Current Affairs of 4 January 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (4 जानेवारी 2016)

चालू घडामोडी (4 जानेवारी 2016)

देशाच्या प्रगतीसाठी फाइव्ह-ई महत्त्वाचे :

  • शास्त्रीय संशोधन आणि विज्ञान प्रशासन अधिक सोपे झाल्यास देशाच्या प्रगतीचा मार्ग अधिक सुकर होऊ शकतो.
  • देशातील शास्त्रज्ञांनी संशोधन करताना “पाच ई‘ म्हणजेच इकॉनॉमी, एन्व्हायर्न्मेंट, एनर्जी, एम्पथी आणि इक्विटीवर भर द्यावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
  • या फाइव्ह-ईच्या माध्यमातून देशाच्या विकासाचा वेग आणखी वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. ते आज भारतीय विज्ञान परिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी बोलत होते.
  • मानव कल्याण आणि आर्थिक विकासाचे ध्येय गाठण्यासाठी आपण शास्त्रीय दृष्टिकोनाकडे वळत आहेत.

दक्षिण आशियाई फुटबॉल (सॅफ) सातव्यांदा अजिंक्यपद :

  • कर्णधार सुनील छेत्रीने अतिरिक्त वेळेत फ्री किकवर केलेल्या गोलच्या बळावर भारताने अफगाणिस्तानला 2-1 ने नमवून दक्षिण आशियाई फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे (सॅफ) सातव्यांदा अजिंक्यपद पटकाविण्याची किमया केली.

महाशहरांच्या यादीत मुंबई, दिल्लीचा समावेश :

  • जगातील शक्तिशाली, उत्पादक व संपर्क जोडणी उत्तम असलेल्या तीस महाशहरांच्या यादीत दिल्ली व मुंबई यांचा समावेश झाला आहे.
  • जेएलएल या इंटरनॅशनल रिअल इस्टेट कन्सलटन्सीने केलेल्या अभ्यासानुसार भारताची आर्थिक राजधानी असलेली मुंबई 22 व्या तर दिल्ली 24 व्या क्रमांकावर आहे.
  • यात टोकियो सर्वोच्च स्थानावर असून त्यानंतर न्यूयॉर्क, लंडन व पॅरिस यांचा समावेश आहे.
  • या शहरांमध्ये जगातील महाशहरात असलेल्या गुंतवणुकीच्या पन्नास टक्के परदेशी भांडवलाची गुंतवणूक झालेली आहे.

    

मेट्रो स्थानकांवर विनामूल्य वाय-फाय सुविधा :

  • दिल्ली मेट्रोने आपल्या प्रवाशांसाठी दोन मेट्रो स्थानकांवर विनामूल्य वाय-फाय सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
  • राजीव चौक आणि काश्‍मीरी स्थानकांवर ही सुविधा शनिवारपासून उपलब्ध झाली आहे.
  • मेट्रोने अशाप्रकारची वाय-फाय सुविधा प्रथमच उपलब्ध करून दिली आहे.
  • स्थानकांवरील प्रवासी पहिले 30 मिनिटे विनामूल्य वाय-फाय वापरू शकणार असून त्यापुढील वापरासाठी शुल्क आकारले जाणार आहे.

 

आता ग्रामपंचायती ऑफलाइन :

  • महाऑनलाइनच्या माध्यमातून मागील चार वर्षांपासून राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये काम करणाऱ्या संगणक ऑपरेटरचा करारनामा 31 डिसेंबरला संपला.
  • ग्रामपंचायतीतील दैनंदिन कामांवर याचा परिणाम होणार असून, ग्रामपंचायती ऑफलाइन झाल्या आहेत.
  • त्यांची सेवा समाप्त झाली तरी राज्यातील सुमारे 25 हजार संगणकचालकांचे पाच महिन्यांचे 56 कोटी 25 लाख रुपयांचे मानधन थकीत आहे.

कसोटी इतिहासातील दुसरे वेगवान व्दिशतक :

  • अष्टपैलू बेन स्टोक्सने कसोटी इतिहासातील दुसरे वेगवान व्दिशतक ठोकताना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी 258 धावा काढल्या.  
  • डावात सर्वाधिक षट्कार मारण्याच्या यादीत स्टोक्स सयुंक्तरीत्या दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला.

दिनविशेष :

  • म्यानमारचा मुक्तीदिन.
  • आंतरराष्ट्रीय ब्रेल दिन.
  • 1885 : केसरी वॄत्तपत्राची सुरुवात.
  • 1964 : भारतातील पहिले डिझेल वाराणसी येथे तयार झाले.

  

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.