Current Affairs (चालू घडामोडी) of 30 March 2015 For MPSC Exams
अ.क्रTable of Contents |
ठळक घडामोडी |
1. | दिल्लीची आदिती आर्या ठरली मिस इंडिया |
2. | महान नेत्यांच्या यादीत नरेद्र मोदी व सत्यार्थीचा समावेश |
3. | भारतीय वंशाचे उद्योजक फोर्ब्सच्या यादीत |
4. | केरळच्या लोकसंख्येत शून्य लोकसंख्या वाढ |
5. | पूनम महाजन बास्केटबॉलच्या अध्यक्षपदी |
6. | ‘आयआरएनएसएस-1डी’ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण |
7. | श्रीकांत व सायनाचा विजय |
8. | दिनविशेष |
दिल्लीची आदिती आर्या ठरली मिस इंडिया :
- दिल्लीची आदिती आर्या यंदाची फेमिना मिस इंडिया ठरली असून तिने शनिवारी 2015 चा ताज पटकावला.
- मिस वर्ल्ड स्पर्धेत आदिती आर्या आता भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
- अॅक्रिन रॅचेल वॅज ही या स्पर्धेची उपविजेती आहे.
Must Read (नक्की वाचा):
महान नेत्यांच्या यादीत नरेद्र मोदी व सत्यार्थीचा समावेश :
- फॉर्च्युन या विश्वविख्यात नियतकालिकाने प्रकाशित केलेल्या 50 नेत्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांचा समावेश केला आहे.
- फॉर्च्युनने व्यवसाय, प्रशासन, आणि इतर महत्वाचा क्षेत्रामध्ये बदल घडविणार्या असामान्य पुरुष व महिलांच्या आपल्या यावर्षीच्या पंतप्रधान मोदी हे 5 व्या स्थरावर तर कैलाश सत्यार्थी 28 व्या स्थानावर आहेत.
- अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक फॉर्च्युनच्या या यादीत अव्वल स्थानावर आहेत.
भारतीय वंशाचे उद्योजक फोर्ब्सच्या यादीत :
- जगातील अब्बल 100 प्रभावशाली धाडसी भांडवलदारांच्या यादीत भारतीय वंशाच्या 11 अमेरिकी नागरिकांना स्थान मिळाले आहे.
- फोर्ब्स 2015 मिडास लिस्टमध्ये समावेश झालेले हे 100 दिग्गज धाडसी भांडवलदार तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूकदारांचे प्रतिनिधित्व करतात.
केरळच्या लोकसंख्येत शून्य लोकसंख्या वाढ :
- केरळ हे स्त्री-पुरुष समानता असणारे राज्य आहे तसेच आता झालेल्या जनगणनेत केरळची नवीन ओळख म्हणजे केरळमध्ये शून्य लोकसंख्या वाढ हे होय.
- शून्य लोकसंख्या वाढ म्हणून केरळाची नोंद करण्यात आली आहे.
पूनम महाजन बास्केटबॉलच्या अध्यक्षपदी :
- पूनम महाजन यांची भारतीय बास्केटबॉल महासंगच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.
- महासचिव रूपम हरिष शर्मा सचिवपदी निवड करण्यात आली आहे.
- 1950 पासून अस्तित्वात असलेल्या फेडरेशनच्या प्रमुखपदी महिलेची निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
- बास्केटबॉल महासंगच्या महत्वाचा दोन्ही पदांवर महिला प्रमुख असलेला देशातील एकमेव राष्ट्रीय क्रीडा संघटना आहे.
‘आयआरएनएसएस-1डी’ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण :
- ‘आयआरएनएसएस-1डी’ या भारताच्या चौथ्या नौकानयन उपग्रहाचे शनिवारी ‘पीएसएलव्ही सी-27’ या ध्रुवीय प्रक्षेपण यानाव्दारे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
- या उपग्रहाच्या प्रक्षेपणामुळे भारत स्वतःची नौकानयन प्रणाली सुरू करण्यासाठी सज्ज झाला आहे.
- ‘आयआरएनएसएस-1डी’ उपग्रह यशस्वीरीत्या अंतराळात नेण्याची पीएसएलव्हीचीही 28 वी अंतराळ वारी होती.
श्रीकांत व सायनाचा विजय :
- श्रीकांत कदम्बीने इंडिया ओपन सिरिजमध्ये डेन्मार्कच्या व्हिक्टर अॅक्सेलनवर 18-21-21-13-21-12 अशी मात केली.
- सायना नेहवालने थायलंडच्या रॅचनॉक इंन्टॉनला 21-14-21-16 ने पराभूत केले.
दिनविशेष :
- 1665 – पुरंदर किल्ल्यावर दिलेरखानाशी लढताना मुरारबाजींना वीरगती.
- 1699 – शीख धर्मगुरू श्री गुरु गोविंदसिंग यांनी खालसा संस्थेची स्थापना केली.
- 1842 – शरीराचा एखादा भाग बधीर करून शस्त्रक्रिया करण्याचा पहिला प्रयोग क्रॉकफोर्ड लॉंग यांनी अमेरिकेतील जेफेरसन येथे केला.
आम्ही आपल्याकरिता राज्यसेवा परीक्षेची मागील वर्षांची प्रश्नसंच ऑनलाइन टेस्ट मध्ये पुरवली आहेत. टेस्ट सोडवून येणार्या परीक्षेसाठी सराव करा .. <<<<येथे क्लिक करा >>>>