Current Affairs of 30 June 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी 30 जून 2015

नासाच्या ‘स्पेस-एक्स’चा अवकाशात झाला स्फोट :

  • अमेरिकी अवकाश संशोधन संस्थेच्या (नासा) यानाचा 28 जून रोजी उड्डाणानंतर काही वेळातच स्फोट झाला.
  • स्पेस एक्स फाल्कन-9 या अवकाशयानाने फ्लोरिडा येथील केप कॅनव्हेराल येथील तळावरून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या दिशेने उड्डाण केले.
  • अन्नपदार्थांसह विविध संगणकीय व विज्ञान साहित्याची कुमक घेऊन आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राकडे झोपवलेल्या ‘स्पेस-एक्स-फाल्कन-9’ रॉकेट चे रविवारी तुकडे-तुकडे झाले आहेत.
  • ‘स्पेस-एक्स-फाल्कन-9’ रॉकेट रविवारी 2,477 किलो वजनी विविध साहित्य घेऊन निघालेले यान अंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर पाठवण्यासाठी ही 5 दिवसांची मोहीम नासाने हाती घेतली होती.
  • तसेच ‘स्पेस-एक्स-फाल्कन-9’ रॉकेट 208 फूट लांबीचे असून या रॉकेटची 19 वी झेप होती.

एमएसएमई क्षेत्रासाठी स्वतंत्र जॉब पोर्टल :

  • सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांतून (एमएसएमई) रोजगार मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी केंद्र सरकारने 16 जून रोजी www.eex.dcmsme.gov.in हे जॉब पोर्टल सुरू केले.
  • याचा थेट फायदा देशात सध्या कार्यरत असणाऱ्या, एमएसएमई क्षेत्रातील सव्वा तीन कोटी युनटना होणार आहे. याशिवाय नव्याने नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांनाही याचा लाभ उठवता येणार आहे. एमएसएमई क्षेत्राला कुशल मनुष्यबळ मिळवण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.
  • डिजिटल इंडिया, स्किल इंडिया व मेक इन इंडिया या तीन योजनांना पाठिंबा देण्यासाठी एमएसएमई मंत्रालयातर्फे हे एक प्रकारे इम्प्लॉयमेंट एक्स्चेंज तयार करण्यात आले आहे.
  • सध्या हे पोर्टल फक्त कारखानदारी (मॅन्युफॅक्चरिंग) क्षेत्रासाठी आहे. हळूहळू अन्य एमएसएमई क्षेत्रांचा समावेश यात करण्यात येईल. आगामी काळात या पोर्टलची रचनाही अधिक सुटसुटीत केली जाणार आहे. नोकरी शोधणाऱ्यांना या पोर्टलवर आपली माहिती विनाशुल्क नोंदवता येणार आहे.

लेहमधील ऐतिहासिक हेमिस महोत्सवाला प्रारंभ :

  • सुमारे तीनशे वर्षांचा इतिहास लाभलेल्या (लेह) लडाखमधील ऐतिहासिक बौद्ध मठामध्ये हेमिस महोत्सवाला 28 जूनपासून उत्साहात प्रारंभ झाला. देश-परदेशातील शेकडो पर्यटकांनी या महोत्सवासाठी हजेरी लावली आहे.
  • बौद्ध भिक्खू गुरू पद्मसंभव ऊर्फ गुरू रिनपोचे यांच्या जयंतीनिमित्त या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. भूतान आणि तिबेटमधील बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसाराचे श्रेय पद्मसंभव यांनाच दिले जाते.
  • चंद्राच्या गतीवर अवलंबून असणारे तिबेटियन दिनदर्शिकेतील पाचव्या महिन्यात दहा दिवस या महोत्सवाचे आयोजन केले जाते. या काळात येथील बौद्ध मठामध्ये धार्मिक पूजाविधी केले जातात.
  • या महोत्सवातील नृत्याविष्कारदेखील तंत्र विद्येशी संबंधित आहेत. जागतिक शांती आणि समृद्धतेसाठी हे नृत्याविष्कार महत्त्वपूर्ण मानले जातात.

श्री श्री रवि शंकर कोलंबियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित :

  • अध्यात्मिक गुरु श्री श्री रवि शंकर यांना कोलंबियाच्या ‘ओरडेन डी ला डेमोक्रेसिया सिमॉन बोलीवर पुरस्कार’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • त्यांना हा पुरस्कार संघर्षग्रस्त क्षेत्रांमध्ये पुनर्वसन कार्य करण्याबद्दल आणि देण्यात आले शांततापूर्ण उद्देश्यांसाठी कार्य केल्याबद्दल प्रदान करण्यात आला आहे.
  • श्री श्री रविशंकर यांनी आर्ट ऑफ लिविंगची 1981 मध्ये स्थापना केली. या संस्थेचा उद्देश लोकांना दैनंदिन अडचणी, सामाजिक समस्या तसेच हिंसेपासून मुक्ती देणे हा आहे.
  • 1997 मध्ये त्यांनी मानवी गुण वाढविण्याच्या आणि जीवनाशी संबंधित समस्या दूर करण्याच्या उद्देशाने इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्यूमन वैल्यूज़ (IAHV) या संस्थेची स्थापना केली.
  • कोलंबियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराची सुरुवात 1980 मध्ये झाली. हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय स्तरावर समाजसेवा करणाऱ्या लोकांना दिला जातो.

आता तुम्हीच मोजा तुमचा इन्कम टॅक्स :

  • करदात्यांनी त्यांचे आयकर विवरणपत्र अर्थात रिटर्न स्वत:च भरावे यासाठी आयकर विभाग ई-फायलिंगला प्रोत्साहन देत आहे.
  • नोकरदारांना त्यांचा इन्कम टॅक्स किती भरावा लागणार आहे, हे त्यांच्या कंपनीकडून कळत असते. परंतु याशिवाय अन्य करदात्यांनाही नेमका किती इन्कम टॅक्स भरावा लागेल, हे कळावे यासाठी आयकर विभागाने आपल्या वेबसाइटवर कॅल्क्युलेटर तयार केला आहे.
  • हा ऑनलाइन कम्प्युटर बेस्ड प्रोग्रॅम आहे. याचा वापर करून करदात्याला इन्कम टॅक्सचा भरणा किती करावा लागणार आहे हे कळल्याने 31 ऑगस्ट या कर भरायच्या अंतिम तारखेच्या आत टॅक्स भरणे त्याला शक्य होईल.
  • गुंतागुंतीच्या प्रक्रियायाच्या साह्याने करता येणार नाहीत. यासाठी प्रत्यक्ष रिटर्न भरताना त्या अर्जामध्ये इन्कम टॅक्सची मोजणी करावी लागणार आहे.
  • आयकर विभागाची वेबसाइट www.incometaxindia.gov.in वर हा आयकर कॅल्क्युलेटर उपलब्ध आहे.

रशियाचे माजी पंतप्रधान प्रिमाकोव यांचे निधन :

  • रशियाचे माजी पंतप्रधान येवगेनी प्रिमाकोव यांचे वयाच्या 85 व्या वर्षी मॉस्को येथे निधन झाले.
  • अमेरिकेकडे जाणारे त्यांचे विमान अ‍ॅटलांटिकवर असताना सर्बियात नाटोच्या बॉम्बहल्ल्यांमुळे वळवण्यात आल्याची घटना 1999 मध्ये घडली होती.
  • ते मुरब्बी नेते, वैज्ञानिक होते. त्यांनी बोरिस येल्तसिन यांच्या अध्यक्षपदाच्या काळात म्हणजे 1998-99 दरम्यान पंतप्रधानपद भूषवले होते. 17 ऑगस्ट 1998 मध्ये रशिया दिवाळखोरीत असताना ते पंतप्रधान झाले.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.