Current Affairs of 4 March 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (4 मार्च 2016)

जागतिक सांस्कृतिक महोत्सव :

  • आर्ट ऑफ लिव्हिंगला या वर्षी 35 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने नवी दिल्लीमध्ये 11 ते 13 मार्चदरम्यान जागतिक सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
  • यमुना नदीच्या काठी होणाऱ्या या महोत्सवात 155 देशांतील 35 लाख नागरिक उपस्थिती दर्शवणार असल्याचा अंदाज आहे.
  • प्रभू यांनी सांगितले की, ‘तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन 11 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
  • तीन दिवस गायन, नृत्य, योगासने अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असून, त्यासाठी सुमारे 7 एकर परिसरात भव्य रंगमंच उभारण्यात आला आहे.
  • जगातील सर्वात मोठा तात्पुरता रंगमंच म्हणून गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्येही त्याची नोंद होण्याची शक्यता प्रभू यांनी व्यक्त केली.
  • तीन दिवस चालणाऱ्या महोत्सवात सादर होणाऱ्या कार्यक्रमांसाठी 35 हजार 973 कलाकारांनी नोंदणी केली आहे.
  • कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी रंगमंचाची निर्मिती केली असून, नृत्य दिग्दर्शक टेरेन्स लुईस यांनी सर्व महोत्सवातील नृत्य दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (3 मार्च 2016)

‘फिल्ड मार्शल’ हा सर्वोच्च सन्मान मिळवणारे पहिले अधिकारी :

  • भारतीय लष्करात ‘फिल्ड मार्शल’ हा सर्वोच्च सन्मान मिळवणारे पहिले अधिकारी अशी जनरल सॅम माणकेशॉ यांची ओळख आहे.
  • पण गुजरात सरकारच्या वेबसाईटवर ‘लँड ऑफ लिंजड्स’ (गुजरातमधील महान व्यक्तीमत्व) या विभागात माणकेशॉ यांचा उल्लेख क्रीडा क्षेत्रात करण्यात आला आहे.
  • 1971 साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात सॅम माणकेशॉ लष्कराचे यशस्वी नेतृत्व केले होते, ते ‘सॅम बहाद्दूर’ या नावानेही प्रसिद्ध होते.
  • चाळीस वर्षांच्या लष्करी कारकिर्दीत माणकेशॉ दुसरे महायुद्ध, पाकिस्तानविरुद्धची तीन युद्धे आणि चीनसोबतच्या युद्धात सहभागी होते.
  • लष्करातील एवढा दैदिप्यमान इतिहास असलेल्या माणकेशॉ यांना गुजरात सरकारने मात्र ‘खेळाडूं’च्या पंक्तीत स्थान दिले आहे.

इंडोनेशिया हा भूकंपप्रवण देश :

  • इंडोनेशियातील सुमात्रा बेटाच्या पश्चिम किनारपट्टीला (दि.2) शक्तिशाली भूकंपाचा हादरा जाणवला.
  • रिश्टर मापकावर या भूकंपाची नोंद 7.9 एवढी झाली.
  • भारतीय वेळेनुसार (दि.2) सायंकाळी 6.20 वाजता हा भूकंप झाला.
  • भूकंपाचा केंद्रबिंदू पडांग या शहराच्या आग्नेयेला 808 कि.मी. दूर समुद्रात 10 कि.मी. खोलवर होता.
  • इंडोनेशिया हा भूकंपप्रवण देश आहे, या बेटाला भूकंपाचे वारंवार हादरे बसतात, या भागात जागृत ज्वालामुखीही आहेत, मोठ्या भूगर्भीय हालचालींमुळे येथे भूकंप होत असतात.

अहमदाबाद, जयपूर विमानतळ विकसित करणार :

  • सिंगापूरची जगप्रसिद्ध चंगी विमानतळाच्या धर्तीवर अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ (एआयएपी) व जयपूर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित करण्यात येणार आहे.
  • तसेच यासाठी चंगी एअर लिमिटेड ऑपरेशन व मॅनेजमेंट कंपनी येत्या जून महिन्यापासून कामाला सुरवात करणार आहे.
  • अहमदाबाद व जयपूर विमानतळ विकसित करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प तयार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मान्यतेनंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
  • तसेच त्यानुसार नुकतेच चंगी विमानतळाच्या (सीआयए) अधिकाऱ्यांनी एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियाकडून (एएआय) अहमदाबाद व जयपूर विमानतळाच्या प्रस्तावित कराराबाबत सविस्तर माहिती मागविण्यात आली आहे.
  • अहमदाबाद व जयपूर विमानतळाच्या विकासासाठी मोदींच्या नोव्हेंबरमधील सिंगापूर दौऱ्यादरम्यान एएआय सिंगापूर को ऑपरेशन एंटरप्रायझेसबरोबर सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत.
  • केंद्र सरकारनेही याबाबतच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे, केंद्र सरकारने पहिल्यांदाच स्वतंत्रपणे पुढाकार घेत विमानतळांच्या विकासाबाबत पावले उचलली आहेत.

मारुती मोटारींच्या किंमतीत वाढ :

  • मारुती सुझुकीने आपल्या सर्व मोटारींच्या किंमतीत 34,494 रुपयांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे.
  • केंद्रीय अर्थसंकल्पात देशात विक्री होणाऱ्या सर्व वाहनांवर अतिरिक्त कर लादल्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
  • मारुतीचे सियाझएर्टिगासारखे हायब्रिड मॉडेल्स कर कक्षाच्या बाहेर आहेत.
  • परंतु अद्याप कंपनीने प्रत्येक मॉडेलच्या किंमतीत होणारी नेमकी वाढ व ती केव्हापासून लागू होईल हे नमूद करण्यात आलेले नाही.
  • वायू प्रदुषण व वाहतूक कोंडी रोखण्यासाठी आवश्यक मदतीसाठी सरकारतर्फे हा कर लादण्यात आला आहे.

दिनविशेष :

  • औद्योगिक सुरक्षा दिवस
  • राष्ट्रीय दिन
  • 1861 : अब्राहम लिंकन अमेरिकेचे 16 वे अध्यक्ष झाले.
  • 1951 : आशियायी सामन्यास प्रारंभ झाला.
  • 1961 : भारतीय नौदलात 1 ले विमानवाहू जहाज ‘विक्रांत’ दाखल झाले.
  • 1984 : महाराष्ट्रात वीजनिर्मितीचा नवा विक्रम याच दिवशी झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (5 मार्च 2016)

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

2 years ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

2 years ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago