Current Affairs of 4 April 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (4 एप्रिल 2018)

औषधांच्या किमतीत पाच टक्‍क्‍यांनी वाढ :

  • व्यक्तींना नियमित लागणाऱ्या औषधांवरील खर्चात या महिन्यापासून 3.4 टक्‍क्‍यांनी वाढ होणार आहे. या वाढलेल्या ‘एमआरपी’वर वस्तू व सेवाकर (जीएसटी) लावून खर्चाचा हा आकडा सुमारे पाच टक्‍क्‍यांपर्यंत वाढण्याची शक्‍यता आहे. म्हणजे मधुमेह, उच्च रक्तदाबाच्या औषधांवर दरमहा होणारा तीन हजारांचा खर्च आता 3 हजार 150 रुपयांपर्यंत जाईल, अशी माहिती पुढे आली आहे.
  • केंद्र सरकारने पेट्रोलपाठोपाठ आता मधुमेह, हृदयरोग, कर्करोगावरील रामबाण औषधांसह प्रभावी प्रतिजैविकांच्या किमतीत 3.4 टक्‍क्‍यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचे परिपत्रक ‘नॅशनल फार्मास्युटिकल प्राइजिंग ॲथोरेटी’चे (एनपीपीए) सहसंचालक बलजित सिंह यांनी प्रसिद्ध केले आहे.
  • तसेच गेल्या वर्षीच्या डब्ल्यूपीआयचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर 389 औषधांच्या किमतीत 3.44 टक्‍क्‍यांनी वाढ करण्याचा निर्णय ‘एनपीपीए‘ने घेतला.
  • ग्राहकांना किमती बरोबरच ‘जीएसटी‘ भरावा लागणार आहे. त्यामुळे 3.4 टक्‍क्‍यांपर्यंत असलेली दरवाढ पाच टक्‍क्‍यांपर्यंत वाढू शकते.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (3 एप्रिल 2018)

अॅमेझॉनची मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात :

  • नोटाबंदीनंतर ऑनलाइन व्यवहार करणाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. लॅपटॉप आणि मोबाईल यांचा वाढता वापर यांमुळे ऑनलाइन शॉपिंगमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली.
  • अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, इ-बे यांसारख्या साईटसवरुन खरेदी करणाऱ्यांचे प्रमाण वाढले. आता या कंपन्यांचा विस्तार झाल्यावर त्यांनी नोकरभरतीही केली.
  • पण मागच्या काही काळात आर्थिक गणिते कोलमडल्याने काही कंपन्यांनी कर्मचारी कपातही केली. अॅमेझॉननेही नुकतीच आपल्या कर्मचारी संख्येत कपात केली असून गेल्याच आठवड्यात 60 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी करण्यात आले आहे.
  • ई कॉमर्स कंपन्यांमध्ये अग्रेसर असलेल्या या कंपनीने जगभरातील आपल्या व्यवसायाचे रि-स्ट्रक्चर करण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. इतकेच नाही तर येत्या काळात कंपनी आपल्या आणखी काही कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी करु शकते असे सांगण्यात आले आहे.

महेंद्रसिंग धोनीने समर्पित केला पद्मभूषण :

  • भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला 2 एप्रिल रोजी नवी दिल्लीत पद्मभूषण सन्मानाने गौरवण्यात आले. यावेळी महेंद्रसिंग धोनीने लेफ्टनंट कर्नलचा पोषाख घातला होता. यावेळी त्याची पत्नी साक्षीदेखील उपस्थित होती.
  • दरम्यान महेंद्रसिंग धोनीने आपला हा सन्मान जवान आणि त्यांच्या कुटुंबियांना समर्पित केला आहे. धोनीने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
  • धोनीने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मान स्विकारतानाचा फोटो शेअर केला आहे. यावेळी त्याने कॅप्शन लिहिले आहे की, ‘पद्मभूषण स्विकारणे हा माझ्यासाठी सन्मान असून तो लष्कराच्या गणवेशात स्विकारताना माझा आनंद दहापटीने वाढला होता. आमच्यासाठी बलिदान देणा-या जवान आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांचे आभार. तुमच्यामुळेच आम्ही आमचे घटनात्मक अधिकार वापरु शकतो. जय हिंद’.
  • विशेष म्हणजे धोनीने बरोबर सात वर्षांपूर्वी 2 एप्रिलला भारताला विश्वचषक जिंकून दिला होता. या विजयाच्या सातव्या वर्धापनदिनीच त्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मभूषण सन्मान देण्यात आला.

चीन-अमेरिकेमधील व्यापारयुद्ध शिगेला पोहचला :

  • अमेरिका व चीन यांच्यातील व्यापार युद्ध टिपेला पोहोचले असून चीनने अमेरिकेच्या 128 उत्पादनांवर नवे शुल्क आकारले आहे, त्यात मांस व फळांचा समावेश आहे. एकूण 3 अब्ज डॉलर्सचा कर लादल्याने अमेरिकेला फटका बसणार आहे.
  • अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने परदेशातून येणाऱ्या पोलाद व अ‍ॅल्युमिनियमवर कर लादला होता, त्याचा बदला घेण्यासाठी चीनने अमेरिकेच्या 128 उत्पादनांवर आयात शुल्क लावले आहे, आधी आयात शुल्कातून सूट दिलेली होती ती काढून घेण्यात आली आहे.
  • चीनच्या व्यापार मंत्रालयाने सांगितले, की मंत्रिमंडळाने 120 अमेरिकी उत्पादनांवर 15 टक्के तर इतर आठ उत्पादनांवर 25 टक्के आयात शुल्क आकारण्याचे ठरवले आहे. त्यात मांस व इतर आयात वस्तूंचा समावेश आहे.
  • अमेरिकेने पोलाद व अ‍ॅल्युमिनियमवर आयात कर आकारला होता, त्याचा बदला घेण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 23 मार्च रोजी चीनकडून आयात होणाऱ्या वस्तूंवर 60 अब्ज अमेरिकी डॉलर्सचे आयातशुल्क लादले होते. चीनच्या अमेरिकेतील गुंतवणुकीवरही अमेरिकेने मर्यादा आणल्या.

यंत्रमानवाव्दारे उमेदवारांच्या मुलाखती :

  • उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांची विविध पदांसाठी निवड करण्याचे कौशल्य असलेल्या यंत्रमानवाची (रोबो) निर्मिती रशियातील स्टॅफोरी या स्टार्टअपकडून करण्यात आली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार करण्यात आलेल्या या रोबोचे नावव्हेरा‘ असे आहे. या ‘व्हेरा‘ ने आत्तापर्यंत दोन हजार उमेदवारांच्या मुलाखती घेतल्याचेही कंपनीने म्हटले आहे.
  • जगभरातील सुमारे तीनशे कंपन्यांना ‘व्हेरा‘ने सेवा पुरविली असून, त्यात पेप्सीको, एल ओरियल आदी मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे.
  • वेगवेगळ्या संकेतस्थळांवरील उमेदवारांच्या माहितीचा अभ्यास करून व्हेरा या उमेदवारांची मुलाखतही घेते. ती एकाच वेळी अनेक उमेदवारांच्या मुलाखती घेऊ शकते. त्यामुळे खूप मोठ्या संख्येने उमेदवारांच्या मुलाखती घेण्याची जबाबदारी व्हेराकडे सोपविली जाते. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग किंवा फोनकॉल करून व्हेरा उमेदवारांच्या मुलाखती घेते.
  • कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या यंत्रांचा वापर वाढल्यामुळे 2030 मध्ये 80 कोटी नोकऱ्या जाणार असल्याचा इशारा ‘मॅकिन्झी’च्या अहवालात देण्यात आला होता. व्होराची काम करण्याची क्षमता पाहता हा इशारा लवकरच खरा ठरू शकतो, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे.

डॉ. पटेल यांना प्राचार्य कणबरकर पुरस्कार जाहीर :

  • शिवाजी विद्यापीठातर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा प्राचार्य आर.के. कणबरकर राष्ट्रीय पुरस्कार यंदा ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक जब्बार पटेल यांना जाहीर झाला.
  • 13 एप्रिलला दुपारी चार वाजता भाषा भवनात हा  पुरस्कार प्रदान करण्यात येईल, अशी घोषणा कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी केली.
  • माजी कुलगुरू प्राचार्य रा.कृ. कणबरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारनिर्मितीसाठी त्यांच्या कुटुंबीयांनी 25 लाखांची ठेव विद्यापीठाला दिली आहे.
  • शालिनी कणबरकर यांच्यासमवेत झालेल्या करारातून माजी कुलगुरूंच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘प्राचार्य आर.के. कणबरकर पुरस्कारा’ची संयुक्त निर्मिती केली. एक लाख 51 हजार, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • तसेच प्रथम पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. सी.एन.आर.राव यांना, तर गतवर्षी रयत शिक्षण संस्थेला या पुरस्काराने गौरविल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.

दिनविशेष :

  • फिशर इलेक्ट्रॉनिक्स चे स्थापक एवेरी फिशर यांचा जन्म 4 एप्रिल 1906 रोजी झाला.
  • सन 1949 मध्ये 4 एप्रिल रोजी पश्चिम युरोपातील अकरा देश आणि अमेरिका अशा 12 देशांनी नाटो (NATO) या संस्थेची स्थापना केली.
  • जेम्स अर्ल रे यांनी मार्टिन ल्यूथर किंग (ज्यु.) यांची सन 1968 मध्ये 4 एप्रिल रोजी हत्या केली.
  • नासाने 4 एप्रिल 1968 रोजी अपोलो-6 चे प्रक्षेपण केले.
  • लता मंगेशकर यांना 4 एप्रिल 1990 रोजी दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (5 एप्रिल 2018)

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Sandip Rajput

Sandip is empowered with his solid education in arts and uses his crisp way of expressing ideas about competitive exams. Sandip has covered the breadth of technology and believes in keeping updated. His core expertise is his awareness of educational requirements and possible knowledge to be delivered on time. Sandip is positive that a healthy blend of novelties would change smart education in a proper way.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago