चालू घडामोडी (3 ऑक्टोबर 2016)
डिजिटल लॉकरमध्ये महाराष्ट्र प्रथम स्थानी :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या ‘डिजिटल इंडिया’ कार्यक्रमांतर्गत ‘डिजिटल लॉकर योजने’चा देशात सर्वाधिक लाभ घेण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे.
- देशातील सर्वांसाठी असलेल्या या सेवेमुळे वेळ व कष्ट वाचतोच, शिवाय सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या लॉकरमुळे कागदपत्रांची सॉफ्टकॉपी आपणास हवी तेव्हा मिळू शकते.
- तसेच अवघ्या दीड वर्षात 26 लाख 66 हजार 832 इतके नागरिक हे लॉकर वापरत आहेत.
- एकप्रकारे ‘इलेक्ट्रॉनिक तिजोरी’च असलेल्या या लॉकरचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे.
- फेब्रुवारी 2015 मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या योजनेचा प्रारंभ झाला.
- सध्या डिजिटलचे युग असल्याने सर्वच क्षेत्रांत पेपरलेस कामकाजाला प्राधान्य दिले जात आहे.
- तसेच त्यामुळे जन्मदाखल्यापासून शालेय, पदवीची प्रमाणपत्रे, महसूल विभागातील दस्तावेज, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, आदी अनेक महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवणे आणि सहजासहजी उपलब्ध करणे यामुळे शक्य होणार आहे.
पॅरिस करारावर भारताची स्वाक्षरी :
- हरित वायूंच्या उत्सर्जनामध्ये जगात तिसऱ्या स्थानी असलेल्या भारताने ऐतिहासिक पॅरिस तापमान करारावर (दि.2) स्वाक्षरी केली.
- भारताचे संयुक्त राष्ट्रसंघातील कायमस्वरूपी प्रतिनिधी सईद अकबरुद्दीन यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वाक्षरी केलेला करार संयुक्त राष्ट्रसंघाचे करार विभागाचे प्रमुख सॅंटियागो विलालपॅंडो यांच्याकडे सुपूर्त केला.
- तापमान वाढीबाबत भारताने उचललेल्या पावलाचे संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस बान की-मून यांनी कौतुक केले.
- महात्मा गांधी यांचा जनता आणि पृथ्वीविषयीचा वारसा एकप्रकारे भारत पुढे नेत आहे.
- सर्वच देशांनी या करारावर स्वाक्षरी करावी आणि अहिंसेच्या मार्गाने प्रगतीचा मार्ग अनुसरण्याची गरज आहे.
- तसेच या करारामुळे भारत तापमान बदलांच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठीच्या जागतिक उपाययोजनांमध्ये सहभागी होणार आहे.
कोरिया ओपन गोल्फ स्पर्धेत गगनजितला विजेतेपद :
- भारताचा अव्वल गोल्फपटू गगनजित भुल्लरने चौथ्या आणि शेवटच्या फेरीत 4 अंडर 67 आणि एकूण 15 अंडर 269 गुणांची खेळी करून 10 लाख डॉलर रोख पुरस्काराच्या कोरिया ओपन गोल्फ स्पर्धेत विजेतेपद जिंकले.
- गगनजितचा एशियन टूरमधील सहावे आणि एकूण सातवे आंतरराष्ट्रीय विजेतेपद आहे.
- दोन वर्षांनंतर जोरदार पुनरागमन करून जेतेपद जिंकणाऱ्या 28 वर्षीय गगनजितने चार राऊंडमध्ये 68, 66, 68 व 67 गुणांची (कार्ड) खेळी केली.
- गगनजितने जबरदस्त खेळी करून झिम्बाब्वेचा स्कॉट व्हिन्सेंट आणि स्थानिक गोल्फपटू तेईवू किमला एका शॉटच्या अंतराने मागे टाकून विजेतेपद आपल्या नावावर केले.
- गगनजितला हे विजेतेपद जिंकल्यानंतर एकूण 1 लाख 96 हजार डॉलरचे रोख पारितोषिक मिळाले.
- तसेच गगनजितने एशियन टूरमध्ये 2013 मध्ये शेवटचे जेतेपद जिंकले होते.
महाराष्ट्र पहिले डिजिटल राज्य होणार :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम महाराष्ट्र करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सेवा हमी कायद्यांतर्गत (दि.2) 163 सेवा ऑनलाइन केल्या असून, आतापर्यंत 369 सेवा ऑनलाइन झाल्या आहेत.
- तसेच नागपूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती डिजिटल झाल्याने हा राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा झाला असून, महाराष्ट्र हा देशातील पहिले डिजिटल राज्य करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
- सायन येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित सेवा हमी कायद्यांतर्गत 163 नवीन सेवा ऑनलाइन करणे, नागपूर जिल्हा डिजिटल जिल्हा घोषित करणे या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
- तसेच या वेळी फडणवीस म्हणाले, की सेवा हमी कायद्यातील सेवा ऑनलाइन देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असून, या अंतर्गत राज्यातील नागरिकांना वेळेत सेवा मिळण्याचा हक्क मिळाला आहे.
- आतापर्यंत 24 विभागांच्या 369 सेवा सर्वसामान्यांना आता घरबसल्या घेता येतील.
- नागरिकांना कोणत्याही सरकारी कार्यालयात न जाता आपले सरकार वेबपोर्टलच्या माध्यमातून अर्ज, तक्रारी करता येणार आहेत.
- ऑनलाइन सेवेमुळे प्रशासनात पारदर्शकता, गतिमानता व कार्यक्षमतेत वाढ होणार आहे.
- सेवा हमी कायद्यामुळे जनतेला सेवा हक्क, तर प्रशासनावर वेळेत सेवा देण्याची जबाबदारी पडली आहे.
-
- आपले सरकार वेब पोर्टलच्या माध्यामातून सामान्य नागरिकांच्या तक्रारीचे निवारण तत्काळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
- डिजिटल सेवा गावापर्यंत पोचविण्यासाठी प्रत्येक गावात आपले सरकार सेवा केंद्र उभारण्यात येणार आहे.
शहरातील सर्वांत स्वच्छ भाग ‘एसआरपीएफ ग्रुप 2’ :
- महापालिकेने जाहीर केलेल्या स्पर्धेमध्ये प्रवेशिकाच येत नसल्याने चर्चेत आलेल्या स्वच्छता स्पर्धेचा निकाल (दि.2) जाहीर करण्यात आला.
- शहरातील सर्वांत स्वच्छ सार्वजनिक क्षेत्र म्हणून ‘एसआरपीएफ ग्रुप भाग 2’ याची निवड झाली आहे.
- तसेच सर्वांत स्वच्छ सोसायटी म्हणून कुमार सबलाइम यांची, सर्वांत सुंदर खासगी संस्था म्हणून जीईई इंजिनियरिंग इंडिया यांची, सर्वांत सुंदर शाळा म्हणून मिलिनियम नॅशनल स्कूल, तर सुंदर स्वयंसेवी संस्था म्हणून शेल्टर असोसिएटची निवड करण्यात आली आहे.
- महापालिकेच्या वतीने दर वर्षीप्रमाणे यंदाही स्वच्छता पुरस्कारांची योजना जाहीर करण्यात आली होती.
- या स्पर्धेचा निकाल महात्मा गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आला.
- वेगवेगळ्या विभागातील 17 पारितोषिके या वेळी जाहीर करण्यात आली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा