अ.क्र | ठळक घडामोडी |
1. | वाजपेयींचा जन्मदिन ‘उत्तम प्रशासन दिन’ म्हणून साजरा करण्याची योजना |
2. | अनिल कुमार सिन्हा ‘सीबीआय’चे नवे संचालक |
3. | भ्रष्टाचारात भारत 85 वा |
4. | ‘बॉम्बे हायकोर्टाचे मुंबई उच्च न्यायालय असे नामकरण करा’ |
5. | अग्निशमन दलातील जवानांना 13 वर्षानी शौर्यपदके मिळणार |
वाजपेयींचा जन्मदिन ‘उत्तम प्रशासन दिन’ म्हणून साजरा करण्याची योजना :
- भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस आता ‘उत्तम प्रशासन दिन‘ म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
- 25 डिसेंबर केंद्रातील भाजपप्रणाली सरकारची ओळख एक आदर्श प्रशासक म्हणून व्हावी, या उद्देशाने हा कार्यक्रम हाती घेण्यात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सांगितले.
अनिल कुमार सिन्हा ‘सीबीआय’चे नवे संचालक :
- आयपीएस अनिल कुमार सिन्हा यांची सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्य न्यायधीश एच.एल.दत्तू आणि विरोधीपक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गी यांनी सिन्हा यांची संचालक पदावर नेमणूक केली आहे.
- 40 अधिकार्यांच्या यादीतून सिन्हा यांची निवड करण्यात आली आहे.
- अनिल कुमार सिन्हा यांची पुढील दोन वर्षासाठी सीबीआय पदि नेमणूक करण्यात आली आहे.
- सिन्हा यांना राष्ट्रपती पदानेही गौरवण्यात आले आहे.
भ्रष्टाचारात भारत 85 वा :
- जगातील सर्व भ्रष्ट देशांच्या यादीत भारताचा 85 व क्रमांक लागला आहे.
- गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भारताच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे.
- ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या अंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे दरवर्षी भ्रष्टाचारसंदर्भात अहवाल प्रसिद्ध केला जातो.
- जर्मनीत या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. या अहवालात 175 देशांमधील सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे.
- पहिले भारत 94व्या स्थानावर होता चीन (80), पाकिस्तान (126), युनायटेड किंगडम (17)
- सर्वात कमी भ्रष्टाचार असलेले अव्वल 5 देश डेन्मार्क, न्यूझीलंड, फिनलॅँड, स्वीडन, नॉर्वे
- सर्वाधिक भ्रष्टाचार असलेले 5 देश सोमालिया, उत्तर कोरिया, सुदान, अफगाणिस्तान, दक्षिण सुदान
‘बॉम्बे हायकोर्टाचे मुंबई उच्च न्यायालय असे नामकरण करा’ :
- येत्या 26 जानेवारीपूर्वी बॉम्बे हायकोर्टाचे नाव बदलून मुंबई उच्च न्यायालय करा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी बुधवारी लोकसभेत केली.
- बॉम्बे हायकोर्टाचे नाव बदलण्याची 2008 सालापासून लोकसभेत मागणी करण्यात येत आहे.
अग्निशमन दलातील जवानांना 13 वर्षानी शौर्यपदके मिळणार :
- 63 जवानांची नावे जाहीर.
- रखडलेली शौर्यपदक परंपरा शिवसेनेच्या संघटनेमुळे पुन्हा सुरू.
- 2001 पासून बंद पडलेली ही प्रथा ‘मुंबई अग्निशमन लढवू कामगार संघटना‘ या शिवसेनेच्या कामगार संघटनेमुळे पुन्हा एकदा सुरू होणार आहे.