Current Affairs of 30 November 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (30 नोव्हेंबर 2016)
देशात सर्व सेवा डिजिटल होणार :
- देशातील सर्व सेवा भविष्यात डिजिटलाइज्ड केल्या जातील. नागरिकांना मिळणा-या सेवा ह्या डिजिटल पद्धतीच्या असतील, असे केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री राजवर्धनसिंग राठोड यांनी 28 नोव्हेंबर रोजी इफ्फीच्या समारोपावेळी केलेल्या भाषणावेळी सांगितले.
- सरकारने सुरू केलेले फिल्म फॅसिलीटेशन कार्यालय म्हणजे सिने निर्मात्यांसाठी एक खिडकी योजना आहे.
- सिनेमा हे फक्त करमणुकीचे साधन नव्हे तर सामाजिक बदलांचा संदेश देणारा तो एक प्रभावशाली कला प्रकार आहे.
- मल्टीप्लेक्समुळे सिनेमा पाहण्याच्या अनुभवात क्रांती झाली आहे. तंत्रज्ञानामुळे मोबाईल क्रांती झाली आहे.
- तसेच सध्या लघूपटाची निर्मिती मोबाईलवर देखील करता येते. मोबाईल क्रांतीमधून युवा वर्गाला प्रेरणा मिळते.
- केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रलयाने आयोजित केलेल्या स्वच्छ भारत चित्रपट महोत्सवासाठी आलेल्या विक्रमी प्रतिक्रिया याचेच द्योतक आहे.
Must Read (नक्की वाचा):
पंकज अडवाणीला कांस्यपदक :
- दोहा येथे संपलेल्या एबीएसएफ वर्ल्ड स्नूकर अंजिक्य स्पर्धेत भारताचा अव्वल खेळाडू पंकज आडवाणीला उपांत्य फेरीत वॉल्सच्या अँड्र्यू पॅगेटकडून 2-7 फ्रेमने पराभव पत्करावा लागल्यामुळे त्याला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
- 15 वेळा विश्वविजेतेपद जिंकलेल्या पंकज आडवाणीला अँड्र्यूकडून 74-14, 71-8, 87-0, 64-78, 81-0, 37-70, 80-7, 68-37, 14-19 असे पराभूत व्हावे लागले. या लढतीमध्ये पंकज आडवाणीला शेवटपर्यंत सूर गवसला नाही.
हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश मंजूर :
- ‘भारतीय मुस्लीम महिला आंदोलन’च्या 80 महिलांनी चार वर्षांनंतर 29 नोव्हेंबर रोजी प्रथमच मजारपर्यंत प्रवेश केला.
- हाजी अली ट्रस्टने 2012 मध्ये महिलांना मजारपर्यंत जाण्यावर प्रतिबंध घातला होता.
- ट्रस्टच्या प्रतिबंधाविरोधात महिला संघटनांनी आवाज उठवला होता.
- ‘हाजी अली सबके लिए’ या फोरमने ट्रस्टच्या निर्णयाविरोधात निदर्शने केली होती. शेवटी हे प्रकरण न्यायालयात पोहोचले होते.
भारतीय महिला संघाचा पाकिस्तानवर विजय :
- एकता बिष्टचे 3 गडी आणि कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला.
- तसेच या विजयासोबतच भारताने गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले. भारतीय संघाचा हा सलग तिसरा विजय आहे.
- गतविजेत्या भारतीय महिला संघाने पाकिस्तानला 7 गडी बाद 97 धावांवर रोखले. त्यानंतर भारतीय संघाने 19.2 षटकांतच 98 धावा करून विजय मिळविला.
- दोन्ही संघांचा या स्पर्धेतील हा तिसरा सामना होता. भारताचे आता 6 गुण आहेत, तर पाकिस्तान 4 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
- भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिला आपल्या सर्वोत्तम प्रदर्शनासाठी ‘सामनावीरा’चा बहुमान देण्यात आला.
बजाजकडून ‘इन्विन्सिबल इंडियन्स’चा सन्मान जाहीर :
- सर्व प्रतिकूल परिस्थिती झुगारून समाजात महत्त्वपूर्ण बदल घडवणाऱ्या, देशासाठी काम करणाऱ्या पाच अजिंक्य ताऱ्यांना अर्थात, ‘इन्विन्सिबल इंडियन्स’ना बजाज सन्मानित करत आहे.
- तसेच यासाठी खास व्यासपीठही बजाजने तयार केले आहे. सुरुवातीला बजाजने पहिल्या पाच जणांना सन्मानित केले आहे.
- भारताच्या शौर्याचे प्रतीक असलेल्या आयएनएस विक्रांत या युद्धनौकेचा धातू वापरून बजाजने ‘बजाज व्ही’ ही बाइक तयार केली होती, तसेच कंपनीने आता ‘इन्विन्सिबल इंडियन्स:स्टोरीज दॅट इव्होक प्राइड एव्हरी डे’ या शीर्षकाखाली नव्या उपक्रमाची सुरुवात केली. या उपक्रमाद्वारे सामान्य भारतीयांच्या असामान्य कथा प्रकाशात येतील.
- भविष्यात अधिकाधिक ‘इन्विन्सिबल इंडियन्स’ तयार व्हावेत, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
- ऑलिम्पिक स्टार नेमबाज अभिनव बिंद्राच्या हस्ते चेवांग नॉरफेल, बिपीन गणात्रा, ओमकारनाथ शर्मा, विजयालक्ष्मी शर्मा आणि करिमूल हक या पाच जणांचा गौरव करण्यात आला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा