चालू घडामोडी (31 मे 2016)
दिलीप वेंगसरकर यांना जीवनगौरव पुरस्कार :
- मुंबईत झालेल्या सीएट आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुरस्कार 2015-16 सोहळ्यात वेंगसरकर यांना जीवनगौरव पुरस्काराने गोरविण्यात आले.
- या कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ क्रीडा पत्रकार अयाझ मेनन यांच्या उपस्थितीत वेंगसरकर, वेस्ट इंडीजचे माजी क्रिकेटपटू इयान बिशप आणि ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन यांनी सीएट ड्रीम टीमचीही निवड केली. या संघाच्या कर्णधारपदी महेंद्रसिंह धोनीची निवड झाली.
- तसेच विराट कोहलीला सर्वोत्तम टी-20 खेळाडू पुरस्काराने गौरविण्यात आले.
- ‘‘क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर मी युवा खेळाडूंना दर्जेदार क्रिकेटचे प्रशिक्षण मिळावे यासाठी अकादमी स्थापन केली. मध्यमवर्गातील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत आपली चमक दाखवतात. मात्र, सर्वांनाच सोयीसुविधांअभावी हे शक्य होत नाही. त्यामुळेच अशा खेळाडूंना अधिक मार्गदर्शन देण्याचा मी निर्णय घेतला,’’ असे वेंगसरकर यांनी सांगितले.
- तसेच या वेळी इंग्लंडच्या जो रुटला वर्षातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व फलंदाज म्हणून गौरविण्यात आले.
- तर, रोहित शर्मा व आर. आश्विन यांना अनुक्रमे सर्वोत्तम भारतीय क्रिकेटपटू आणि आंतरराष्ट्रीय गोलंदाज पुरस्काराने गौरविण्यात आले.
केळी उत्पादनात भारत प्रथम क्रमांकावर :
- काही वर्षांपूर्वी अत्यल्प असलेली केळीची लागवड आज मोठ्या प्रमाणात वाढून ती शेतकऱ्यांनी अंगीकारण्यामागे जैन इरिगेशनचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
- तसेच त्यांनी निर्माण केलेल्या टिश्यूकल्चर रोपांपासून ते यासाठी आवश्यक असलेल्या सूक्ष्मसिंचन प्रणालीमुळे आपल्या शेतकऱ्यांनी जागतिक पातळीवर केळी उत्पादनात अव्वल स्थान निर्माण केले आहे, असे प्रतिपादन भारत सरकारचे कृषी आयुक्त डॉ. एस. के. मल्होत्रा यांनी केले.
- कनफडेरेशन ऑफ हॉर्टिकल्चर असोसिएशन ऑफ इंडिया व जैन इरिगेशनतर्फे जैन हिल्स येथे आयोजित राष्ट्रीय केळी निर्यात कार्यशाळेत ते बोलत होते.
- आज भारतात सुमारे 30 मिलियन टन केळी उत्पादन होते. यात कमी क्षेत्राच्या मानाने जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भारतात सर्वाधिक उत्पादन घेऊन दाखविले आहे.
- तसेच याचे श्रेय शेतकऱ्यांसमवेत जैन इरिगेशनच्या कृषी शिक्षण विस्ताराला व उच्च कृषी तंत्रज्ञानाला जाते.
- 1977-78 मध्ये केळीचे दर हेक्टरी अवघे 13 क्विंटल उत्पादन होते. ते आज शेतकऱ्यांनी 65 टनापर्यंत नेले. ही क्रांती टिश्यूकल्चरची केळी रोपे, ठिबकमुळे साध्य झाल्याचे डॉ. एच.पी. सिंग यांनी सांगितले.
‘स्वराज्य’ सिंहगर्जनेला एक शतक पूर्ण :
- ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच,’ अशी सिंहगर्जना करून लोकमान्य टिळकांनी जुलमी ब्रिटिश राजवटीने पिचलेल्या भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याचे स्फूलिंग चेतविले त्या घटनेची (दि. 31मे) शतकपूर्ती झाली.
- 31 मे 1916 रोजी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला बळ देण्यासाठी अहमदनगरमध्ये घेतलेल्या सभेत लोकमान्यांनी ही सिंहगर्जना केली होती.
- लोकमान्य टिळकांनी ‘स्वराज्य’ऐवजी ‘होमरूल’ (स्वशासन) हा शब्दप्रयोग करण्याचे ठरवले होते.
- तसेच या चळवळीचा प्रचार व जनजागृतीसाठी टिळकांनी 31 मे 1916 रोजी येथील कापड बाजारातील ‘इमारत कंपनी’च्या वसाहतीच्या मैदानावर ही ऐतिहासिक सभा घेतली.
- नगरमधील सभेचा उत्साह पाहून टिळकांनी या सभेत स्वराज्याची हाक दिली.
इंग्लंडचा कर्णधार अॅलेस्टर कुकचा नवा विक्रम :
- इंग्लंडचा कर्णधार अॅलेस्टर कुक याने (दि.30) येथे कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण करतानाच अनेक विक्रम आपल्या नावावर केले.
- तसेच त्यात 10 हजार धावा कमी वयात करण्याच्या विक्रमाचाही समावेश आहे.
- अॅलेस्टर कुक हा कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करणारा जगातील 12 वा आणि इंग्लंडचा पहिलाच फलंदाज आहे.
- कुक अद्याप 31 वर्षे 157 दिवसांचा आहे आणि अशा प्रकारे त्याने सर्वांत कमी वयात 10 हजार धावा पूर्ण करण्याचा नवीन विक्रम केला.
- तसेच याआधी विक्रम तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनने ही कामगिरी 31 वर्षे 326 दिवसांत केली होती.
- विशेष म्हणजे सर्वांत कमी वयात 7 हजार, 8 हजार, 9 हजार आणि आता 10 हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रमही कुकच्या नावावर नोंदवला गेला.
सॉफ्टबँक भारतात गुंतवणार करणार :
- जपानमधील दूरसंचार आणि इंटरनेट क्षेत्रातील आघाडीची कंपनी सॉफ्टबॅंक भारतात 10 अब्ज डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक आगामी 5 ते 10 वर्षांत करणार आहे.
- सॉफ्टबॅंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मासायोशी सोन म्हणाले, ‘भारतातील सौरऊर्जा प्रकल्पामध्ये पहिल्यांदा 350 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करण्यात येईल’.
- आतापर्यंत कंपनीने 2 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली असून, आणखी गुंतवणूक करण्यासाठी कंपनी उत्सुक आहे. भारताला चांगले भविष्य आहेत.
- इंटरनेटकंपन्या आणि सौरऊर्जा क्षेत्रात गुंतवणुकीला कंपनीचे प्राधान्य राहणार आहे.
- सौरऊर्जा क्षेत्रापासून आम्ही सुरवात केली आहे. पुढील 5 ते 10 वर्षांत भारतातील गुंतवणूक वाढवून 10 अब्ज डॉलरपर्यंत नेण्यात येईल.
- सॉफ्टबॅंक ही जपानमधील आघाडीची मोबाईल सेवा कंपनी आहे.
- अमेरिकेतील स्प्रिंट कॉर्पोरेशनमध्ये तिची भागीदारी आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात कंपनीने भारती एंटरप्रायझेस आणि तैवानमधील फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुप यांच्याशी एकत्रितपणे 20 गिगावॉटचा अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे.
दिनविशेष :
- जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन.
- 1910 : दक्षिण आफ्रिका स्वातंत्र्य दिन.
- 1910 : भा. रा. भागवत, मराठी बालसाहित्यकार आणि विज्ञान कथाकार यांचा जन्म.
- 1931 : जॉन रॉबर्ट श्रीफर, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा