चालू घडामोडी (4 नोव्हेंबर 2017)
कृष्णा सोबती यांना ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार जाहीर :
- साहित्य क्षेत्रातील अत्यंत सन्मानाचा ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार हिंदी भाषेतील प्रख्यात लेखिका कृष्णा सोबती यांना जाहीर झाला आहे.
- साहित्य क्षेत्रातील बहुमोल योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 11 लाख रूपये, प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
- तसेच आजवर कृष्णा सोबती यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
- 1980 मध्ये ‘जिंदगीनामा’ या कादंबरीसाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. 1996 मध्ये साहित्य अकादमीची फेलोशिपही त्यांना मिळाली.
- कृष्णा सोबती यांनी लिहिलेल्या ‘जिंदगीनामा’, ‘ऐ लडकी’, ‘मित्रो मरजानी’ यांसारख्या अनेक कादंबऱ्या गाजल्या.
- हिंदी साहित्यात आपल्या लेखनाची भर घालून ती भाषा समृद्ध करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. कल्पना विलास हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
डिसेंबरनंतर नव्या गाड्यांसाठी फास्ट टॅग अनिवार्य :
- टोल यंत्रणेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि टोल नाक्यावरील वाहनांच्या लांबच लांब रांगा टाळण्यासाठी आता फास्ट टॅगचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळेच 1 डिसेंबरनंतर विक्री करण्यात येणाऱ्या गाड्यांसाठी फास्ट टॅग आवश्यक करण्यात आला आहे. याबद्दलच्या सूचना वाहन निर्मिती क्षेत्रातील कंपन्या आणि अधिकृत वितरकांना देण्यात आल्या आहेत.
- 1 डिसेंबरनंतर विक्री करण्यात येणाऱ्या गाड्यांच्या समोरील काचेवर फास्ट टॅग (एक प्रकारचे स्टिकर) असेल. त्या टॅगवर एक युनिक कोड असणार आहे. हा टॅग रिचार्ज करता येईल. त्यामुळे टोल प्रणाली कॅशलेस होईल. याशिवाय टोल नाक्यावरील लांबच लांब रांगादेखील कमी होतील.
- फास्ट टॅग असलेली गाडी टोल नाक्यावर येताच याठिकाणी लावण्यात आलेला सेन्सर टॅगवरील युनिक कोड टिपेल आणि मग तुम्ही टॅगमध्ये केलेल्या रिचार्जमधून टोलचे पैसा वजा होतील. थोडक्यात हा टॅग रेल्वेच्या स्मार्ट कार्डसारखा असेल.
- मात्र तो कोणत्याही मशीनवर ठेवण्याची गरज नसेल. टोल नाक्यावरील सेन्सरच थेट टॅगवरील कोड टिपून घेईल. त्यामुळे रोख रक्कम किंवा डेबिट, क्रेडिट कार्डचा वापर न करता टोल भरता येईल.
भारतीय वैज्ञानिक अंटार्क्टिका मोहीम :
- पृथ्वीवरील सात खंडांपैकी एक आणि 98 टक्के पृष्ठभाग बर्फाच्छादित असणा-या ‘अंटार्क्टिका’ खंडावरील 37व्या भारतीय वैज्ञानिक मोहिमेस नुकताच प्रारंभ झाला आहे.
- 21 भारतीय संशोधकांचा समावेश असणा-या या मोहिमेचे उपनेते आणि अलिबाग येथील जागतिक कीर्तीच्या भूचुंबकीय वेधशाळेचे प्रमुख व भूचुंबकीय शास्त्र संशोधक बागती सुदर्शन पात्रो हे या मोहिमेत तिस-यांदा सहभागी झाले आहेत.
- या मोहिमेदरम्यान बर्फाच्छादित ‘अंटार्क्टिका’ खंडावरील ‘मैत्री स्टेशन’ या भारतीय संशोधन प्रयोगशाळेचे प्रमुख म्हणून भारतीय हवामान विभागाचे संशोधक सुन्नी चूग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- तसेच खंडावरील भारत सरकारच्या ‘भारती स्टेशन’या संशोधन केंद्राचे प्रमुख म्हणून नॅशनल सेंटर फॉर अंटार्क्टिका अॅण्ड ओशन रीसर्च संस्थेचे संशोधक डॉ. शैलेश पेडणेकर यांची तर उपप्रमुख म्हणून अलिबाग भूचुंबकीय वेधशाळेचे प्रमुख व भूचुंबकीय शास्त्र संशोधक बागती सुदर्शन पात्रो यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- 37व्या भारतीय वैज्ञानिक मोहिमेच्या सागरी जलप्रवासाचे (व्हॉयेज) प्रमुख म्हणून नॅशनल सेंटर फॉर अंटार्क्टिका अॅण्ड ओशन रीसर्च संस्थेचे डॉ. योगेश राय यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सौदी अरेबियातील भारतीय महिला मायदेशी परतणार :
- पंजाबमधील एका महिलेला ट्रॅव्हल एजंटने फसवून अनधिकृतरित्या गुलाम म्हणून सौदी अरेबियातील एका कुटुंबाला विकल्याने खळबळ उडाली होती. मात्र, आता परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रयत्नाने ही महिला मायदेशी अर्थात भारतात परतणार आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी याबाबत माहिती दिली.
- परमजीत कौर असे पंजाबमधील या पीडित महिलेचे नाव असून ती 13 जुलै रोजी सौदी अरेबियात कामानिमित्त गेली होती. त्यानंतर तीने 21 ऑगस्ट रोजी आपल्या कुटुंबियांशी फोनवरुन संपर्क साधला आणि तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर, या महिलेचा पती मलकीत राम (वय 45) याने आपल्या गावातील एका ट्रॅव्हल एजंटविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर हे प्रकरण उजेडात आले.
- ट्रॅव्हल एजंट भट्टी हा फरार असून त्याच्यावर गुलाम म्हणून माणसाची विक्री केल्याप्रकरणी आयपीसीच्या 370 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच 420 अंतर्गत फसवणूक आणि 120 बी अंतर्गत गुन्ह्याचा कट रचल्याचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
- या प्रकरणाची परराष्ट्र खात्याने गंभीर दखल घेत परमजीत कौर यांना भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर अखेर 4 नोव्हेंबर रोजी त्या आपल्या घरी परतणार आहेत.
रेल्वेत महिलांच्या सुरक्षिततेसाठी 100 जवान :
- रेल्वे प्रवासादरम्यान महिला प्रवाशांवर होणाऱ्या हल्ल्याच्या घटनांमुळे टीका होत असतानाच, महिलांना सुरक्षा पुरविण्यासाठी लोकलच्या महिला डब्यात महाराष्ट्र सुरक्षा दलाचे 100 जवान तैनात करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे रात्री उशिराने प्रवास करणाऱ्या महिलांना दिलासा मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा आणि कर्जत, तर चर्चगेट ते विरार-डहाणू रोडपर्यंत लोकल धावतात.
- तसेच या उपनगरी रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बल यांच्याकडे आहे.
- लोकलमध्ये बंदोबस्तासाठी सुरक्षा दलाचे 300 जवान उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती; मात्र आता महाराष्ट्र सुरक्षा दलाचे 100 जवान रेल्वेला उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
- सध्या रेल्वे पोलिसांसमवेत महाराष्ट्र सुरक्षा दलाचे 100 जवान लोकलमधील महिला डब्यात तैनात करण्यात आले आहेत.
दिनविशेष :
- भारतीय क्रांतिकारक “वासुदेव बळवंत फडके” (4 नोव्हेंबर 1845 (जन्मदिन) आणि 17 फेब्रुवारी 1883 (स्मृतीदिन). त्यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सशस्त्र क्रांतीचे जनक मानले जाते.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा