Current Affairs of 5 July 2015 For MPSC Exams

Current Affairs 5 july 2015

चालू घडामोडी 5 जुलै 2015

कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या चिलीने प्रथमच विजेतेपद पटकाविले :

  • कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या 99 वर्षांच्या इतिहासात चिलीने प्रथमच बलाढ्य अर्जेंटिनाचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-1 असा पराभव पराभव करून विजेतेपद पटकाविले.
  • सँतिएगोमधील स्टाडिओ नॅशनल मैदानावर शनिवारी रात्री झालेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात यजमान चिलीला प्रथमच विजेतेपद मिळविण्यात यश आले.
  • तसेच सामना गोलशून्य बरोबरीत राहिल्याने सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटवर लागला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी 4 जुलै 2015

यूपीएससी निकाल जाहीर :

  • केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) 2014 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.

    UPSC

  • तसेच  आघाडीच्या पाचमधील पहिल्या चारही क्रमांकांवर उत्तीर्ण मुलींचाच क्रमांक आहे.
  • ईरा सिंघल, रेणू राज, निधी गुप्ता आणि वंदना राव यांनी अनुक्रमे पहिले चारही क्रमांक पटकाविले आहेत.
  • तर, बिहारच्या सुहर्ष भगत या उमेदवाराने पाचवा क्रमांक मिळवत मुलांमध्ये पहिला येण्याचा मान मिळविला.
  • एकूण 1236 उमेदवारांची निवड करण्यात आली असून, त्यांची नियुक्ती भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस), भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) आणि केंद्रीय सेवेच्या “ए” तसेच “बी” दर्जाच्या वेगवेगळ्या पदांवर केली जाईल.
  • निवड झालेल्या उमेदवारांमध्ये 590 सर्वसाधारण, 354 ओबीसी, 194 एससी, 98 एसटी वर्गातील आहेत.
  • उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांपैकी 180 जण आयएएस, 32 जण आयएफएस आणि 150 जण आयपीएससाठी पात्र ठरले आहेत.
  • तर, 710 उमेदवार अ दर्जाच्या आणि 292 उमेदवारांची ब दर्जाच्या पदांसाठी निवड करण्यात आली आहे. 254 उमेदवारांना राखीव यादीत ठेवले जाईल.
  • पहिला क्रमांक पटकावलेली ईरा सिंघल आणि तिसरी आलेली निधी या दोघीही दिल्लीच्या असून, त्या भारतीय महसूल सेवेत (आयआरएस) अधिकारी असून, केरळची रेणू राज डॉक्‍टर आहे.

बीएसएनएलची”मोबाईल वॉलेट” सेवा :

  • भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) आपल्या प्रीपेड कार्डधारकांच्या सोयीसाठी “मोबाईल वॉलेट” सेवा सुरू केली आहे.

    BSNL

  • रकमेचे हस्तांतरण, विविध सेवांची देयके अदा करण्यासाठी या वॉलेटचा उपयोग करता येणार आहे.
  • तसेच त्याद्वारे एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढण्याची सोयही उपलब्ध होणार आहे.
  • “स्पीड पे” नावाच्या या नव्या सेवेद्वारे ग्राहकाचे बॅंक खाते नसतानाही ते आपला मोबाईल रिचार्ज करू शकतील.
  • मोबाईल वॉलेटमधील पैसे कोणत्याही बॅंकेच्या खात्यात हस्तांतरित करता येणार आहेत.
  • तसेच बीएसएनएलच्या आउटलेटमधूनही हे पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
  • या सेवेचे दूरसंचारमंत्री रवीशंकर प्रसाद यांच्या हस्ते या सेवेचे उद्‌घाटन झाले आहे.
  • “मोबाईल वॉलेट” शिवाय “बीएसएनएल बझ” नावाची मनोरंजनाची सुविधाही बीएसएनएलने सुरू केली आहे.
  • त्याद्वारे ग्राहकांना स्मार्टफोनद्वारे दूरचित्रवाहिनीवरील मनोरंजनाच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेता येणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी प्रसिद्ध यांनी जनगणना अहवाल :

  • देशात पहिल्यांदाच सामाजिक, आर्थिक आणि जाती आधारित करण्यात आलेल्या जनगणनेचा अहवाल 3 जुलै 2015 रोजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनीArun Jetali प्रसिद्ध केला.
  • देशभरातील 640 जिल्ह्यांत झालेल्या या जनगणनेसाठी कागदाचा वापर झालेला नाही.
  • तब्बल 6.4 लाख इलेक्ट्रॉनिक उपकरणांद्वारे ही जनगणना पूर्ण करण्यात आली आहे.
  • या अहवालातील जाती आधारित आकडेवारी अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.
  • सध्या केवळ ग्रामीण विकास मंत्रालयाअंतर्गत येणारी आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. ब्रिटिशांची सत्ता असताना 1931 मध्ये अखेरची जातनिहाय जनगणना झाली होती.
  • केंद्र आणि राज्य सरकारांना पुढील धोरण ठरविण्यासाठी या जनगणनेतील निष्कर्षांचा मोठा उपयोग होणार आहे.

एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक निलंबित :

  • एन्काउंटर स्पेशालिस्ट व धाडसी पोलिस अधिकारी म्हणून ख्याती असलेले दया नायक यांना वर्षभरापूर्वी नागपूर येथे सेवेत हजर होण्याचे आदेश दिले होते, परंतुDya Nayak नायक हे येथे रूजू न झाल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
  • दया नायक यांना बेहिशेबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी 2006 मध्ये निलंबित करण्यात आले होते. या प्रकरणाच्या सुनावणीत 2012 मध्ये दया नायक यांना पुन्हा कामावर रूजू करून घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. परंतु, दया नायक हे वर्षभरापासून नागपुरात कामावर रूजू न झाल्याने त्यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे.
  • दया नायक यांनी सेवेत असताना 80हून अधिक एन्काउंटर केल्याचे सांगण्यात येते. अंडरवर्ल्डपासून नागपूरमध्ये आपल्याला धोका असल्याचे कारण यापूर्वी दया नायक यांनी दिले होते.

दिनविशेष :

  • 5 जुलैजलसंपत्ती दिन

    Jalasampatti Day

  • 1993 – किर्लोस्कर नाटक मंडळीतील नट बोडस आणि गोविंदराव टेंबे यांच्या भागीदारीत बालगंधर्वांनी गंधर्व नाटक मंडळाची स्थापना केली.
  • 1975 – भारतातील देवी या रोगाचे समूळ उच्चाटन झाले असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले.
  • 2000 – ओरिसा येथील बालासोरच्या चांदिपूर येथील समुद्रावर ‘आकाश’ या भारतीय बनावटीच्या मिसाईलची यशस्वी चाचणी घेण्यात आली.

सहाय्यक पूर्वपरीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना mpscworld.com कडून All The Best

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.