चालू घडामोडी (4 ऑगस्ट 2017)
जागतिक योगा स्पर्धेत श्रेया कंधारेला सुवर्णपदक :
- सिंगापूर येथे झालेल्या सातव्या एशियन योगा स्पोर्ट्स चॅम्पियनशिप स्पर्धेत कोंढवळे (ता. मुळशी) येथील श्रेया कंधारे हिने 16 वर्ष वयोगटात दोन सुवर्णपदके पटकावित भारताचा तिरंगा जगात उंचावला आहे.
- आठ देशांतील दोनशेपेक्षा जास्त योगापटूंना नमवत श्रेयाने ही जिगरबाज कामगिरी केली असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
- श्रेया ही पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या आकुर्डी येथील म्हाळसाकांत विद्यालयात इयत्ता बारावी कला शाखेत शिकते. तालुकापातळीवर अव्वल यश मिळवित श्रेया थेट राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरही पोचली.
- तसेच 5 वर्षांत तिने महाराष्ट्राला 5 सुवर्ण, 5 रौप्य आणि 8 कांस्यपदके मिळवून दिली. याचबरोबर मलेशियामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत तिने भारताला कांस्यपदक मिळवून दिले होते.
संभाजीराजे यांना भाजपाचे सहयोगी सदस्यत्व :
- कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे यांनी भाजपचे सहयोगी सदस्यत्व घेतल्याचे स्पष्ट झाले.
- राज्यसभेवर नियुक्त झाल्यानंतर सहा महिन्यांनी संबंधित खासदारांना आपला पक्ष किंवा अपक्ष राहणार असेल तर तसे स्पष्ट करावे लागते. मात्र, या सन्मानाच्या पदावर दिलेली संधी, महाराष्ट्राचे प्रश्न मांडण्याची मिळणारी संधी, मराठा आरक्षणापासून अनेक प्रश्नांबाबत लागणारे पाठबळ याचा विचार करून मी भाजपचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले आहे. मी भाजपमध्ये गेलो नाही तर सहयोगी सदस्यत्व घेतल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.
महानगर अध्यक्ष तापडिया यांचा राजीनामा :
- राष्ट्रवादीचे महानगर जिल्हाध्यक्ष अजय तापडिया यांनी 3 ऑगस्ट रोजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला.
- पक्षानेही हा राजीनामा तातडीने मंजूर केला असून, महानगर जिल्हाध्यक्ष पदाचाप्रभार राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राजू मुलचंदानी यांच्याकडे दिला आहे.
- महापालिका निवडणुकांमध्ये झालेल्या तिकिट वाटपातील आरोप-प्रत्यारोपाला कंटाळून तापडिया यांनी हा राजीनामा दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार पक्षबांधणीसाठी ऑगस्टमध्ये अकोला दौर्यावर येत आहेत, त्यानिमित्ताने पक्षांतर्गत मोठे फेरबदल होण्याचे संकेत आहेत.
राज्य शासनाव्दारे आमगावला नगर परिषदेचा दर्जा :
- आमगाव नगरपंचायतला नगर परिषदेला दर्जा देण्यात यावा. या मागणीसाठी गेल्या दोन वर्षांपासून संघर्ष समितीने लढा उभारला होता. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून शासनाने आमगावला नगर परिषदेचा दर्जा देण्यात आल्याची अधिसूचना 2 ऑगस्ट रोजी जारी करण्यात आली.
- राज्य शासनाने राज्यातील अनेक तालुका पातळीवरील ग्रामपंचायतींना लोकसंख्या व ग्रामीण क्षेत्रातून नागरी क्षेत्राचा समावेश करुन होणारे क्षेत्र यांचे नगर पंचायतीत समायोजन करुन नगर पंचायतची स्थापना 2015 केली होती.
- परंतु, आमगाव येथील नागरिकांनी नगर पंचायत ऐवजी शासनाने नगर परिषदेचा दर्जा द्यावा अशी मागणी लावून धरली. यासाठी संघर्ष समितीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका दाखल केली होती.
- न्यायालयाने शासनाने नगर परिषद स्थापनेचा निर्णय शासनाकडे सोपविला. परंतु, शासनाने मागील दोन वर्षांपासून यासंदर्भात कुठलाच निर्णय घेतला नव्हता.
- निर्णयाअभावी नागरिकांना प्रशासकाच्या अनियंत्रीत कारभारामुळे विकासापासून वंचित राहावे लागले. संघर्ष समितीने शासनाकडे नगर परिषदेचा दर्जा देण्यात यावा. या मागणीसाठी अनेक पत्र व्यवहार व आंदोलनाची भूमिका घेतली होती.
- संघर्ष समितीने राजकीय नेते, लोकप्रतिनिधी यांनाही या संदर्भात सक्रिय सहभाग घेण्यासाठी प्रयत्न केले. अखेर शासनाने आमगाव नगर परिषद स्थापनेचा निर्णय घेत त्याची अधिसुचना काढली. शासनाने विकासाच्या दृष्टीने घेतलेल्या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले.
दिनविशेष :
- प्रसिद्ध कथा-कादंबरीकार ना.सी. फडके (नारायण सीताराम फडके) यांचा जन्म 4 ऑगस्ट 1894 मध्ये झाला.
- 4 ऑगस्ट 1923 मध्ये नागपूर विद्यापीठाची स्थापना झाली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा