक्तिचित्रणे, चरित्रे, ललित लेख, मुलाखती, आत्मचरित्र, बालसाहित्य असे बहुविध आकृतिबंध लेखनप्रकार समर्थपणे हाताळले आहेत.
  • तसेच अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षादेखील होत्या.
  • ज्येष्ठ साहित्यिका माधवी कुंटे यांची कथा, कादंबरी, ललितलेख व बालसाहित्य या क्षेत्रातील चतुरस्त्र मुशाफिरी निर्विवादपणे लक्षवेधक आहे.
  • समकालीन व भविष्यकालीन समस्यांचा वेध घेणारे सकस लेखन हे त्यांचे वेगळेपण आहे.
  • रंजन व उद्बोधन यांचा समन्वय साधत, त्यांनी आपल्या लेखणीचे विभिन्न साहित्य आविष्कार साकारले आहेत.

दिल्लीमध्ये होणार आपत्ती व्यवस्थापन परिषद :

  • आपत्तीची संभाव्यता आणि तीव्रता कमी करण्याच्या संदर्भात गेल्या वर्षी जपानमध्ये झालेल्या आपत्ती व्यवस्थापनविषयक परिषदेतील निर्णयांच्या अंमलबजावणीची रूपरेषा तयार करणे.
  • तसेच या कामात विविध देशांनी परस्परांना सहकार्य करणे, मदतीची देवाणघेवाण आदी विषायांवरील आशियाई देशांची तीन दिवसांची मंत्री परिषद 3 नोव्हेंबर पासून दिल्लीत सुरू होणार आहे.
  • परिषदेच्या अखेरीस आपत्ती व्यवस्थापनाबाबतचा “दिल्ली जाहीरनामा” जारी केला जाणार आहे.
  • तसेच या परिषदेचे यजमानपद भारताकडे आहे आणि केंद्रीय गृह मंत्रालयाची यामध्ये मुख्य भूमिका असेल.
  • जपानसह सर्व आशियाई देशांचे प्रतिनिधी यामध्ये सहभागी होणार आहेत.
  • एकंदर चार हजार प्रतिनिधी परिषदेस उपस्थित राहतील. यामध्ये सुमारे 1100 परदेशी प्रतिनिधी असतील, तर अन्य उपस्थितांमध्ये राज्यांचे मुख्यमंत्री, मुख्य सचिव, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांचे प्रमुख, तज्ज्ञ आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल.

सूखकर वातावरण निर्माण करणाऱ्या राज्यांच्या यादीत आंध्र प्रदेश अग्रस्थानी :

  • देशात व्यवसाय करण्यासाठी सर्वांत सुखकर वातावरण निर्माण करणाऱ्या राज्यांच्या यादीमध्ये आंध्र प्रदेश राज्याने अग्रस्थान मिळविले आहे; तर तेलंगण राज्याने व्दितीय क्रमांक मिळविला आहे.
  • केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार या दोन राज्यांमध्ये अग्रस्थानासाठी तीव्र चुरस होती.
  • व्यवसायास पूरक वातावरण तयार करण्याच्या या मोहिमेमध्ये गुजरात राज्याची घसरण झाल्याचे दिसून आले असून या यादीमध्ये गुजरातला तिसरे स्थान मिळाले आहे.
  • छत्तीसगढ राज्याने चौथे स्थान कायम राखले आहे.
  • छत्तीसगढनंतर या यादीमध्ये अनुक्रमे मध्य प्रदेश, हरयाना, झारखंड, राजस्थान, उत्तराखंड आणि महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे.
  • महाराष्ट्राचा या यादीमध्ये तब्बल 10 वा क्रमांक असल्याचे निष्पन्न झाले आहे.
  • कर्नाटक, उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल आणि बिहार या राज्यांना या यादीमध्ये “उदयोन्मुख नेतृत्व” असे संबोधण्यात आले आहे.

अक्षर पटेलचा आयसीसी क्रमवारीत टॉप 10 मध्ये समावेश :

  • अष्टपैलू म्हणून नावारूपाला येणारा भारताचा अक्षर पटेल आयसीसी एकदिवसीय क्रमवारी पहिल्या दहांत आला आहे.

  • पहिल्या दहांत स्थान मिळविणारा तो एकमेव भारतीय गोलंदाज आहे.
  • अक्षरने नुकत्याच झालेल्या भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेत चार गडी बाद केले होते.
  • तसेच आयसीसी क्रमवारीत तो नवव्या स्थानावर आला आहे. त्यानंतर लेगस्पिनर अमित मिश्रा पहिल्या विसांत आला आहे.
  • मिश्राने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत 15 गडी बाद केले. तो आफ्रिकेच्या डेल स्टेनच्या साथीत 12व्या स्थानावर आहे.
  • गोलंदाजी क्रमवारीत सुधारणा करणाऱ्या अन्य भारतीय गोलंदाजांमध्ये उमेश यादव आणि जसप्रित बुमरा यांचा समावेश आहे.
  • न्यूझीलंडविरुद्ध आठ गडी बाद करणारा उमेश 35; तर बुमरा 57व्या स्थानावर आहे.
  • गोलंदाजी क्रमवारीत न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने आघाडीचे स्थान कायम राखले आहे.
  • वेस्ट इंडीजचा सुनील नारायण दुसऱ्या; तर दक्षिण आफ्रिकेचा इम्रान ताहिर तिसऱ्या स्थानावर आहे.

दिनविशेष :

  • द टाइम्स ऑफ इंडिया ची द बॉम्बे टाइम्स ॲण्ड जर्नल ऑफ कॉमर्स या नावाने 3 नोव्हेंबर 1838 रोजी स्थापना.
  • 3 नोव्हेंबर 1903 रोजी शेव्हरोले ची स्थापना करण्यात आली.
  • पोलंड रशीयापासून 3 नोव्हेंबर 1918 रोजी स्वतंत्र झाला.
  • 3 नोव्हेंबर 1618 रोजी मोगल सम्राट औरंगजेब यांचा जन्म झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Shital Burkule

Shital is very passionate content writer and likes to write about more stuff related to news about education.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

12 months ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

1 year ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

1 year ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago