Current Affairs of 4 May 2015 For MPSC Exams

Current Affairs Of (4 May 2015) In English

Dr. Pramod Patil “Green Oscar” Awards :

  • London vhaitali Fund for Nature, or institutional animal expert Dr. Pramod Patil “Green Oscar” award was awarded recently.
  • This award is given to the conservation of bustard and take note of the work of Patil.
  • Royal Geography Society award in the distribution.
  • Honor, around rupe 33 lakh 76 thousand es ( 35,000 pounds) that Patil is the nature of the award.
  • Environmental conservation work had been nominated seven applications the From people 174 people around the world.
  • And the amount of the award was given for the project bustard conservation Patil said.

Near Aurangabad Smart City Will Be Set Up The First Industrial Country :

  • Near Aurangabad eight and a half thousand hectares of the country’s first industrial Smart City “Delhi-Mumbai Industrial Corridor” will be set up this ambitious project.
  • The Union Cabinet on Wednesday in a hundred, “said Smart City” building plan approval.
  • Pune, Maharashtra, Mumbai, Nagpur, Nashik, Aurangabad and cities Bhiwandi is included in this scheme.

Cryogenic Engine Starting Performance Of Various Engine Tests To Prove:

  • High capacity of the various tests are performed to prove the efficiency of the engine by improving and cryogenic engine.
  • Satellite comes to using cryogenic engines to take out of the earth’s gravitational force.
  • In Tamil Nadu mahendragiri at “ISRO” laboratory of cryogenic engine April 28 (CE 20) more duration (635 seconds) was hot test.
  • JSLV MK3 projector will be used to provide energy for the cryogenic stage.

Chaitanya Tamhane And kangana Ranaut To Award The Film:

  • Marathi film animation and Bollywood actress kangana, Ranaut Tamhane was provided to the President by the National Film Awards.
  • And Dadasaheb Phalke Award for the veteran actor Shashi Kapoor amongst nature Since they could not attend the ceremony.
  • Kangana ranavatala rajatakamala and cash were honored with Rs 50 thousand.
  • Kanganala “Coming of Age Drama” was given the award for the role in the film.
  • Vikramaditya Motwani producer Vikas Behl and his “Queen” marathi awarded film “court” film award for best film.
  • Suvarnakamala and was honored with the soul of cash and half lakh rupees Tamhane.
  • Paresh Mokashi directed “Elizabeth” as if to the best balacitrapata Avinash Arun directed “fortress” of a Marathi film award for best glorified.
  • Ravindra Jadhav directed “friend” to the best short film award.

Independent Medical Officer Will Be Appointed In The Ministries :

  • Across the country in time to settle the various courts in cases related to the government will now be assigned to the various ministries in the independent medical authority.
  • The cases officers will decide whether to keep going.

Day Special :

  • May 4Coal Mines Labour Day
  • 1799 – killed Tipu Sultan at Seringapatam
  • 1929 – Birth of step dad and novelist noted Marathi
  • 1967 – handing devaji is all right to go into the temple of Shetra Trimbakeshwar in Nashik , an important decision that high court
Must Read (नक्की वाचा):

Current Affairs of 2 May 2015

चालू घडामोडी (4 मे 2015) मराठी

डॉ. प्रमोद पाटील यांना “ग्रीन ऑस्कर” पुरस्कार प्रदान :

  • लंडनमधील व्हाइटली फंड फॉर नेचर या संस्थेचा पक्षीतज्ज्ञ डॉ. प्रमोद पाटील यांना “ग्रीन ऑस्कर” पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
  • माळढोकच्या संवर्धनासाठी पाटील यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार दिला आहे.
  • रॉयल जिऑग्राफी सोसायटीमध्ये या पुरस्काराचे वितरण झाले.
  • सन्मानचिन्ह, सुमारे 33 लाख 76 हजार रुपये (35000 पौंड) असे पाटील यांना दिलेल्या पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या जगभरातील 174 जणांकडून आलेल्या अर्जांतून सात जणांना नामांकित केले होते.
  • तसेच या पुरस्काराची रक्‍कम माळढोक संवर्धन प्रकल्पासाठी दिल्याचे पाटील यांनी सांगितले.

औरंगाबादजवळ देशातील पहिली औद्योगिक स्मार्ट सिटी उभारण्यात येणार :

  • औरंगाबादजवळ साडेआठ हजार हेक्‍टरवर देशातील पहिली औद्योगिक स्मार्ट सिटी “दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर” या महत्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणार आहे.
  • केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी देशात शंभर “स्मार्ट सिटी” उभारण्याच्या योजनेला मान्यता दिली.
  • महाराष्ट्रातून पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, औरंगाबाद आणि भिवंडी या शहरांचा या योजनेत समावेश केला आहे.

क्रायोजेनिक इंजिनाची कार्यक्षमता सिद्ध करण्यासाठी इंजिनावर विविध चाचण्या सुरू :

  • उच्च क्षमतेच्या क्रायोजेनिक इंजिनाची आणखी सुधारणा करून कार्यक्षमता सिद्ध करण्यासाठी इंजिनावर विविध चाचण्या सुरू आहेत.
  • उपग्रहाला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर नेण्यासाठी क्रायोजेनिक इंजिनाचा वापर करण्यात येतो.
  • तमिळनाडूमधील महेंद्रगिरी येथे “इस्रो”च्या प्रयोगशाळेत 28 एप्रिल क्रायोजेनिक इंजिनची (सीई 20) अधिक कालावधीची (635 सेकंद) हॉट टेस्ट घेण्यात आली.
  • जीएसएलव्ही एमके 3 प्रक्षेपकाला क्रायोजेनिक टप्प्यात ऊर्जा पुरविण्यासाठी त्याचा वापर केला जाणार आहे.

चैतन्य ताम्हणे आणि कंगणा राणावत यांना चित्रपट पुरस्कार प्रदान :

  • मराठी चित्रपट दिग्दर्शक चैतन्य ताम्हणे आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावत यांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • तसेच दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झालेले ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर प्रकृतिअस्वास्थ्य असल्याकारणाने या समारंभास उपस्थित राहू शकले नाहीत.
  • कंगणा राणावतला रजतकमळ आणि रोख 50 हजार रुपये देऊन गौरविण्यात आले.
  • कंगणाला “कमिंग ऑफ एज ड्रामा” या चित्रपटातील भूमिकेसाठी पुरस्कार देण्यात आला आहे.
  • विकास बहल आणि निर्माते विक्रमादित्य मोटवानी यांना “क्‍वीन” चित्रपटासाठी गौरविण्यात आले. मराठीतील “कोर्ट” या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्काराने गौरविण्यात आले.
  • सुवर्णकमळ आणि रोख अडीच लाख रुपये देऊन चैतन्य ताम्हणे यांचा गौरव करण्यात आला.
  • परेश मोकाशी दिग्दर्शित “एलिझाबेथ एकादशी” चा सर्वोत्तम बालचित्रपट म्हणून तर अविनाश अरुण दिग्दर्शित “किल्ला”चा मराठी भाषेतील सर्वोत्तम चित्रपट पुरस्काराने गौरव झाला.
  • रवींद्र जाधव दिग्दर्शित “मित्रा”ला सर्वोत्तम लघुपट पुरस्काराने गौरविण्यात आले.

मंत्रालयांमध्ये स्वतंत्र कायदा अधिकारी नेमला जाणार :

  • देशभरातील विविध न्यायालयांमध्ये सुरू असलेल्या सरकारशी संबंधित खटल्यांचा वेळेत निपटारा करण्यासाठी आता विविध मंत्रालयांमध्ये स्वतंत्र कायदा अधिकारी नेमला जाणार आहे.
  • हा अधिकारीच खटले पुढे सुरू ठेवायचे की नाही याचा निर्णय घेईल.

दिनविशेष :

  • 4 मेकोळसा खान कामगार दिन
  • 1799टिपू सुलतान श्रीरंगपट्टण येथे ठार
  • 1929 – प्रख्यात मराठी कादंबरीकार बाबा कदम यांचा जन्म
  • 1967 – नाशिक येथील श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात जाऊन देवाजी पुजा करण्याचा अधिकार सर्वांना आहे, असा महत्वाचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला.

Must Read (नक्की वाचा):

Current Affairs of 5 May 2015

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.