Current Affairs of 4 September 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (4 सप्टेंबर 2017)

पीयुष गोयल भारताचे नवे केंद्रीय रेल्वेमंत्री :

  • पीयुष गोयल यांना केंद्रीय रेल्वेमंत्रीपद मिळाल्याने आता रेल्वे खात्याचा कारभार आणखी सुधारेल अशी अपेक्षा व्यक्त होते आहे.
  • ‘कैफियत एक्स्प्रेस’ आणि ‘उत्कल एक्प्रेस’ या दोन अपघातांची नैतिक जबाबदारी स्वीकारून सुरेश प्रभू यांनी रेल्वे मंत्रीपदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे काही दिवसांपूर्वीच सोपवला होता.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरेश प्रभू यांना थोडे थांबा एवढेच सांगितले होते आणि राजीनामा स्वीकारला नव्हता. मात्र केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाच्या वेळी रेल्वे खाते दुसऱ्या मंत्र्याला दिले जाणार याची चर्चा होती.
  • तसेच याआधी पीयुष गोयल हे राज्यमंत्री होते आणि त्यांच्याकडे उर्जा आणि कोळसा खात्याचा स्वतंत्र कार्यभार होता. या खात्यात पीयुष गोयल यांनी मोठ्या सुधारणा घडवून आणल्या.
  • 2014 मध्ये भारतात अशी 18 हजार गावे होती ज्या गावांमध्ये वीज पोहचली नव्हती, मागील तीन वर्षांच्या काळात म्हणजेच पीयुष गोयल यांनी कार्यभार सांभाळल्यापासून ही संख्या 4 हजार गावांवर आली आहे.
  • 2014च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी प्रचार, जाहिराती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून युवकांसोबत संवाद साधण्याची जबाबदारी पीयुष गोयल यांच्यावर टाकण्यात आली होती.

निर्मला सीतारामन भारताची नव्या संरक्षणमंत्री :

  • केंद्रीय मंत्रिमंडळाचा 3 सप्टेंबर रोजी विस्तार झाला. यामध्ये खासदार निर्मला सीतारामन यांच्याकडे देशाच्या संरक्षणमंत्रीपदाची महत्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली. यामुळे देशाला आता पूर्णवेळ संरक्षणमंत्री मिळाला आहे.
  • इंदिरा गांधी यांच्यानंतर सीतारामन या दुसऱ्या महिला संरक्षणमंत्री ठरल्या आहेत.
  • निर्मला सीतारामन यांची भारताच्या संरक्षणमंत्रीपदी निवड झाल्याने त्यांचा आता जगभरातील महिला संरक्षणमंत्र्यांच्या छोट्या गटामध्ये समावेश झाला आहे. मात्र, त्याचबरोबर देशातील पुरुष संरक्षणमंत्र्यांचा क्लबही त्यांनी मोडून काढला आहे.
  • दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आपल्या मंत्र्यांच्या कामगिरीवर बारीक लक्ष असते. त्यामुळेच त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांकडे नवी आणि महत्वाची खाती सोपवली आहेत. असे मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर प्रतिक्रिया देताना अरुण जेटली यांनी म्हटले आहे.
  • भारताबरोबर सध्या जर्मनी, नॉर्वे आणि नेदरलँड या देशांच्या संरक्षणमंत्रीपदी महिला कार्यरत आहेत. तर ऑस्ट्रेलियामध्ये 2015 मध्ये पहिल्यांदाच संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी एका महिलेकडे सोपण्यात आली आहे. इतरही काही देशांच्या संरक्षणमंत्रीपदाची महत्वाची जबाबदारी महिलांवर आहे.

अमेरिकेचे भारतातील राजदूत केनेथ जस्टर :

  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि अमेरिका या दोन देशांच्या परस्पर संबंधांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या केनेथ जस्टर यांची नियुक्ती अमेरिकेचे भारतातील राजदूत म्हणून केली आहे.
  • व्हाइट हाऊसकडून यासंदर्भातील घोषणा करण्यात आली. भारतासोबत आर्थिक, व्यापारी आणि मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून ते वाढविण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा आहे, हेच या निर्णयावरून दिसून येते आहे.
  • केनेथ जस्टर हे सध्या अमेरिकेन पराराष्ट्र खात्याचे सल्लागार म्हणून काम करतात.
  • रिचर्ड वर्मा यांनी जानेवारी महिन्यातच राजीनामा दिला होता, त्यानंतर भारतातील नवे अमेरिकन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.
  • अखेर 1 सप्टेंबर रोजी केनेथ जस्टर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. 62 वर्षांचे केनेथ जस्टर हे आता अमेरिकेचे भारतातील राजदूत असतील.
  • केनेथ जस्टर यांनी जानेवारी ते जून या कालावधीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आंतरराष्ट्रीय आणि आर्थिक विषयांचे उप सल्लागार म्हणूनही काम केले आहे.
  • केनेथ जस्टर हे 2001 ते 2005 पर्यंत अंडर सेक्रेटरी ऑफ कॉमर्स होते. 1992-93 या दरम्यान स्टेट डिपार्टमेंटमध्ये अॅक्टिंग काऊन्सिलर राहिले आहेत.
  • तसेच याशिवाय 1989 ते 1992 पर्यंत डेप्युटी सेक्रेटरी ऑफ स्टेटमध्ये वरिष्ठ सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

सरकारी थकबाकीदार सत्यपाल सिंह राज्यमंत्री :

  • लोकसभा निवडणूक लढविताना सरकारी थकबाकीची माहिती लपविणारे भाजपचे खासदार आणि माजी पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह यांस मोदी मंत्रिमंडळात राज्यमंत्री बनविले आहे.
  • आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी लोकसभा अध्यक्ष, पंतप्रधान आणि निवडणूक आयोगाकडे रीतसर तक्रार करत सत्यपाल सिंह यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली होती.
  • मात्र, या संदर्भात केंद्र सरकारने कोणताही निर्णय न घेता सत्यपाल सिंह यांचा मंत्रिमंडळात समावेश केल्याने सिंह यांच्या विरोधात पुन्हा तक्रार करणार असल्याचे गलगली यांनी कळवले आहे.
  • पोलिस आयुक्तपदाचा राजीनामा देत सत्यपाल सिंह यांनी 2014 ची लोकसभा निवडणूक उत्तर प्रदेश येथील बागपत मतदारसंघातून लढविली होती.
  • निवडणूक आयोगाने 27 मार्च 2003 रोजीच्या हॅंण्ड बुकमध्ये उमेदवारासाठी ज्या पाच बाबी जाहीर करण्याचे आदेशित केले होते, त्यात दाखल गुन्हे, प्रलंबित गुन्हे, मालमत्ता, थकबाकी दायित्व आणि शैक्षणिक पात्रता याचा समावेश आहे. यातील नियम क्रमांक 3 मधील 4 मध्ये सरकारी वित्तीय संस्था आणि सरकारी थकबाकी या दायित्वाचा तपशील आहे.
  • तसेच याबाबतीत सर्वोच्च न्यायालयाने दोन मे 2002 रोजी असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्सच्या जनहित याचिकेवर आदेश जारी केले होते.

शिल्पा अग्रवाल ठरल्या मिसेस युनिव्हर्स लव्हली 2017 :

  • उद्योजिका शिल्पा अग्रवाल ‘मिसेस युनिव्हर्स लव्हली 2017’ च्या मानकरी ठरल्या आहेत.
  • दक्षिण आफ्रिकेतील दरबान येथे झालेल्या सौंदर्य स्पर्धेत त्या सहभागी झाल्या होत्या. जगभरातून आलेल्या 184 महिला स्पर्धकांना मागे टाकत त्यांनी हा किताब पटकाविला.
  • दरबान येथे 24 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरदरम्यान झालेल्या या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या त्या एकमात्र नागपूरकर आहेत.
  • अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा या स्पर्धेत शिल्पा अग्रवाल यांनी विविध फेऱ्यांमध्ये स्वत:च्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटविला.
  • तसेच त्या ‘मिसेस युनिव्हर्स लव्हली’ किताब पटकाविणाऱ्या मध्य भारतातील पहिल्या महिला आहेत.
  • ‘महिला सक्षमीकरणातून परिवर्तनाचा उदय’ अशी या स्पर्धेची थीम होती. स्पर्धेत 21 ते 45 वर्षे वयोगटातील 184 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Sandip Rajput

Sandip is empowered with his solid education in arts and uses his crisp way of expressing ideas about competitive exams. Sandip has covered the breadth of technology and believes in keeping updated. His core expertise is his awareness of educational requirements and possible knowledge to be delivered on time. Sandip is positive that a healthy blend of novelties would change smart education in a proper way.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

2 years ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

2 years ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago