Current Affairs of 30 July 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (30 जुलै 2016)

जर्मनीचा फुटबॉल कर्णधार श्वेनस्टायगर निवृत्त :

  • जर्मन फुटबॉल संघाचा कर्णधार बास्टीयन श्वेनस्टायगरने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
  • श्वनेस्टायगर इंग्लिश फुटबॉल क्लब मॅंचेस्टर युनायटेडकडून खेळत असे.
  • श्वेनस्टायगर 2014 च्या जर्मनीच्या फुटबॉल वर्ल्डकप विजेत्या संघाचा सदस्य होता.
  • 2016 मध्ये युरो कपच्या उपांत्यफेरीत जर्मनीचा पराभव झाल्यानंतर त्याने निवृत्तीचे संकेत दिले होते.
  • बार्यन म्युनिच क्लबच्या या माजी स्टार फुटबॉलपटूने सोशल मिडीयावरुन निवृत्तीची घोषणा केली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (29 जुलै 2016)

डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात भारतीय तरुणी :

  • डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात भारतीय वंशाची 18 वर्षांची तरुणी सर्वांत कमी वयाची प्रतिनिधी ठरली आहे.
  • अधिवेशनात हिलरी क्‍लिंटन यांची अध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे.
  • श्रुती पलानीअप्पन असे या तरुणीचे नाव आहे. ती हार्वर्ड युनिर्व्हसिटीची विद्यार्थिनी असून, हिलरी क्‍लिंटन यांची समर्थक आहे.
  • क्‍लिंटन या अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी मोठ्या राजकीय पक्षाने निवडलेल्या पहिल्या महिला उमेदवार ठरल्या आहेत.
  • श्रुतीचे वडील पलानीअप्पन आंडीअप्पन हेही या अधिवेशनाला नामनिर्देशन समितीचे सदस्य म्हणून उपस्थित आहे.
  • अधिवेशनात सर्वाधिक वयाचे प्रतिनिधी जेरी एमेट (वय 102) यांचा समावेश आहे.
  • सर्वांत कमी वयाची प्रतिनिधी ठरण्यासोबत श्रुतीने (दि.26) इतिहास घडविला होता.
  • तसेच मतदान घेताना त्या वेळी तिला आयोवा राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्यात आली होती.

साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ जाहीर :

  • तब्बल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राज्य शासनाने साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ (दि.29) जाहीर केले़.
  • अध्यक्षपदी नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक सुरेश हावरे तर उपाध्यक्षपदी माजी आमदार चंद्रशेखर कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे़.
  • तसेच याशिवाय 12 जणांची विश्वस्त म्हणून नियुक्ती झाली आाहे.
  • विश्वस्त मंडळात डॉ़ मनीषा श्यामसुंदर कायंदे, सचिन भागवत तांबे, अ‍ॅड़ मोहन मोतीलाल जयकर, प्रताप सखाहारी भोसले, डॉ़ राजेंद्र राजाबली सिंग, माजी खासदार भाऊसाहेब राजाराम वाकचौरे, बिपीन शंकरराव कोल्हे, रवींद्र गजानन मिर्लेकर, अमोल गजानन कीर्तिकर व पदसिद्ध असलेल्या शिर्डीच्या नगराध्यक्षा अनिता विजय जगताप यांचा समावेश आहे़.

काश्मीरमध्ये लष्कराकडून लावण्यात आलेली संचारबंदी समाप्त :

  • हिज्बुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वणी याला ठार केल्यावर उसळलेल्या हिंसाचारावर काबू मिळविण्यासाठी काश्मीरच्या विविध भागांत लागू केलेली संचारबंदी सतराव्या दिवशी उठविण्यात आली.
  • गेले काही दिवस बंद असलेली श्रीनगर मुझफ्फराबाद बससेवा पुन्हा सुरू झाली आहे.
  • पाकिस्तान आणि भारत यांच्यात एप्रिल 2005 पासून ही बससेवा सुरू करण्यात आली होती.
  • बुऱ्हाण वणीच्या मृत्यूनंतर काश्मीर खोऱ्यात हिंसाचार उफाळला होता. या हिंसाचारात आतापर्यंत 40 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
  • वणी लष्कराशी उडालेल्या धुमश्चक्रीत ठार झाल्यानंतर जम्मू आणि काश्मीरातील फुटीरतावादी संघटनांनी नऊ जुलैपासून बंद पुकारला आहे.
  • फुटीरतावादी हुरियत कॉन्फरन्स (एचसी) संघटनेचे अध्यक्ष सईद अली शाह गिलानी याला पोलिसांनी अटक केली. गेल्या काही दिवसांपासून त्याला त्याच्याच घरात नजरकैदेत ठेवण्यात आले होते.
  • हुरियत कॉन्फरन्स आणि जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट या दोन संघटनांनी ‘अनंतनाग चलो’ची हाक दिली होती. या सभेला जाण्यासाठी गिलानी घराबाहेर पडताच पोलिसांनी त्याला अटक केली.
  • किश्तवार येथे पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देणाऱ्या पाच जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रो कबड्डीचा फायनल 31 ऑगस्टला :

  • प्रो कबड्डीच्या उपांत्य फेरीत पटना पायरेट्सनं पुणेरी पलटनला आणि जयपूर पिंक पँथर्सने तेलुगू टायटन्सचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश आहे.
  • जयपूर पिंक पँथर्स आणि पटना पायरेट्सदरम्यान 31 ऑगस्ट रोजी हैदराबादमध्ये प्रो-कबड्डी 2016 चा अंतिम सामना होणार आहे.
  • तसेच प्रो कबड्डीच्या पहिल्या उपांत्य सामन्यात पटना पायरटने पुणेरी पलटनचा 37-33 अशा फरकाने पराभव केला.
  • तर जयपूर पिंक पँथर्सने दुसऱ्या उपांत्य फेरीत तेलुगू टायटन्सवर 10 गुणांनी पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला.

दिनविशेष :

  • 1729 : बाल्टिमोर शहराची स्थापना.
  • 1930 : उरुग्वेने माँटेव्हिडीयोमध्ये पहिला फिफा विश्वचषक जिंकला.
  • 1971 : अपोलो 15 चंद्रावर उतरले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (1 ऑगस्ट 2016)

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago