Current Affairs of 4 August 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (4 ऑगस्ट 2016)
जागतिक रँकिंगमध्ये विजेंदसिंह 10व्या स्थानी :
- गत महिन्यात आशियाई पॅसिफिक सुपर मिडलवेट जेतेपद पटकावणारा भारताचा व्यावसायिक बॉक्सर विजेंदरसिंग हा विश्व बॉक्सिंग संघटनेच्या (डब्ल्यूबीओ) रँकिंगमध्ये दहाव्या स्थानावर आला.
- दहा राऊंडपर्यंत चाललेल्या उत्कंठापूर्ण लढतीत युरोपियन चॅम्पियन केरी होप्स याला पराभूत केले होते.
- गेल्या वर्षी व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये पदार्पण केल्यापासून विजेंदरने अपराजित राहण्याचा पराक्रम करताना स्वत:ची दखल घेण्यास भाग पाडले आहे.
- तसेच त्याने आतापर्यंत सलग सात लढती जिंकल्या. त्यातील सहा विजय ‘नॉकआऊट’ होते.
- विजेंदर हा क्रमवारीत अमेरिकेचा स्टार ट्रॅव्हर मॅकेम्बी याच्यापेक्षा वरच्या स्थानावर आहे.
Must Read (नक्की वाचा):
गृहमंत्री राजनाथसिंह पाकिस्तान दौर्यावर :
- गृहमंत्री राजनाथसिंह यांचे (दि.3) पाकिस्तान येथे आगमन झाले.
- इस्लामाबाद येथे (दि.4) आयोजित सार्क मंत्री परिषदेत ते सहभागी होणार असून, परिषदेत ते दहशतवाद, तसेच कुख्यात दाऊद इब्राहिमविषयीचा मुद्दा उचलून धरतील, अशी अपेक्षा आहे.
- सीमेपलीकडून दहशतवादाला पाकिस्तानकडून मिळणारे खतपाणी, दाऊद इब्राहिमचे हस्तांतर यासह दक्षिण आशियाई देशांकडून परस्पर सहकार्य वाढविण्यावर या दौऱ्यात भर राहील, असे राजनाथसिंह यांनी दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी स्पष्ट केले होते.
- तसेच ही परिषद अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने समोर उभ्या राहिलेल्या प्रश्नांवर चर्चा करण्याचे प्रभावी माध्यम असल्याचेही त्यांनी नमूद केले होते.
- परिषदेत राजनाथसिंह पाकिस्तानला दहशतवादी संघटनांना होणारी मदत थांबवावी, या विषयावर चर्चा करतील.
राज्यात राबवणार ‘चिरंजीव’ योजना :
- राज्यातील ज्या भागात मातामृत्यू दर आणि अर्भक मृत्युदर जास्त आहे अशा भागात गुजरातच्या धर्तीवर चिरंजीव योजना हा पायलट प्रकल्प राबविला जाणार आहे.
- तसेच जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या उपलब्धतेनुसार वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार असल्याची घोषणा आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधान परिषदेत केली.
- आमदार नीलम गोऱ्हे, हुस्नबानो खलिफे, माणिकराव ठाकरे, भाई गिरकर, तसेच इतर सदस्यांनी राज्यातील रुग्णालयाबाबत प्रस्ताव मांडला.
- राज्यातील रुग्णालयांमध्ये वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात गुणवत्तापूर्ण रुग्णसेवा पुरविण्यासाठी डॉक्टरांबरोबर विशेषज्ञ डॉक्टरांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्नशील असून, प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयात पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय असणार आहे.
- तसेच त्याबरोबर डॉक्टरांचे वय 58 वर्षांवरून 60 वर्षे वाढविण्याचे केंद्राकडे प्रस्तावित असल्याचेही सांगितले.
- रुग्णालयामधून बालकांची होणारी चोरी टाळण्यासाठी जिल्हा रुग्णालयांत सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध करून दिले जात आहेत.
लोकमत विधिमंडळ पुरस्कार सोहळा :
- ‘लोकमत वृत्तपत्र समूहा’तर्फे विधानसभा आणि विधान परिषदेत सर्वात्कृष्ट कार्य करणाऱ्या आमदारांना ‘लोकमत विधिमंडळ पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
- असे पुरस्कार देणारे ‘लोकमत’ हे पहिले वृत्तपत्र आहे.
- स्वातंत्र्य दिनाच्या 70व्या वर्धापन दिनानिमित्त हा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.
- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या मुख्य सभागृहात हा पुरस्कार सोहळा पार पडला.
- पुरस्काराचे मानकरी –
- लोकमत रिडर्स चॉईस अवॉर्ड – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- जीवनगौरव पुरस्कार (विधानसभा सदस्य) – गणपतराव देशमुख
- जीवनगौरव पुरस्कार (विधान परिषद सदस्य) – शिवाजीराव देशमुख
- उत्कृष्ट नवोदित आमदार (विधानसभा सदस्य) – अतुल भातखळकर
- उत्कृष्ट नवोदित आमदार (विधान परिषद सदस्य) – राहुल नार्वेकर
- उत्कृष्ट महिला आमदार (विधानसभा सदस्य) – वर्षा गायकवाड
- उत्कृष्ट महिला आमदार (विधान परिषद सदस्य) – निलम गो-हे
- उत्कृष्ट अभ्यासू वक्ता (विधानसभा सदस्य) – प्रकाश आबिटकर
- उत्कृष्ट अभ्यासू वक्ता (विधान परिषद सदस्य) – धनंजय मुंडे
पुष्पकमल दहल दुसऱ्यांदा नेपाळच्या पंतप्रधानपदी :
- कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळचे (सीपीएन) प्रमुख आणि माओवादी नेते पुष्पकमल दहल ऊर्फ प्रचंड यांची नेपाळच्या पंतप्रधानपदी दुसऱ्यांदा निवड करण्यात आली.
- मागील काही काळापासून अस्थिरता अनुभवत असलेल्या नेपाळमध्ये प्रचंड यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापणार नाही.
- नेपाळच्या संसदेत झालेल्या मतदानामध्ये प्रचंड यांच्या बाजूने 363 मते पडली, तर विरोधात 210 मते पडली.
- प्रचंड यांची पंतप्रधानपदाची ही दुसरी ‘टर्म‘ आहे. या पूर्वी 2008 ते 2009 या काळात प्रचंड यांनी नेपाळच्या पंतप्रधानपदी काम केले होते.
- तत्कालीन लष्करप्रमुखांना निलंबित करण्याच्या निर्णयावरून प्रचंड यांचे लष्कराशी मतभेद झाले होते. त्यानंतर प्रचंड यांनी पंतप्रधानपदाच्या राजीनामा दिला होता.
दिनविशेष :
- 1835 : जॉन व्हेन, इंग्लिश गणितज्ञ यांचा जन्म.
- 1894 : ना.सी. फडके, प्रसिद्ध कथा-कादंबरीकार यांचा जन्म.
- 1923 : नागपूर विद्यापीठाची स्थापना.
- 1929 : किशोर कुमार, भारतीय अभिनेता, पार्श्वगायक यांच्या जन्म.
- 1947 : जपानच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा