चालू घडामोडी (5 जून 2017)
आसीसी स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध भारताचा मोठा विजय :
- फलंदाजांनी सुरेख कामगिरी केल्यानंतर गत चॅम्पियन भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत पावसाचा तीनदा व्यत्यय आलेल्या ब गटाच्या एकतर्फी लढतीत पाकिस्तानचा डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे 124 धावांनी पराभव करताना विजयी प्रारंभ केला.
- डकवर्थ लुईस नियमानुसार 41 षटकांत 289 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 33.4 षटकांत 164 धावाच करू शकला.
- भारताकडून उमेश यादवने 30 धावांत 3 गडी बाद केले. रवींद्र जडेजा, हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
- तसेच चॅम्पियन्स ट्रॉफीतील चार सामन्यांत पाकिस्तानविरुद्धचा हा भारताचा दुसरा विजय आहे.
साईप्रणितने जिंकली थायलंड ओपन ग्रांप्री स्पर्धा :
- भारताच्या बी. साईप्रणितने चुरशीच्या सामन्यात इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्तीला तीन सेटमध्ये हरवत थायलंड ओपन ग्रां प्री गोल्ड करंडक बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावले. एक तास 11 मिनिटे चाललेल्या या खेळात साईप्रणितने 17-21, 21-18, 21-19 असा विजय मिळवला.
- प्रणितचे हे पहिलेच ग्रांपी विजेतेपद आहे. अत्यंत अटितटीच्या सामन्यात साईप्रणितने पहिला सेट 16-14 अशी आघाडी मिळवूनही गमावल्यानंतर पुढील दोन्ही सेटमध्ये आक्रमक खेळ करत सामन्यात विजय मिळवला.
- थायलंड ओपनमध्ये मिळवलेल्या विजयानंतर साईप्रणितने 2017 मधील घोडदौड कायम राखली आहे. एप्रिल महिन्यात झालेल्या सिंगापूर सुपर सीरिजमध्ये साईप्रणितने किदंबी श्रीकांतला हरवून पहिले सुपर सीरिज विजेतेपद पटकावले होते.
मॉस्कोतील अंडरग्राउंड मेट्रो स्टेशन :
- मॉस्को हे आहे रशियातील सर्वांत मोठे अंडरग्राउंड रेल्वे स्टेशन. मॉस्कोतील या स्टेशनची भव्यता डोळे दिपवणारी आहे.
- फ्री वाय-फायसह अनेक सुविधा या ठिकाणी आहेत. सोव्हियत युनियनचे प्रतीक म्हणून याची निर्मिती करण्यात आली होती.
- मेट्रोचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता येथे पर्यटनस्थळे तयार करण्यात आली आहेत. रशियन क्रांतीच्या प्रतिकृती या ठिकाणी पाहावयास मिळतात.
रोनाल्डो ठरला रिअल माद्रिद चॅम्पियन चषक विजेता :
- क्रिस्तियानो रोनाल्डोच्या दोन गोलच्या बळावर रिअल माद्रिदने चॅम्पियन्स लीग चषक पटकाविला. अंतिम सामन्यात त्यांनी युवेंटसचा 4-1 ने पराभव केला. या विजयाबरोबरच त्यांनी युरोपियन फुटबॉल क्लब लीगच्या चषकावर सलग दुसऱ्या वर्षी नाव कोरले. अशी कामगिरी करणारा तो एकमेव संघ ठरला.
- पोर्तुगालचा सुपरस्टार रोनाल्डो याने रिअल माद्रिद संघाला सुरुवातीलाच आघाडी मिळवून दिली होती. मात्र, मारिया मॅडजुकीचच्या गोलमुळे सामना बरोबरीवर आला. त्यानंतर कासेमीरो, रोनाल्डो आणि मार्की असेनसियो यांनी गोल नोंदवून रिअल माद्रिदला चार वर्षांत तिसऱ्यांदा चषक जिंकून दिला.
- तसेच चॅम्पियन्स लीगचे हे त्यांचे 12वे विजेतेपद आहे. चॅम्पियन्स लीगच्या चार वेळा विजेत्या संघाच्या रोनाल्डोने या स्पर्धेतील सलग पाचव्या सत्रात सर्वाधिक गोल नोंदवण्याचा विक्रम नावे केला.
दिनविशेष :
- 5 जून 1907 मध्ये स्वामीनारायण पंथाची स्थापना झाली.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोलंबिया विद्यापीठाने 5 जून 1952 मध्ये डॉक्टर ऑफ लॉ ही सन्मान पदवी दिली.
- 1967 पासून आठ वर्षे वाहतूकीसाठी बंद असलेला ‘सुवेझ कालवा’ 5 जून 1975 मध्ये पुन्हा आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
- सन 1972 पासून 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून पाळला जातो.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा