चालू घडामोडी (30 जुलै 2015)
याकूब मेमनला आज सकाळी फाशी :
- मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनला आज (गुरुवार) सकाळी फाशी देण्यात आली असून, त्याचा दफनविधी मुंबईत पार पडणार आहे.
- सकाळी साडेसहाच्या सुमारास याकूबला फाशी देण्यात आली.
संजीव चतुर्वेदी आणि अंशू गुप्ता यांना “रॅमन मॅगसेसे” घोषित :
- आशियातील नोबेल अशी ओळख असलेला “रॅमन मॅगसेसे” हा प्रतिष्ठेचा पुरस्कार 2014 या वर्षासाठी संजीव चतुर्वेदी आणि अंशू गुप्ता या दोन भारतीय तरुणांना घोषित झाला आहे.
- तसेच लाओस येथील कोमली चानतावोंग, फिलिपिन्सच्या लिगावा फर्नांडो-अलिबंगसा आणि म्यानमारच्या क्वॉ थू यांनाही मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या 31 ऑगस्ट रोजी फिलिपिन्समध्ये या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
- दिल्लीच्या एम्सच्या उपसचिव पदावर कार्यरत असलेले संजीव चतुर्वेदी आणि “गुंज” या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असलेले अंशू गुप्ता या दोघांना उदयोन्मुख नेतृत्वातील असामान्य कामासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
- फिलिपिन्सचे माजी अध्यक्ष रॅमन मॅगसेसे त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रॅमन मॅगसेसे फाउंडेशनच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराची सुरवात 1958 पासून झाली.
- सरकारी सेवा, लोकसेवा, शांतता, साहित्य, संस्कृती, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांत ध्येयाने प्रेरित होऊन काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दरवर्षी प्रदान केला जातो.
- 1958 पासून आतापर्यंत सरकारी सेवेसाठी अमिताभ चौधरी, किरण बेदी, टी. एन. शेषन, जेम्स मिशेल लिंगडोह यांना, जयप्रकाश नारायण, एम. एस. सुब्बलक्ष्मी, मणिभाई देसाई, बाबा आमटे आदींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- संजीव चतुर्वेदी एम्सचे उपसंचालक आहेत. त्यांनी 1995 मध्ये एनआयटी अलाहाबाद येथून अभियांत्रिकीची पदवी त्यांनी संपादन केली. ते हरियाना केडरच्या 2002 च्या बॅचचे आयएफएस अधिकारी आहेत. आपल्या स्वच्छ आणि धडाडीच्या कार्यपद्धतीने त्यांनी अभयारण्यातील हरणांची शिकार आणि अवैध वृक्षतोडीविरुद्ध आवाज उठविला.संजीव चतुर्वेदींच्या या धडाकेबाज कार्याची दखल घेत त्यांना मॅगसेसे पुरस्काराने गौरविण्यात येत आहे.
- 1999 मध्ये “गुंज” नावाची संस्था स्थापन करून अंशू गुप्ता या तरुणाने आदर्श घालून दिला आहे. नैसर्गिक आपत्ती निवारणाच्या दृष्टीने ही संस्था भारतातील 21 राज्यांमध्ये कार्यरत आहे. 2004 च्या त्सुनामीदरम्यान “नॉट जस्ट अ पीस ऑफ क्लॉथ” या कॅम्पेनची सुरुवात
- अंशू गुप्ता यांनी केली. 2009 मध्ये गांधी जयंती सप्ताहाचे औचित्य साधून त्यांनी “जॉय ऑफ गिव्हिंग वीक”ची सुरुवात केली.
पद्मश्री पुरस्कार विजेत्या वसुंधरा कोमकली यांचे निधन :
- पद्मश्री पुरस्कार विजेत्या वसुंधरा कोमकली यांना अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
- त्या 85 वर्षांच्या होत्या.
डॉ. अब्दुल कलाम यांचे भाषण लवकरच पुस्तक रूपात प्रसिद्ध होणार :
- डॉ. अब्दुल कलाम यांचे आयआयएम शिलॉंगमध्ये अर्धवट राहिलेले भाषण लवकरच पुस्तक रूपात प्रसिद्ध होणार आहे.
- हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानंतर डॉ. कलाम व्यासपीठावरच कोसळले होते, त्यामुळे त्यांचे भाषण पूर्ण होऊ शकले नाही. “क्रिएटिंग अ लिव्हेबल प्लॅनेट अर्थ” या विषयाबरोबरच स्वत:च्या अपूर्ण राहिलेल्या पुस्तकाविषयीही कलाम या भाषणामध्ये बोलणार होते.
- डॉ. कलामांचे शेवटचे चार हजार शब्दांचे व्याख्यान आयआयएममधील विद्यार्थ्यांसाठी तयार केल्या जाणाऱ्या पुस्तकात समाविष्ट केले जाईल.
- लोकांसाठीदेखील हे व्याख्यान प्रसिद्ध करण्यात येईल, असे पाल यांनी स्पष्ट केले.
मुलाच्या दोन्ही हातांचे यशस्वी प्रत्यारोपण :
- अमेरिकेतील डॉक्टरांनी आठ वर्षांच्या मुलाच्या दोन्ही हातांचे यशस्वी प्रत्यारोपण केले असून जगातील ही पहिलीच शस्त्रक्रिया असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
- तब्बल दहा तास चाललेल्या या शस्त्रक्रियेमध्ये डॉक्टरांनी झियॉन हार्वे या मुलावर हात आणि सांध्यांच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली.शस्त्रक्रियेमध्ये 40 विविध आजारांचे डॉक्टर, परिचारिका आणि अन्य कर्मचारी सहभागी झाले होते.
‘दुहेरी भूमिके’शी संबंधित करारावर स्वाक्षरी :
- ‘क्रिकेट क्लीन’साठी धडपडणाऱ्या बीसीसीआयने सावध पवित्रा म्हणून ‘दुहेरी भूमिके’शी संबंधित करारावर स्वाक्षरी करण्याचे धोरण अवलंबले आहे.
दिनविशेष :
- 1971 – अपोलो 15 चंद्रावर उतरले.
- 1980 – व्हानुआतुला स्वातंत्र्य.