Current Affairs of 4 & 5 August 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (4 आणि 5 ऑगस्ट 2015)

26/11 हल्ल्यामागे पाकिस्तानचाच हात:

  • मुंबईवर 26/11 रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचाच हात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
  • पाकची गुप्तहेर संस्था असलेल्या “फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी”च्या माजी प्रमुखांनीच ही कबुली दिली आहे.
  • दहशतवाद्यांना मुंबईवर हल्ला करण्याची परवानगी देऊन पाकिस्तानने मोठी चूक केली असून, ही कबुली येथील सरकारने द्यावी, असे गुप्तहेर संस्थेचे माजी प्रमुख तारिक खोसा यांनी म्हटले आहे.
  • मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा कट पाकिस्तानच्या भूमीवर आखण्यात आला होता, असे खोसा यांनी “डॉन” या दैनिकात लिहिलेल्या लेखामध्ये नमूद केले आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (3 ऑगस्ट 2015)

चाइल्ड पॉर्न वेबसाइट बंद:

  • वेबसाइटवरून 857 पॉर्न साइट ब्लॉक केल्यामुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यामुळे केंद्र शासनाने एक पाऊल मागे घेत फक्त चाइल्ड पॉर्न वेबसाइट ब्लॉक करण्याचा निर्णय आज घेतला आहे.
  • याबाबत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सारवासारव करीत सरसकट पॉर्न साइटवर बंदी घालण्याचा आपला निर्णय मागे घेण्यात आला.
  • प्रसाद यांनी याबाबत आज सचिव आर. एस. शर्मा आणि अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पिंकी आनंद यांच्यासोबत बैठक घेऊन हा निर्णय घेतला.
  • माहिती प्रसारण व तंत्रज्ञान विभागाने 31 जुलै रोजी माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 79 (अ) अंतर्गत 857 अनैतिक व असभ्य प्रकाशन म्हणून पॉर्न साइटवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता.
  • सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच असभ्य, अश्‍लील मजकूर असल्याने फक्त चाइल्ड पॉर्नवरच बंदी घालणार असल्याचे माहिती व प्रसारण मंत्रालयामार्फत कळविण्यात आले.
  • “माय गव्हर्नमेंट” या केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर आलेल्या देशभरातून आलेल्या प्रतिक्रियांचा विचार करूनच याबाबत केंद्राने पाऊल उचलले असल्याचे प्रसाद यांनी या वेळी बोलताना सांगितले.
  • तसेच पॉर्नोग्राफी विरहित विनोदी मजकूर असणाऱ्या वेबसाइटला धक्का न लावण्याचे केंद्राचे धोरण असल्याचे प्रसाद यांनी या वेळी सांगितले.

राष्ट्रपती भवनात नवचरा कक्ष चे उद्‌घाटन:

  • राष्ट्रपती भवनात आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी विज्ञान आणि नावीन्यता संग्रहालयाचे उद्‌घाटन केले.
  • नवचरा कक्ष असे नाव याला देण्यात आले असून, इंटेल इंडिया यांच्या मदतीने या संग्रहालयाची उभारणी करण्यात आली आहे.
  • यामध्ये माहितीबरोबरच शास्त्रीयदृष्ट्या आधारित अनेक गोष्टी ठेवण्यात आल्या आहेत.
  • या संग्रहालयात रोबोटिक डॉग, व्हर्चुअल तबला, स्ट्रिंगलेस पिआनो, थ्रीडी प्रिंटर, टॉकिंग वॉल आणि प्लॅनेट वॉलसारख्या विस्मयकारी गोष्टी ठेवण्यात आल्या आहेत तसेच संग्रहालयाला भेट देणारे लोक राष्ट्रपतींसोबत थ्रीडी स्टाइल सेल्फीजही काढू शकतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
  • राष्ट्रपती भवन भेटीमध्ये शुक्रवार, शनिवार आणि रविवारी लोकांना हे संग्रहालय पाहता येईल.

मॅगी नूडल्स पुन्हा बाजारात :

  • केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या एफएसएसएआय मान्यताप्राप्त प्रयोगशाळेने मॅगी नूडल्स सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिल्याने नेस्ले इंडिया कंपनीला प्रोत्साहन मिळाले आहे.
  • देशातील अन्न सुरक्षा मानकांचे पालन झाल्याचे प्रयोगशाळेने म्हटले आहे.
  • मॅगीमध्ये प्रमाणापेक्षा शिशाचे प्रमाण जास्त असल्याने जून महिन्यात मॅगीवर बंदी घालण्यात आली होती.
  • मात्र अन्न सुरक्षा मानकांचे पालन करण्यात आले असल्याचे नमुन्यांच्या चाचणीतून स्पष्ट झाले आहे, असे गोव्याचे अन्न आणि औषध प्रशासनाचे संचालक सलीम वेलजी यांनी सांगितले.
  • शिशाचे प्रमाण प्रमाणापेक्षा जास्त आढळल्याने गोवा अन्न-औषध प्रशासनाने म्हैसूर येथील प्रयोगशाळेत मॅगी नूडल्स चाचणीसाठी पाठविले होते.
  • काही राज्यांनी बंदी घातल्यानंतर नेस्ले कंपनीने जून महिन्यात मॅगीचे उत्पादन आणि विक्री थांबविली होती. मानवी सेवनासाठी मॅगी योग्य नसल्याचा निर्वाळा प्रयोगशाळेने दिला होता.
  • दरम्यान नेस्लेची मॅगी पुन्हा बाजारात आणणे याला आपले प्राधान्य असेल असे नेस्ले इंडियाचे नवे प्रमुख सुरेश नारायण यांनी सांगितले.

कर्करोगावर नवीन उपचारपद्धती:

  • कर्करोगावर मात करण्यासाठी प्रतिकारशक्तीवर आधारित नवीन उपचारपद्धती विकसित करण्यात आली असून चिलीतील सँटियागो येथे या पद्धतीचे सादरीकरण करण्यात आले.
  • त्यात मानवी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवून कर्करोगाच्या पेशी मारल्या जातात, ही उपचार पद्धती अजून वैद्यकपूर्व अवस्थेत आहे, असे संशोधक क्लॉदियो अॅक्युना यांनी सँटियागो विद्यापीठात सांगितले.
  • या पद्धतीचे अमेरिकेत लवकरच पेटंट घेतले जाणार आहे.
  • अॅक्युना यांनी सांगितले की, या उपचारपद्धतीत कर्करोगाविरोधी लस तयार करणे शक्य आहे. कर्करोगाची लक्षणे दिसत असलेल्या लोकांना ती देता येईल व त्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती वाढून कर्करोगाच्या पेशी मारल्या जातील.
  • कर्करोग होणारच नाही असे नाही, पण त्यासाठी ही पर्यायी उपचारपद्धती ठरणार आहे.
  • कर्करोगावरचा जागतिक पातळीवरील उपचार खर्च इतर उपचारपद्धतींच्या तुलनेत 70 टक्के कमी होईल.
  • या प्रतिकारशक्तीवर आधारित पद्धतीने स्तन, त्वचा, फुफ्फुसे, आतडे, पूरस्थ ग्रंथी यांचा पुढच्या अवस्थेत गेलेला कर्करोगही बरा करणे शक्य आहे.
  • या पद्धतीचे कुठलेही इतर वाईट परिणाम नसून उपचार खर्च 750 डॉलर्स इतका असेल.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराची किंमत 29 आणि 30 कोटी:

  • भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील ज्या घरात वास्तव्य होते त्या घराची किंमत 29 आणि 30 कोटी रुपये असल्याचा अहवाल दोन व्हॅल्युअर कंपन्यांनी दिला आहे.
  • मंत्रालयात आज सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या अहवालांवर चर्चा झाली.
  • यातील एक कंपनी राज्य शासनाने तर दुसरी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाने नेमली होती.
  • दोन्ही अहवालांचा अभ्यास केल्यानंतर शासन पुढील पाऊल उचलेल.
  • या घराच्या खरेदीसाठी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये 40 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

विश्वविख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि सुप्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन ब्रँड अ‍ॅम्बॅसिडर होण्याची विनंती:

  • महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पाकरिता विश्वविख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि सुप्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन यांना ब्रँड अ‍ॅम्बॅसिडर होण्याची विनंती करण्यात आल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
  • याकरिता कुणालाही मानधन देणार नसल्याचे स्पष्ट केले.
  • महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पासंबंधी माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचे मंगळवारी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
  • संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्प या ठिकाणी बिबट्या सफारी सुरू करण्यात येणार असल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले.
  • ठाणे खाडीमध्ये फ्लेमिंगो अभयारण्यासाठी 16 चौरस कि.मी. जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच पनवेलजवळील कर्नाळा अभयारण्याचा विस्तार करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे, असेही त्यांनी सांगितले.

दिनविशेष :

  • चिली बाल दिन
  • 1960 – बर्किना फासोला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
  • 1995 – क्रोएशियाच्या सैन्याने सर्बियातील क्निन शहर जिंकले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (6 ऑगस्ट 2015)

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

2 years ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

2 years ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago