चालू घडामोडी 4 जुलै 2015
पुण्यात सायबर सुरक्षा केंद्र उभारण्याचे जाहीर
- माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक पातळीवरील आघाडीच्या मायक्रोसॉफ्ट या समूहाने राज्यात एक स्मार्ट औद्योगिक वसाहत, तसेच पुण्यात सायबर सुरक्षा केंद्र उभारण्याचे जाहीर केले आहे.
- याशिवाय महाराष्ट्र शासनाच्या डिजिटल व्हिलेज या उपक्रमास सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेत कंपनीने मान्य केले.
एमटीएनएलचे भारत संचार निगम लिमिटेडमध्ये विलीनीकरण करण्यात येणार :
- महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) कंपनीला शेअर बाजाराच्या सूचीतून काढून (डिलिस्ट) भारत संचार निगम लिमिटेडमध्ये विलीनीकरण करण्यात येणार आहे.
- तसेच सरकारने विलीनीकरण करण्यासाठी 31 जुलै तारीख निश्चित केली असल्याचे म्हटले आहे.
- एमटीएनएलला मार्च 2009 पासून गेल्या 25 तिमाहींपैकी 22 तिमाहींमध्ये नुकसान झाले आहे. फक्त सप्टेंबर 2009, डिसेंबर 2013 आणि मार्च 2014 या तीन तिमाहींमध्ये कंपनीने नफा मिळविला होता.
ऑनलाइन कृषी बाजार सुरू करण्यास सरकारची मंजुरी :
- शेतकऱ्यांना त्यांची उत्पादने विकण्यासाठी अधिक पर्याय मिळावेत यासाठी ऑनलाइन कृषी बाजार सुरू करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे.
- याबाबतचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
- या योजनेसाठी 200 कोटी रुपयांच्या निधीला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.
- सध्या शेतकऱ्यांना कृषी मंडई किंवा कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आपले उत्पादन विकावे लागते.
- .मात्र, ऑनलाइन व्यवस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फळे, भाज्या आणि अन्य कृषी उत्पादने देशभरात कुठेही विकणे शक्य होणार आहे.
- ऑनलाइन विक्रीव्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी एक संस्था स्थापन करण्यात येणार आहे, त्यामुळे व्यवहार नियमानुसार होतील.
- तसेच ऑनलाइन व्यापार व्यवस्थेत शेतकऱ्यांसाठी गोदामे व वाहतूक सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
- शेतकऱ्यांना आता त्यांचा शेतीमाल मंडईतही विकता येईल, बाजार समित्यांनाही देता येईल किंवा त्याचा ऑनलाइन व्यापार करता येईल, त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला दर मिळणार असून, ग्राहकांनाही चांगल्या मालाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
काळा पैसा जाहीर करण्यास केंद्र सरकारची मुदतवाढ :
- केंद्र सरकारने परदेशातील काळा पैसा जाहीर करण्याची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे.
- तसेच त्यानंतर परदेशात काळा पैसा असलेल्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
- केंद्र सरकारने काळा पैशाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेत, काळा पैसा धारकांना आपली परदेशातील संपत्ती जाहीर करण्यासाठी आणखी मुभा दिली असून या मुदतीत आपला काळा पैसा जाहीर करणाऱ्या नागरिकांविरुद्ध जुन्या काळा पैसा कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
- काळा पैशाबाबत केंद्र सरकार 1 एप्रिल 2016 मध्ये नवा कायदा लागू करणार असून त्यानुसार, काळा पैसा धारकाला 90 टक्के दंड आणि 30 टक्के अतिरिक्त कर लावण्यात येणार आहे.
- तसेच त्या व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल होऊन, त्याला दहा वर्षांची शिक्षा होऊ शकते.
ग्रीसला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने टाकले ‘डिफॉल्टर’ यादीत :
- सुमारे 1.7 अब्ज डॉलरच्या कर्जाची परतफेड करू न शकणाऱ्या ग्रीसला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (इंटरनॅशनल मॉनिटरी फंड अर्थात आयएमएफ) ‘डिफॉल्टर’ यादीत टाकले आहे.
- नाणेनिधीनं ‘डिफॉल्टर’ घोषित केलेला ग्रीस हा जगातील पहिलाच प्रगत देश आहे.
- आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ग्रीसला कर्जाची परतफेड करण्यासाठी अंतिम मुदत दिली होती. त्या मुदतीत कर्ज फेडण्यासाठी ग्रीस प्रयत्न केले.
- युरोपियन युनियनने अतिरिक्त मदत करावी अशी मागणी ग्रीसनं केली होती. मात्र, ती मान्य झाली नाही. त्यामुळं ग्रीसचा नाइलाज झाला.
- कर्जाची परतफेड करणं शक्य नसल्याचं ग्रीसचे अर्थमंत्री यानिस वाराओफकिस यांनी 30 जूनला स्पष्ट केले. त्यानंतर नाणेनिधीने ग्रीसला डिफॉल्टर घोषित केले.
- ग्रीसच्या डोक्यावर ‘आयएमएफ’च्या कर्जाचा बोझा प्रचंड वाढला आहे. हे कर्ज चुकते होत नाही तोवर ग्रीसला नाणेनिधीकडून एका पैचीही मदत मिळणार नाही असे ‘आयएमएफ’ने स्पष्ट केले आहे.
दिनविशेष :
- 1902 – स्वामी विवेकानंदांचे महानिर्वाण.
- 1977 – मराठी प्रकाशन परिषदेची स्थापना.
- 1990 – मुंबई उपनगर जिल्ह्याची स्थापना.
- 1991 – पृथ्वी क्षेपणास्त्राची चौथी चाचणी.
-
-