चालू घडामोडी (4 मार्च 2017)
सेवानिवृत्तांना मिळणार कायमस्वरूपी ओळखपत्र :
- शासकीय अधिकारी व कर्मचारी ज्या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत ते पद नमूद करून तसेच त्याआधी ‘सेवानिवृत्त’ असा उल्लेख करून त्यांना कायमस्वरूपी ओळखपत्र देण्यात येणार आहे. तसा आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढला आहे. यापूर्वी सेवानिवृत्तांना ओळखपत्र कायमस्वरूपी मिळावे, अशी मागणी होती. शासनाने ती मान्य केली.
- सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री मदन येरावार यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. या ओळखपत्रामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर निवृत्तिवेतनाबाबतची कार्यवाही वेळेत पूर्ण होणे तसेच शासकीय रुग्णालयातील औषधोपचार, ज्येष्ठ नागरिक म्हणून रेल्वे, बँका इत्यादी ठिकाणी उपयोग करण्यासाठी होईल.
महापालिकेला ‘ई. रामचंद्रन पुरस्कार’ प्रदान :
- पालिकेच्या वतीने सातत्याने राबविण्यात येत असलेल्या नागरिकांच्या सहभागी अंदाजपत्रकासाठी मानाचा ‘ई. रामचंद्रन पुरस्कारा’ने महापालिकेला गौरविण्यात आले आहे.
- दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या हस्ते महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
- जनाग्रह सेंटर फॉर सिटीजनशिप या संस्थेच्या वतीने नागरी विकेंद्रीकरणासाठी प्रयत्नशील असणाऱ्या संस्था, व्यक्ती यांना हा पुरस्कार दिला जातो.
- पुणे महापालिकेला मिळालेला या पुरस्कारामध्ये पुणेकर नागरिक, मुख्य लेखापाल उल्का कळसकर यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा असल्याची भावना कुणाल कुमार यांनी या वेळी बोलताना व्यक्त केली.
- नागरिकांनी सुचविलेल्या विकासकामांसाठी अंदाजपत्रकामध्ये स्वतंत्र तरतूद करण्यात येते. जनवाणी व इतर स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकारामुळे ही संकल्पना चांगलीच यशस्वी ठरली आहे.
शासनातर्फे राज्यस्तरीय युवा पुरस्कार जाहीर :
- राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत देण्यात येणारे राज्यस्तरीय युवा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.
- राज्य पुरस्काराचे स्वरुप गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख पुरस्कार व्यक्तीस 50 हजार रुपये असे आहे. तर संस्थेसाठी गौरवपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख पुरस्कार 1 लाख रुपये असे आहे.
- सन 2014-15 करिता मुंबई विभागातून प्रितम सुतार (रायगड), स्नेहल शिंदे (मुंबई) आणि प्रिझम सामाजिक विकास संस्था हे मानकरी ठरले आहेत.
- तर सन 2015-16 साठी मुंबई विभागातून विनायक कोळी (ठाणे), प्रणिता गोंधळी (रायगड), पंचशील सेवा संघ (मुंबई उपनगर) यांना गौरविण्यात येणार आहे.
यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार सोहळा :
- राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची 104 वी जयंती 12 मार्च रोजी सायंकाळी 5.30 वाजता नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये साजरी करण्यात येणार आहे.
- प्रतिष्ठानचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे समारंभाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत.
- तसेच या कार्यक्रमात ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार – 2016’ हा पुरस्कार आधार कार्डचे प्रणेते नंदन निलेकणी यांना प्रदान करण्यात येणार आहे.
दिनविशेष :
- 4 मार्च हा औद्योगिक सुरक्षा दिन आहे.
- भारतीय नौदलात 4 मार्च 1961 रोजी पहिले विमानवाहू जहाज ‘विक्रांत’ दाखल झाले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा