चालू घडामोडी (30 सप्टेंबर 2016)
प्रत्येक भारतीयाचा लष्कराला सलाम :
- नियंत्रण रेषे पलीकडे असलेल्या दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर (दि.29) पहाटे करण्यात आलेल्या लष्करी कारवाईचे वृत्त येताच देशात आनंद आणि समाधानाचे वातावरण पसरले.
- पाकिस्तानकडून सीमेवर सतत होणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि तेथील दहशतवाद्यांनी काश्मिरात घातलेला गोंधळ याच्यामुळे भारतीयांमध्ये संतापाचे वातावरण होते.
- उरी हल्ल्यानंतर तर पाकिस्तानला धडा शिकवायलाच हवा, अशी इच्छा भारतीयांमध्ये दिसत होती.
- तसेच त्यामुळे लष्करी कारवाईची बातमी कळताच, साऱ्या भारतीयांनी तिचे स्वागत केले.
- आमच्यात एरवी कितीही मतभेद असले तरी देश संकटात असताना सारे भारतीय कसे एकत्र येतात, याचेच दर्शन घडले.
- परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली आणि त्यांना या कारवाईची सविस्तर माहिती दिली.
नव्या युगातील ‘बिझनेस नेटवर्किंग’ :
- सरकारच्या ‘स्टार्ट अप इंडिया’ योजनेअंतर्गत निवड झालेली ‘सीबीएनएफ’ ही महाराष्ट्रातील काही मोजक्या स्टार्ट अपपैकी एक आहे.
- योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी आवश्यक इन्क्युबेटर सर्टिफिकेट पुण्यातील ‘सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क’ ने ‘सीबीएनएफ’ला दिले आहे.
- देशातील कोणत्या शहरात कोणते टेंडर निघाले आहे, कोणत्या कंपनीला डीलरशिप द्यायची आहे, कोणत्या क्षेत्राच्या ‘ट्रेड फेअर’चे आयोजन कुठे केले आहे, अशी व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि ‘वेळेत समजली तर उपयोगाची’ माहिती आता मोबाईलवर एका स्वाइपवर उपलब्ध होत आहे.
- फेसबुक किंवा ट्विटर यांसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सप्रमाणेच लघू आणि मध्यम उद्योजकांसाठी ‘कॉस्मो बिझनेस नेटवर्किंग फोरम’चे (सीबीएनएफ) हे ‘बी2बी’ नेटवर्किंग ॲप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे.
- ‘सीबीएनएफ’च्या सहसंस्थापिका मंजूषा आणि त्यांचे पती मुरलीधर सारडा यांनी हे ॲप्लिकेशन तयार केले असून, त्याचे पेटंट मिळविण्यासाठी त्यांचे भारतासह अमेरिकेतही प्रयत्न सुरू आहेत.
-
- केंद्र सरकारच्या ‘स्टार्टअप इंडिया’ योजनेंतर्गत निवड झालेली ‘सीबीएनएफ’ ही महाराष्ट्रातील काही मोजक्या स्टार्टअप्सपैकी एक आहे.
- योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी आवश्यक असलेले इन्क्युबेटर सर्टिफिकेट पुण्यातील ‘सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क’ने ‘सीबीएनएफ’ला दिले आहे.
सर्जिकल कारवाईनंतर मुंबईत सज्जता :
- पाकव्याप्त कश्मीरमधील अतिरेकी तळांवर भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईनंतर मुंबईतील प्रत्येक घडामेडींकडे लक्ष ठेवले जात आहे.
- मुंबईत लष्कराशी, विशेषत: नौदलाशी संबंधित महत्त्वाची ठाणी असल्याने सावधानता बाळगली जात आहे.
- मुंबईतील अणुभट्ट्या तसेच स्टॉक एक्स्चेंज परिसरात दक्षता बाळगली जात आहे. कारवाईनंतर या सर्व ठिकाणांना योग्य सूचना पाठवल्या आहेत.
- नागरिकांना समुद्री संरक्षणसज्जतेचे दर्शन व्हावे यासाठी 1 आणि 2 ऑक्टोबर रोजीचे कार्यक्रम रद्द करण्यात आले.
- तसेच येत्या काही दिवसांत मुंबईकडे चोख लक्ष ठेवले जाणार असून, विविध दहशतवादी संघटनांच्या कारवायांचा मागोवा घेण्यात येणार आहे.
मोतीलाल ओसवाल ‘जितो’च्या अध्यक्षपदी :
- जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) या जागतिक शिखर संघटनेच्या (दि.29) झालेल्या निवडणुकीत सुप्रसिद्ध गुंतवणूक सल्लागार मोतीलाल ओसवाल यांची अध्यक्षपदी, तर प्रेसिडेंटपदी शांतीलाल कवाड यांची निवड झाली.
- ‘जितो’ ही जगभरातील जैन उद्योजक आणि उद्योगपतींची, तसेच ज्ञानसाधकांची संघटना आहे.
- सामाजिक- आर्थिक उन्नती, तसेच याबाबतीत सबलीकरण, मूल्याधिष्ठित शिक्षण या क्षेत्रांत काम करणाऱ्या या संघटनेची धुरा आता ओसवाल वाहणार आहेत.
- ओसवाल आणि कवाड दोघे मिळून संघटनेची कार्यकारिणी निश्चित करतील.
- संपत्ती आणि मालमत्तांचे व्यवस्थापन, रोखे व शेअर बाजारातील गुंतवणूक, तसेच गृहकर्जाच्या व्यवस्थापन क्षेत्रात गेल्या 30 वर्षांत नावलौकीक मिळविलेल्या ओसवाल यांच्याकडे ‘जितो’चे अध्यक्षपद आल्याने उद्योग-व्यवसायातील सहकार्याच्या बरोबरीने जागतिक स्नेहभाव आणि आध्यत्मिक उन्नती या बाबतीतही नवा आयाम मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जपान ओपन टेनिस स्पर्धेत सानिया-बाबरेराला विजेतेपद :
- भारताची सानिया मिर्झा व चेक प्रजासत्ताकच्या बाबरेरा स्ट्रायकोव्हा या जोडीने टोरे पॅन पॅसिफिक (जपान ओपन) टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीचे विजेतेपद जिंकले.
- सानिया-बाबरेराने अंतिम लढतीत चेंग लिअँग व झाओक्युअॅन यांग या चिनी जोडीचा 6-1, 6-1 असा सहज पराभव केला.
- मागील चार वर्षांतील सानियाचे हे तिसरे जपान खुल्या स्पर्धेचे विजेतेपद आहे. याआधी तिने कारा ब्लॅकसह 2013 व 2014 मध्ये अजिंक्यपद पटकावले होते.
- सानिया-बाबरेराची एकत्र खेळण्याची ही तिसरी वेळ आहे. गेल्या महिन्यात सानिया-बाबरेरा जोडीने सिनसिनाटी खुल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते.
- मात्र, अमेरिकन खुल्या स्पर्धेत सानिया-बाबरेरा जोडीला उपांत्यपूर्व फेरीतच पराभव पत्करावा लागला होता.
- सानियाने या वर्षांत आत्तापर्यंत आठ डब्लूटीए जेतेपदे पटकावली आहेत. त्यामध्ये हिंगीससह जिंकलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या जेतेपदाचाही समावेश आहे.
- तसेच तिने ब्रिस्बेन, सिडनी, सेंट पिटर्सबर्ग, इटालियन आणि कॉनेक्टिकट खुल्या स्पर्धेतही बाजी मारली आहे.
- सानियाने आपल्या कारकिर्दीत एकूण 40 दुहेरी गटातील जेतेपदे जिंकली आहेत.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा