चालू घडामोडी (30 जानेवारी 2016)
ऑस्ट्रेलियात भारतीयांचा विजय :
- भारतीय महिला आणि पुरुष खेळाडूंनी (दि.29) मैदानावर इतिहास घडवला.
- महिला आणि पुरुष क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची ‘टी-20’ मालिका जिंकताना ऑस्ट्रेलियात प्रथमच एखादी मालिका जिंकण्याची कामगिरी केली.
- त्याच वेळी सानिया मिर्झाने मार्टिना हिंगीसच्या साथीत ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीतील आणखी एक विजेतेपद मिळविले.
- पुरुष संघाचाही मालिका विजय
- भारतीय पुरुष संघाने ऑस्ट्रेलियात फारशा द्विपक्षीय मालिका खेळलेल्या नाहीत.
- महेंद्रसिंह धोनीच्या संघाने टी 20 सामन्यांची मालिका जिंकून इतिहास घडवला.
- आतापर्यंत कसोटी, एकदिवसीय आणि ‘टी 20’ क्रिकेट प्रकारात भारताला येथे मालिका विजय मिळविता आला नव्हता, या वेळी तो त्यांनी साध्य केला.
- रोहित शर्मा, विराट कोहली आणि शिखर धवन यांची अर्धशतके निर्णायक ठरली.
- महिला क्रिकेट – ऐतिहासिक विजय मेलबर्नच्या क्रिकेट मैदानावर सर्वांत प्रथम भारतीय महिला संघाने तीन वेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध टी 20 मालिका जिंकली.
- या सामन्यात डकवर्थ लुईस नियमाचा आधार घेत त्यांनी ऑस्ट्रेलियावर दहा गडी राखून दणदणीत विजय मिळविला.
- आतापर्यंत भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान महिलांचे अकरा सामने झाले असून, त्यात केवळ तिसऱ्यांदाच भारतीय महिलांना विजय मिळविता आला आहे.
- सानियाचा विजय कायम
- महिला टेनिसमध्ये दुहेरीत सानिया मिर्झाने मार्टिना हिंगीसच्या साथीत आपला विजय कायम राखला.
- त्यांनी अँड्रिया हॅलावाच्कोवा-ल्युसी ऱ्हादेच्का जोडीचा पराभव करून ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धा जिंकून मोसमाची ‘ग्रॅंड’ सुरवात केली.
- ऑस्ट्रेलियन स्पर्धेत त्यांचे पहिलेच विजेतेपद असले, तरी त्यांनी सलग तिसऱ्यांदा ग्रॅंड स्लॅम विजेतेपद मिळविले.
- सानियाचे हे कारकिर्दीमधील सहावे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद ठरले.
इराणच्या अर्थव्यवस्था :
- अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि युरोपीय महासंघासोबत झालेल्या अणुकराराचे पालन केल्यामुळे, इराणवरील कठोर आर्थिक निर्बंध उठवत असल्याचे अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांनी जाहीर केले.
- इराणमधील 1979 च्या इस्लामी क्रांतीनंतर तेथील बंडखोरांनी 52 अमेरिकी अधिकाऱ्यांना तब्बल 444 दिवस ओलिस ठेवले होते.
- क्रांतीत इराणमधील मोहंमद रझा शाह पहलवींचे सरकार उलथवून लावल्यानंतर आजतगायत अयातोल्ला अली खोमेनी यांच्या आणि त्यांच्या समर्थक गटाचे वर्चस्व इराणमध्ये आहे.
- 1979 च्या क्रांतीपर्यंत अमेरिकेचा पश्चिम आशियामधील भरवशाचा मित्र असलेल्या इराणवर नंतर मात्र संक्रांत आली.
मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त :
- मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून दत्तात्रय पडसलगीकर असतील, यांच्यापूर्वी अहमद जावेद हे मुंबईचे पोलीस आयुक्त होते.
- भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) 1982 च्या तुकडीचे पडसलगीकर यांच्या नियुक्तीचा आदेश राज्य सरकार 30 जानेवारी रोजी जारी करील.
- साधारण पंधरवड्यापूर्वी पडसलगीकर यांना गुप्तचर विभागातून (आयबी) पुन्हा महाराष्ट्र केडरमध्ये सामावून घेण्यात आले. ते अहमद यांच्याकडून पदाची सूत्रे स्विकारतील.
- अहमद जावेद यांची सौदी अरेबियात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली असून दोन आठवड्यांत ते रुजू होतील.
- पूर्ण नऊ वर्षांनंतर मुंबईत मराठी माणून पोलीस आयुक्तपदी लाभला आहे. डी. एन. जाधव हे 2007 मध्ये पोलीस आयुक्त होते.
- आयबीमध्ये पडसलगीकर विशेष संचालकपदी कार्यरत होते, त्यांचा आयुक्तपदाचा कार्यकाळ ऑगस्ट 2018 पर्यंतचा आहे.
मुलींसाठी पोलीस व्हॅनची सेवा :
- शहरांमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या गावांकडच्या मुलींना सडक सख्याहरींचा नेहमीच त्रास सहन करावा लागतो.
- या जाचातून त्यांची सुटका करण्यासाठी बसस्थानक ते महाविद्यालयापर्यंत त्यांना पोलीसगाडीतून पोहोचवण्याची व्यवस्था पोलिसांनी केली आहे.
- या सेवेचा प्रारंभ पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला, पोलिसांच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
- फलटण शहरात मोठ्या संख्येने शाळा, महाविद्यालयासाठी ग्रामीण भागातून मुली येतात. यातील बहुसंख्य तरुणी मुधोजी कॉलेज येथे जातात.
- बसस्थानकापासून महाविद्यालय दोन किलोमीटरवर असल्याने पायी जाताना त्यांना छेडछाडीचा सामना करावा लागत होता, याबाबत तक्रारी आल्यानंतर पोलीस व्हॅन उपलब्ध करुन देण्याचा निर्णय देखमुख यांनी घेतला.
- व्हॅनमध्ये महिला पोलिसांचीही नेमणूक केली आहे, महाविद्यालयाला जाण्या-येण्याच्या वेळेत ही सेवा दिली जाणार आहे.
महिन्यात रेल्वेचे जास्तीत जास्त 6 तिकीटे बूक करता येणार :
- दलालांकडून होणारा रेल्वे तिकीटांचा काळाबाजार रोखण्यासाठी भारतीय रेल्वे प्रशासनाने ऑनलाइन तिकीट बुकिंगसाठी एक नवा नियम आणला आहे.
- या नव्या नियमानुसार, आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरील एका युजर आयडीवरून एका महिन्यात जास्तीत जास्त 6 तिकीटे बूक करता येणार आहेत.
- 15 फेब्रुवारीपासून हा नवा नियम लागू होणार आहे.
‘सायबर वॉरफेअर’साठी चिनी लष्कराची सज्जता :
- भविष्यातील संभाव्य सायबर युद्धासाठी चीनची बलाढ्य पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) सज्ज करण्यावर सध्या चीन सरकारचा भर आहे.
- ‘पीएलए’ अधिक मजबूत करण्यासाठी नवे विशेष दल स्थापन करण्यात आले आहे.
- व्यूहरचनात्मक मदत दलाची (एसएसएफ) स्थापना करण्यात आली असून, या माध्यमातून ‘पीएलए’ची ताकद काही पटीने वाढविण्याचा प्रयत्न चीन करते आहे.
- चीन सरकारने मागील वर्षाच्या अखेरीस मोठ्या लष्करी सुधारणांची घोषणा केली होती.
- तसेच त्या अंतर्गत ‘एसएसएफ’ची स्थापना करण्यात आली असून, त्यामुळे चीनच्या सैन्य दलांची ‘सायबर वॉरफेअर’ची क्षमता, अंतराळातील सुरक्षा आणि ऑनलाइन हल्ला करण्याची ताकद काही पटींनी वाढणार आहे.
उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी :
- उत्तर कोरिया लांब पल्ल्याच्या आंतरखंडीय क्षेपणास्त्र चाचणीची तयारी करीत आहे.
- काही दिवसांपासून उत्तर कोरिया क्षेपणास्त्र सोडण्याची तयारी करीत आहे, क्योडो या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र सोडण्याची तयारी डोंगचँग येथे सुरू केली असून आठवडाभरात क्षेपणास्त्र सोडले जाणार आहे.
- जपानचा मित्र देश असलेल्या अमेरिकेचे उपग्रह अवकाशातून उत्तर कोरियातील घडामोडींवर लक्ष ठेवत असून जपाननेही 2003 पासून उपग्रहामार्फत उत्तर कोरियाच्या प्रदेशावर अवकाशातून टेहळणी सुरू ठेवली आहे.
दिनविशेष :
- भारत : शहीद दिन
- 1994 : पीटर लोको बुद्धिबळातील सगळ्यात लहान ग्रँडमास्टर झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा