Current Affairs of 4 August 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (4 ऑगस्ट 2016)

जागतिक रँकिंगमध्ये विजेंदसिंह 10व्या स्थानी :

  • गत महिन्यात आशियाई पॅसिफिक सुपर मिडलवेट जेतेपद पटकावणारा भारताचा व्यावसायिक बॉक्सर विजेंदरसिंग हा विश्व बॉक्सिंग संघटनेच्या (डब्ल्यूबीओ) रँकिंगमध्ये दहाव्या स्थानावर आला.
  • दहा राऊंडपर्यंत चाललेल्या उत्कंठापूर्ण लढतीत युरोपियन चॅम्पियन केरी होप्स याला पराभूत केले होते.
  • गेल्या वर्षी व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये पदार्पण केल्यापासून विजेंदरने अपराजित राहण्याचा पराक्रम करताना स्वत:ची दखल घेण्यास भाग पाडले आहे.
  • तसेच त्याने आतापर्यंत सलग सात लढती जिंकल्या. त्यातील सहा विजय ‘नॉकआऊट’ होते.
  • विजेंदर हा क्रमवारीत अमेरिकेचा स्टार ट्रॅव्हर मॅकेम्बी याच्यापेक्षा वरच्या स्थानावर आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (3 ऑगस्ट 2016)

गृहमंत्री राजनाथसिंह पाकिस्तान दौर्‍यावर :

  • गृहमंत्री राजनाथसिंह यांचे (दि.3) पाकिस्तान येथे आगमन झाले.
  • इस्लामाबाद येथे (दि.4) आयोजित सार्क मंत्री परिषदेत ते सहभागी होणार असून, परिषदेत ते दहशतवाद, तसेच कुख्यात दाऊद इब्राहिमविषयीचा मुद्दा उचलून धरतील, अशी अपेक्षा आहे.
  • सीमेपलीकडून दहशतवादाला पाकिस्तानकडून मिळणारे खतपाणी, दाऊद इब्राहिमचे हस्तांतर यासह दक्षिण आशियाई देशांकडून परस्पर सहकार्य वाढविण्यावर या दौऱ्यात भर राहील, असे राजनाथसिंह यांनी दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी स्पष्ट केले होते.
  • तसेच ही परिषद अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने समोर उभ्या राहिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करण्याचे प्रभावी माध्यम असल्याचेही त्यांनी नमूद केले होते.
  • परिषदेत राजनाथसिंह पाकिस्तानला दहशतवादी संघटनांना होणारी मदत थांबवावी, या विषयावर चर्चा करतील.

राज्यात राबवणार ‘चिरंजीव’ योजना :

  • राज्यातील ज्या भागात मातामृत्यू दर आणि अर्भक मृत्युदर जास्त आहे अशा भागात गुजरातच्या धर्तीवर चिरंजीव योजना हा पायलट प्रकल्प राबविला जाणार आहे.
  • तसेच जिल्हा रुग्णालयात डॉक्‍टरांच्या उपलब्धतेनुसार वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार असल्याची घोषणा आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधान परिषदेत केली.
  • आमदार नीलम गोऱ्हे, हुस्नबानो खलिफे, माणिकराव ठाकरे, भाई गिरकर, तसेच इतर सदस्यांनी राज्यातील रुग्णालयाबाबत प्रस्ताव मांडला.
  • राज्यातील रुग्णालयांमध्ये वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात गुणवत्तापूर्ण रुग्णसेवा पुरविण्यासाठी डॉक्‍टरांबरोबर विशेषज्ञ डॉक्‍टरांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्नशील असून, प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयात पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय असणार आहे.
  • तसेच त्याबरोबर डॉक्‍टरांचे वय 58 वर्षांवरून 60 वर्षे वाढविण्याचे केंद्राकडे प्रस्तावित असल्याचेही सांगितले.
  • रुग्णालयामधून बालकांची होणारी चोरी टाळण्यासाठी जिल्हा रुग्णालयांत सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध करून दिले जात आहेत.

लोकमत विधिमंडळ पुरस्कार सोहळा :

  • ‘लोकमत वृत्तपत्र समूहा’तर्फे विधानसभा आणि विधान परिषदेत सर्वात्कृष्ट कार्य करणाऱ्या आमदारांना ‘लोकमत विधिमंडळ पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
  • असे पुरस्कार देणारे ‘लोकमत’ हे पहिले वृत्तपत्र आहे.
  • स्वातंत्र्य दिनाच्या 70व्या वर्धापन दिनानिमित्त हा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.
  • यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या मुख्य सभागृहात हा पुरस्कार सोहळा पार पडला.
  • पुरस्काराचे मानकरी –
  • लोकमत रिडर्स चॉईस अवॉर्ड – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • जीवनगौरव पुरस्कार (विधानसभा सदस्य) – गणपतराव देशमुख
  • जीवनगौरव पुरस्कार (विधान परिषद सदस्य) – शिवाजीराव देशमुख
  • उत्कृष्ट नवोदित आमदार (विधानसभा सदस्य) – अतुल भातखळकर
  • उत्कृष्ट नवोदित आमदार (विधान परिषद सदस्य) – राहुल नार्वेकर
  • उत्कृष्ट महिला आमदार (विधानसभा सदस्य) – वर्षा गायकवाड
  • उत्कृष्ट महिला आमदार (विधान परिषद सदस्य) – निलम गो-हे
  • उत्कृष्ट अभ्यासू वक्ता (विधानसभा सदस्य) – प्रकाश आबिटकर
  • उत्कृष्ट अभ्यासू वक्ता (विधान परिषद सदस्य) – धनंजय मुंडे

पुष्पकमल दहल दुसऱ्यांदा नेपाळच्या पंतप्रधानपदी :

  • कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळचे (सीपीएन) प्रमुख आणि माओवादी नेते पुष्पकमल दहल ऊर्फ प्रचंड यांची नेपाळच्या पंतप्रधानपदी दुसऱ्यांदा निवड करण्यात आली.
  • मागील काही काळापासून अस्थिरता अनुभवत असलेल्या नेपाळमध्ये प्रचंड यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापणार नाही.
  • नेपाळच्या संसदेत झालेल्या मतदानामध्ये प्रचंड यांच्या बाजूने 363 मते पडली, तर विरोधात 210 मते पडली.
  • प्रचंड यांची पंतप्रधानपदाची ही दुसरी ‘टर्म‘ आहे. या पूर्वी 2008 ते 2009 या काळात प्रचंड यांनी नेपाळच्या पंतप्रधानपदी काम केले होते.
  • तत्कालीन लष्करप्रमुखांना निलंबित करण्याच्या निर्णयावरून प्रचंड यांचे लष्कराशी मतभेद झाले होते. त्यानंतर प्रचंड यांनी पंतप्रधानपदाच्या राजीनामा दिला होता.

दिनविशेष :

  • 1835 : जॉन व्हेन, इंग्लिश गणितज्ञ यांचा जन्म.
  • 1894 : ना.सी. फडके, प्रसिद्ध कथा-कादंबरीकार यांचा जन्म.
  • 1923 : नागपूर विद्यापीठाची स्थापना.  
  • 1929 : किशोर कुमार, भारतीय अभिनेता, पार्श्वगायक यांच्या जन्म.
  • 1947 : जपानच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना. 

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (5 ऑगस्ट 2016)

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago