Current Affairs (चालू घडामोडी) of 30 November 2014 For MPSC Exams
अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | वरिष्ठ पेंशन वीमा योजना पुन्हा सुरू |
2. | मकरंद अनासपुरेंकडुन गोगलगाव स्वच्छतेसाठी द्तक |
3. | 19 वी सार्क शिखर परिषद पाकिस्तानात |
4. | व्हीएलएमएस (VLMS) नावाचे वेब आधारित अॅप |
5. | संस्कृत भाषा अतिरिक्त विषय |
6. | अखिल भारतीय सुरक्षा हेल्पलाइन कार्यान्वित |
वरिष्ठ पेंशन वीमा योजना पुन्हा सुरू :
- भारतीय जीवन वीमा महामंडळाद्वारे या योजनेची अमबाजवणी होईल आणि 15 ऑगस्ट 2014 ते 14 ऑगस्ट 2015 या कालावधीसाठीही योजना खुली राहील.
- वरिष्ठ पेंशन योजनेत 60 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या जेष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ व्हावा यासाठी सरकारने ही योजना पुन्हा सुरू केली.
मकरंद अनासपुरेंकडुन गोगलगाव स्वच्छतेसाठी द्तक :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता अभियानात अभिनेता मकरंद अनासपूरे सहभागी झाले आहेत व त्यांनी नेवासा तालुक्यातील (जिल्हा: अहमदनगर) गोगलगाव हे गाव दत्तक घेतले आहे.
- गोगलगावात या उपक्रमावर आधारित ‘सापडेना राव …..गोगलगाव’ या चित्रपटाची निर्मितीही केली जाणार आहे.
- चित्रपटाचा प्रारंभ हिवारेबाजाराचे सरपंच पोपट पवार यांच्या हस्ते झाला.
19 वी सार्क शिखर परिषद पाकिस्तानात :
- 18 वी सार्क परिषद 2014 मध्ये नेपाळची राजधानी काठमांडू येथे पार पडली.
- 19 वी सार्क परिषद 2016 मध्ये पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे होणार आहे.
व्हीएलएमएस (VLMS) नावाचे वेब आधारित अॅप :
- या वेब अॅप मुळे मंत्रालये आणि पंतप्रधान कार्यालय यांच्यात कागद विरहित संवाद सुरू राहील.
- पंतप्रधान संबोधित अति महत्वाच्या पत्रांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी एनआयसीने व्हीव्हीआयपी लेटर्स मॉनिटरिंग सिस्टम नावाचे वेब अॅप विकसित केले आहे.
संस्कृत भाषा अतिरिक्त विषय :
- न्यायालयाच्या या आदेशामुळे जर्मन भाषेचे तिसरे स्थान कायम राहणार आहे.
- केंद्रीय विद्यालयांमध्ये इयत्ता आठवीसाठी संस्कृत भाषा अतिरिक्त विषय म्हणूनच शिकवला जावा, असे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला संगितले.
- न्यायमूर्ती अनिल आर. दवे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हे आदेश दिले.
अखिल भारतीय सुरक्षा हेल्पलाइन कार्यान्वित :
- रेल्वेच्या प्रवाशांना सुरक्षेसंदर्भात मदत मिळावी यासाठी 1800-111-322 ही अखिल भारतीय सुरक्षा हेल्पलाइन कार्यान्वित झाली आहे.