Current Affairs of 4 September 2015 For MPSC Exams

 चालू घडामोडी (4 सप्टेंबर 2015)

पंतप्रधान नरेंद्र मोदी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधणार :

  • शिक्षक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर आज (शुक्रवार) संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.

  • मागील वर्षीही शिक्षक दिनाच्या निमित्ताने पंतप्रधानांनी विद्याथी-शिक्षकांशी संवाद साधला होता.
  • राजधानी दिल्लीमध्ये मानेकशा सभागृहात देशातील नऊ राज्यातील विद्यार्थ्यांशी ते व्हिडिओ-कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार आहेत.
  • विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे संचलन विद्यार्थीच करणार आहेत.
  • तसेच यावेळी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन्‌ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विशेष नाणेही प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
  • तसेच कला उत्सवाच्या एका संकेतस्थळाचेही उद्‌घाटन करण्यात येणार आहे.

“स्मार्ट सिटी” योजनेंतर्गत 194 कोटी रुपये दिले :

  • “स्मार्ट सिटी” योजनेंतर्गत आराखडा तयार करण्यासाठी केंद्रीय नगर विकास मंत्रालयाने 96 शहरांसाठी प्रत्येकी दोन कोटी रुपये या प्रमाणे 194 कोटी रुपये आज दिले.
  • या योजनेत जाहीर झालेल्या 98 पैकी दिल्ली आणि चंडीगड या उर्वरित दोन शहरांना गृह मंत्रालयातर्फे लवकरच निधीचे वितरण केले जाणार आहे.
  • राज्यांनी तीन महिन्यांत आपापल्या शहरांचे आराखडे सादर करावेत, असेही केंद्रातर्फे सांगण्यात आले आहे.
  • तसेच “स्मार्ट सिटी” योजनेवर दिल्लीत आज झालेल्या कार्यशाळेत केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांनी हा निधी देण्याचे जाहीर केले.
  • या योजनेत 98 शहरांची निवड या आधीच जाहीर केली होती.
  • उत्तर प्रदेश आणि जम्मू-काश्‍मीरमधील प्रत्येकी एक अशा दोन शहरांची निवड अद्याप बाकी आहे.
  • महाराष्ट्रातील नवी मुंबई, नाशिक, ठाणे, बृहन्मुंबई, अमरावती, सोलापूर, नागपूर, कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद आणि पुणे या दहा शहरांचा त्यात समावेश आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकराचे अनावरण येत्या दहा सप्टेंबरला :

  • राज्यघटनाकारांचा पूर्णाकृती पुतळा जपानच्या कोसायान विद्यापीठात उभारण्यात आला आहे, त्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत्या दहा सप्टेंबरला करणार आहेत.
  • तसेच आता जपानमध्येही डॉ. आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी जपानमधील वाकायामा सरकारबरोबर राज्य सरकारने सामंजस्य करार केला आहे.
  • वाकायामामधील कोसायान या शहराला बाराशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने डॉ. आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा कोसायान विद्यापीठाच्या प्रांगणात उभारला आहे, त्याचे अनावरण मुख्यमंत्री करतील.

“ब्रेकिंग न्यूज”च्या शोधात ट्‌विटरला सर्वाधिक पसंती :

  • सोशल मिडियाच्या युगात “ब्रेकिंग न्यूज”च्या शोधात असलेल्या नेटिझन्सची ट्‌विटरला सर्वाधिक पसंती असल्याचे अलिकडेच करण्यात आलेल्या संशोधनातून समोर आले आहे.
  • यासाठी अमेरिकन प्रेस इन्स्टिट्युट आणि ट्‌विटर यांनी संयुक्तपणे डीबी5 या संशोधन संस्थेच्या सहकार्याने सर्व्हे केला आहे.
  • त्यामध्ये सोशल मिडियावरील 4,700 युजर्सच्या मुलाखती घेण्यात आल्या त्यातून ही माहिती समोर आली आहे.
  • सर्व्हेक्षणात सहभागी झालेल्या युजर्सपैकी तब्बल 40 टक्के युजर्सनी “ब्रेक्रिंग न्यूज” पाहण्यासाठी मुख्य स्रोत म्हणून ट्‌विटरचा उपयोग करत असल्याचे सांगितले आहे.
  • ट्‌विटरद्वारे पत्रकारांचे आणि लेखकांचे वाचन नियमितपणे वाचले जात असल्याचेही सर्वेक्षणातून समोर आले आहे.
  • तसेच ट्‌विटरवरील बहुतेक युजर्स हे इतर माध्यम समूहांचे ग्राहक असल्याचेही संशोधनात म्हटले आहे.

‘स्वच्छ भारत अभियाना’तून विजयालक्ष्मी जोशी यांची स्वेच्छानिवृत्ती :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या ‘स्वच्छ भारत अभियाना’ला एक वर्ष पूर्ण होत नाही, तोच या अभियानाच्या प्रमुख विजयालक्ष्मी जोशी यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे.
  • गुजरात केडरच्या आयएएस असलेल्या विजयालक्ष्मी जोशी यांनी केंद्र सरकारकडे स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला होता.
  • सरकारने त्यांचा अर्ज मंजूर केला आहे.
  • विजयालक्ष्मी यांचे पतीही गुजरात केडरचे अधिकारी होते.
  • तसेच त्यांनी यापूर्वीच स्वेच्छानिवृत्ती घेतली असून, ते अमेरिकेत स्थायिक झाले आहेत.

मॅट न लावण्याची उच्चस्तरीय समितीची शिफारस केंद्र सरकारने केली मान्य :

  • भारतात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या विदेशातील संस्थात्मक गुंतवणूकदारांवर पूर्वलक्ष्यी प्रभावाने किमान पर्यायी कर (मिनीमम अल्टरनेट टॅक्स अर्थात मॅट) न लावण्याची उच्चस्तरीय समितीची शिफारस केंद्र सरकारने मान्य केली आहे.
  • यामुळे विदेशी गुंतवणूकदारांना एप्रिल 2015 पासून हा कर द्यावा लागणार नाही.
  • कायदा आयोगाचे अध्यक्ष न्या. ए. पी. शहा यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने ‘मॅट’ लागू करण्याबाबतचा आपला अंतिम अहवाल जुलैमध्ये सादर केला होता.
  • त्यांच्या या शिफारसी सरकारने स्वीकारल्या आहेत.
  • शहा समितीनुसार परदेशी गुंतवणूकदार संस्थांनी केलेल्या गुंतवणुकीवर मॅट लागू करण्यास कोणताही वैधानिक आधार नाही.
  • या शिफारसी स्वीकारल्यामुळे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी) लवकरच तशी सूचना जारी करणार आहे.
  • सीबीडीटीच्या नोटिसीनंतर विविध कोर्टांत सुरू असलेल्या मॅट केसेस रद्दबातल ठरवण्यात येतील.

अॅग्रोवन स्मार्ट व्हिलेज प्रकल्प :

  • शेती क्षेत्रात जगात आघाडीवर असलेल्या इस्राईलची मदत घेऊन महाराष्ट्रातील निवडक पाच गावांमध्ये कृषिकेंद्रित ‘अॅग्रोवन स्मार्ट व्हिलेज’ साकारण्याचा संकल्प ‘अॅग्रोवन’ आणि डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनने केला आहे.
  • शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ करणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.
  • निकष आणि अटी पूर्ण करणाऱ्या सर्व गावांना प्रकल्पात सहभागासाठी प्रस्ताव पाठवण्याची संधी आहे.
  • प्रत्यक्ष पाहणी करून इस्राईलच्या तज्ज्ञांच्या मदतीने गावांची अंतिम निवड केली जाईल.
  • जादा गावे पात्र ठरली, तर लॉटरी पद्धतीचा अवलंब केला जाईल.
  • परदेशी गुंतवणुकीतून साकारला जाणारा हा कृषी प्रकल्प पूर्णपणे व्यावसायिक पद्धतीने चालवला जाईल.
  • त्याचबरोबर सरकारच्या सहकार्याने गावात आवश्यक त्या पायाभूत सोयी-सुविधा पुरवण्याचेही नियोजन आहे.
  • आपल्या गावाचा कायापालट करण्याबरोबरच शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवण्याची ही अनोखी आणि दुर्मिळ संधी ‘अॅग्रोवन’ उपलब्ध करून देत आहे.
  • ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना ज्ञान-तंत्रज्ञान पुरवून सन्मानाने आणि प्रतिष्ठेने उभे करणे हा या प्रकल्पाचा गाभा आहे.

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago