Current Affairs (चालू घडामोडी) of 31 December 2014 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. महेंद्रसिंग धोनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त
2. हरिप्रसाद ठरला पराग ‘श्री’
3. भूसंपादन आता अधिक सुलभ
4. विषानुजन्य इबोलावर लस शोधण्यात रशियन वैज्ञानिकांना यश
5. एमपीएससीसाठी वैद्यकीय तपासणी बंधनकारक
6. दिनविशेष :

 

महेंद्रसिंग धोनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त :

  • टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार, कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.
  • ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी येथील चौथ्या कसोटीतही धोनी खेळणार नसून कर्णधारपदाची सूत्रे विराट कोहलीकडे सोपवण्यात आली आहेत.
  • बीसीसीआयला पत्र लिहून त्याने निवृत्तीचा निर्णय कळवला आहे.
  • वन-डे तसेच टी-20 क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण कसोटीतून निवृत्ती घेत असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.
  • कसोटी कारकीर्त
  • मॅच-90
  • इनींग्ज-144
  • रन्स-4876
  • नाबाद-16 वेळा
  • सर्वोच्च धावसंख्या-224
  • सरासरी-38.09
  • शतके-6
  • अर्धशतके-33
  • कर्णधारपदाची कारकीर्द-
  • कालावधी- 2008 ते 2014
  • सामने-60
  • विजय-27
  • पराजय-18
  • अनिर्णीत-15

 

हरिप्रसाद ठरला पराग ‘श्री’ :

  • मुंबई बॉडी बिल्डिंग असोशिएशन, ग्रेटेर बॉम्बे बॉडी बिल्डिंग असोशिएशन व मुंबई सबबर्न बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच पार पडलेल्या ‘पराग श्री 2014’ शरीरसौष्ठव स्पर्धेत भारतीय नौदलाच्या हरिप्रसाद एस.पी याने विजेतेपद पटकावले.
  • मालाड येथील अप्पा पाडा येथे ही स्पर्धा पार पडली.

भूसंपादन आता अधिक सुलभ :

  • भरीव भरपाई व पुनर्वसन, गुंतवणुकीस चालना, आर्थिक सुधारणांचा रेटे वाटहुकूमास मंजूरी मिळाली आहे.
  • आधीच्या ‘संपूआ’ सरकारने गेल्या जानेवारीत केलेल्या नवीन भूसंपादन कायद्यातील काही जाचक अटी शिथिल करून इंडस्ट्रियल कॉरिडॉर, पीपीपी प्रकल्प, ग्रामीण पायाभूत सुविधा, परवडणारी घरे आणि संरक्षणविषयक प्रकल्प यासाठी जमीन अधिग्रहण सुलभ करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी मंजूरी दिली.
  • यामुळे सुमारे 1.35 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे रखडलेले प्रकल्प मार्गी लागू शकतील.
  • देशाची विकासाची गरज लक्षात घेत सध्या लागू असलेल्या कायद्यातील काही तरतुदी शिथिल करण्याची व ’10ए‘ हे पुनर्वसन आणि भरपाईसंबंधीचे नवे कलम समाविष्ट करण्याची तरतूद या वटहुकूमात असेल.

विषानुजन्य इबोलावर लस शोधण्यात रशियन वैज्ञानिकांना यश :

  • रशियन वैज्ञानिकांनी इबोला विषानुवर लस शोधली असून आफ्रिकेत लवकरच या लाशीच्या चाचण्या घेण्यात येणार आहेत.
  • सेंट पिटर्सबर्ग येथील ‘रिसर्च इन्स्टितुट ऑफ इन्फ्लुएंझा‘ या संस्थेच्या वैज्ञानिकांनी ही लस विकसित केली आहे.
  • फेब्रुवारीत तिच्या चाचण्या पूर्ण होत आहे.
  • लाशीच्या प्राण्यांवरील चाचण्या घेतल्या जातील व नंतर आफ्रिकेतील वैद्यकीय स्वयंसेवकांवर चाचण्या केल्या जातील.

एमपीएससीसाठी वैद्यकीय तपासणी बंधनकारक :

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखतीसाठी पत्र ठरलेल्या उमेदवारांना मुलाखतीपूर्वी वैद्यकीय तपासणीचे प्रमाणपत्र सक्तीचे केले आहे.
  • ते नसल्यास उमेदवाराला मुलाखात देता येणार नाही.

 

दिनविशेष :

  • 2014 – या इंग्रजी वर्षाचा शेवटचा दिवस.
  • 1802 – दुसर्‍या बाजीरावने तैनाती फौजा स्वीकारल्या हा तह वसई येथे झाला.
  • 1926 – इतिहासाचार्य वी.का.राजवाडे यांचे निधन इतिहास संशोधक अशी त्यांची ओळख होती.1910 साली त्यांच्या पुढाकाराने भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना झाली.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.