Current Affairs of 5 February 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (5 फेब्रुवारी 2016)

भविष्यातील नेतृत्व घडविण्यासाठी सकाळ माध्यम समूहाचा पुढाकार :

  • भविष्यातील नेतृत्व घडविण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहाच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’च्या (यिन) तीन दिवसांच्या विद्यार्थी मंत्रिपरिषद प्रशिक्षण कार्यशाळेबाबत राज्यभरातल्या युवकांमध्ये मोठी उत्सुकता असून, युवकांचे प्रश्‍न आणि आशा-आकांक्षांचा सांगोपांग विचार करणाऱ्या राज्यातल्या या पहिल्या उपक्रमासाठी ‘यिन’चे प्रतिनिधी मुंबईत पोचायला सुरवात झाली आहे.
  • शुक्रवारपासून (ता. 5) सुरू होणाऱ्या या प्रशिक्षण कार्यक्रमात राज्यातल्या सर्व 36 जिल्ह्यांतून येणाऱ्या ‘यिन’च्या अध्यक्षांना राजकारण, समाजकारण, अर्थकारण, मनोरंजन तसेच व्यवसाय क्षेत्राशी निगडित अनेक तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
  • ‘यिन’च्या जिल्हा प्रतिनिधींच्या निवडणुका राज्यभरात नुकत्याच मोठ्या जल्लोषात झाल्या.
  • तसेच या निवडणुकांतून तरुणांनी निवडलेल्या त्यांच्या ‘नेत्यां’ना नेतृत्वगुण आत्मसात करता यावेत, युवकांशी निगडित असलेल्या विषयांचा शिस्तबद्ध अभ्यास करून नावीन्यपूर्ण कल्पनांचा वापर करून उपाय सुचवता यावेत यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ही कार्यशाळा होत आहे.
  • मंत्रालयाजवळील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये होणाऱ्या या कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुपचे अध्यक्ष संदीप वासलेकर निवडून आलेल्या ‘यिन’च्या सर्व जिल्हा अध्यक्षांना सदस्यत्वाची शपथ देतील.

दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेला (सॅग) सुरुवात :

  • विविध कारणांमुळे अनेकदा स्थगित कराव्या लागलेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेला (सॅग) आज पासून (दि.5) सुरुवात होत आहे.
  • आठ देशांचा समावेश असलेल्या या स्पर्धा 12 दिवस चालतील.
  • 2500 खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन इंदिरा गांधी अ‍ॅथ्लेटिक्स स्टेडियममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करणार आहेत.
  • द. आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या यजमानपदाखाली आयोजित ही स्पर्धा तब्बल चार वर्षे विलंबाने होत आहे.
  • 12 व्या सॅग क्रीडा स्पर्धेचे आयोजन 2012 मध्ये नवी दिल्लीत होणार होते.
  • राजधानीतील विधानसभा निवडणुकांमुळे स्पर्धा रद्द करण्यात आली, त्यानंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने डिसेंबर 2012 व फेब्रुवारी 2014 या काळासाठी निलंबित केल्याने स्पर्धेचे आयोजन लांबणीवर पडले होते.
  • पण मागच्या वर्षी उशीर झाल्यानंतर या स्पर्धेचे आयोजन गुवाहाटी आणि शिलाँगमध्ये करण्याची घोषणा झाली.
  • भारतात तिसऱ्यांदा स्पर्धा होत आहे, याआधी 1987 साली कोलकाता तसेच 1995 साली चेन्नईमध्ये सॅग क्रीडा स्पर्धेचे आयोजन झाले आहे.

केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना  :

  • ग्रामीण भागात विद्युत वितरण प्रणालीचे विस्तारीकरण व बळकटीकरणासाठी पायाभूत सुविधा उभारण्याकरिता असलेली केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना राज्यातही राबविली जात आहे.
  • या योजनेंतर्गत महावितरणकडून अकोला परिमंडळातील तीन जिल्ह्यांमध्ये ग्रामीण भाग भारनियमनमुक्त करण्यासाठी 30 नवीन वीज उपकेंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे.
  • तसेच या योजनेंतर्गत अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांमध्ये एकूण 315.57 कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत.
  • सध्या ग्रामीण भागात वाढती ग्राहकसंख्या व आधुनिक जीवनशैलीमुळे विजेचा वापर वाढला आहे.
  • ग्रामीण भागातील विजेच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने केंद्र सरकार पुरस्कृत दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना राज्यात राबविण्याला मान्यता दिली आहे.
  • देशातील सर्व राज्यांत ही योजना राबविण्यात येत आहे, राज्यात महावितरणकडून या योजनेची अंमलबजावणी होणार आहे.
  • या योजनेमध्ये 2248 कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत, या योजनेंतर्गत राज्यातील विविध परिमंडळांमध्ये फीडरचे विलगीकरण, उच्चदाब व लघुदाब वाहिन्या तसेच वीज उपकेंद्रांची निर्मिती व रोहित्रांचे सक्षमीकरण अशी कामे करण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र एनसीसीने 25 पैकी 17 वेळा पंतप्रधानांचे मानाचे निशाण पटकावले :

  • महाराष्ट्र एनसीसीने आतापर्यंत 25 पैकी 17 वेळा पंतप्रधानांचे मानाचे निशाण पटकावले असून, देशातील सर्वोत्तम एनसीसी संचालनालय म्हणून महाराष्ट्राचा लौकिक वाढवला.
  • नुकत्याच नवी दिल्ली येथे झालेल्या प्रजासत्ताक दिन शिबिर व परेडमध्ये सहभागी होऊन विविध स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी केल्याबद्दल राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी महाराष्ट्र एनसीसीच्या संपूर्ण चमूला राजभवनावर बोलावून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
  • यंदा महाराष्ट्रातील 77 मुले व 37 मुली यांच्या चमूने प्रजासत्ताक दिन शिबिरामध्ये भाग घेतला होता.

इतिहासातील सर्वांत मोठा व्यापारी करार :

  • या कराराचे 12 देश सदस्य असून, त्यांनी या कराराद्वारे जवळपास सगळ्या प्रकारचे आयात कर काढून टाकले आहेत.
  • जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुमारे 40 टक्के वाटा असलेल्या या 12 देशांत परस्परांमध्ये व्यापार आणि गुंतवणूक करण्यात असलेले अडथळे दूर करण्याच्या उद्देशाने हा करार करण्यात आला आहे.
  • तसेच येथे झालेल्या समारंभामध्ये न्यूझीलंडचे पंतप्रधान जॉन की आणि अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी माईक फ्रोमन यांनी या करारावर स्वाक्षरी केली.
  • ट्रान्स- पॅसिफिक भागीदारीमध्ये समाविष्ट असलेल्या न्यूझीलंडसाठीच नव्हे, तर इतरही 11 देशांसाठी हा करार महत्त्वाचा आहे.
  • या 12 देशांतील 98 टक्के जकात संपून जाईल, असे ऑस्ट्रेलियाचे व्यापारमंत्री अ‍ॅण्ड्रू रॉब म्हणाले.
  • हा करार कायद्याने बंधनकारक होण्यासाठी सदस्य देशांना आपापल्या लोकप्रतिनिधीगृहांची मान्यता त्याला मिळवावी लागेल.

स्वच्छ भारत अभियानाच्या प्रमुखपदी निवृत्त अधिकारी :

  • सत्तास्थापनेनंतर पहिल्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात घोषणा करून सुरू केलेल्या ‘स्वच्छ भारत’ अभियान यशस्वी करून दाखवण्यासाठी एका निवृत्त आएयएस अधिकाऱ्याला पुन्हा सचिवपदी नेमण्याची निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदीयांनी घेतला आहे.
  • स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या परमेश्वरन अय्यर यांना पेयजल व सांडपणी व्यवस्थापन विभागात सचिवपदी नेमण्यात आले आहे.
  • चांगल्या अधिकाऱ्यांची कमतरता व ‘स्वच्छ भारत’ आभियानाचे झालेले सरकारीकरण असे दोन अर्थ नोकरशाहीच्या वर्तुळातून परमेश्वरन यांच्या नियुक्तीनंतर लावण्यात येत आहेत.
  • परमेश्वरन अय्यर यांच्यावर स्वच्छ भारत अभियानाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
  • तसेच परमेश्वरन यांची नियुक्ती दोन वर्षांसाठी असेल, 1981 साली आयएएस झालेल्या परमेश्वरन यांनी 2009 मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली होती.
  • तसेच त्यानंतर ते जागतिक बँकेत सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाच्या प्रमुखपदी रूजू झाले.
  • उत्तर प्रदेशमध्ये परमेश्वरन यांनी जल सुराग अभियान राबवले होते.

अर्थसंकल्पी अधिवेशन 23 फेब्रुवारीपासून :

  • गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या संसदीय कामकाजविषयक समितीच्या बैठकीत अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या वेळापत्रकावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
  • असे असेल वेळापत्रक
  • पहिला टप्पा 23 फेब्रुवारी ते 16 मार्च
  • दुसरा टप्पा 25 एप्रिल ते 13 मे
  • राष्ट्रपतींचे अभिभाषण 23 फेब्रुवारी
  • रेल्वे अर्थसंकल्प 25 फेब्रुवारी
  • आर्थिक पाहणी अहवाल 26 फेब्रुवारी
  • केंद्रीय अर्थसंकल्प 29 फेब्रुवारी
  • अधिवेशनाचे एकूण दिवस 81

दिनविशेष :

  • मौखिक आरोग्य दिवस

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago