Current Affairs (चालू घडामोडी) of 31 January 2015 For MPSC Exams
अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | सात-बाराचे उतारे मिळणार ऑनलाइन |
2. | शेखर सेन यांची संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षपदी नियुक्ती |
3. | अरुण साधू यांना “जंनस्थान पुरस्कार” जाहीर |
4. | दिनविशेष |
सात-बाराचे उतारे मिळणार ऑनलाइन :
- सात-बाराचे उतारे ऑनलाइन देण्याची सुरवात राज्य शासनातर्फे आज पासून सुरू होणार आहे.
- महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी जाहीर केले.
- तसेच त्याचा जाहिरात कार्यक्रम भोर येथे होणार आहे.
शेखर सेन यांची संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षपदी नियुक्ती :
- संगीतकार आणि गीतकार शेखर सेन यांची संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.
- त्यांचा कार्यकाल पाच वर्षाचा राहील.
अरुण साधू यांना “जंनस्थान पुरस्कार” जाहीर :
- ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक अरुण साधू यांना “जंनस्थान पुरस्कार” जाहीर झाला आहे हा पुरस्कार कुसुमाग्रज प्रतिष्ठानाच्या वतीने देण्यात येतो.
- पुरस्काराचे स्वरूप रोख एक लाख रुपये, मांनचिन्ह आणि मानपत्र असे आहे.
- दर दोन वर्षानी हा पुरस्कार दिला जातो आता तो 27 फेब्रुवारी (कुसुमाग्रज यांचा जन्मदिन) नाशिक येथे पुरस्काराचे वितरण होणार आहे.
- मागच्या वर्षी भालचंद्र नेमाडे यांना देण्यात आला होता.
दिनविशेष :
- 1963 – मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आला.
- 1950 – पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे संसदेत पहिले भाषण झाले.
- 1920 – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘मुकनायक’ या पक्षिकाची सुरवात.