चालू घडामोडी (5 ऑक्टोबर 2016)
संगीत नाटक अकादमी पुरस्कार गौरव :
- ख्यातनाम संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, गझल गायक भूपिंदर सिंग आणि भरतनाट्यम् नर्तक सी.व्ही. चंद्रशेखर यांच्यासह कला, नृत्य, संगीत, नाट्य क्षेत्रातील इतर मान्यवरांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते (दि.4) संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले.
- टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री हिमानी शिवपुरी, सत्त्रिया नृत्यांगना शारोदी सैकिया, कव्वाल मोहंमद सईद साबरी जयपुरी यांनाही 2015 चे संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले.
- राष्ट्रपती भवनात हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. चंद्रशेखर हे एकमेव फेलोशिप मिळविणारे कलाकार आहेत.
- सितारवादक कार्तिक कुमार, सरोदवादक ब्रिज नारायण, पंजाबी नाट्य दिग्दर्शक राणी बलबीर कौर, अभिनेता मनोज जोशी, नाट्यलेखक नंद किशोर आचार्य, दिग्दर्शक परवेज अख्तर, मुश्ताक खान, डिझायनर प्रदीप मुळ्ये आणि सरोजिनी यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.
राज्यसभेवर रूपा गांगुली यांची नियुक्ती :
- अभिनेत्री व भाजपच्या नेत्या रूपा गांगुली यांची (दि.4) राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे.
- दूरदर्शनवरील महाभारत मालिकेत गांगुली यांनी द्रौपदीची भूमिका साकारली होती.
- क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी रूपा गांगुली यांची नियुक्ती केली आहे.
- पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत रूपा गांगुली भाजपच्या उमेदवार होत्या. मात्र, त्या पराभूत झाल्या होत्या.
- तसेच रूपा गांगुली यांचे नाव 1988 मधील महाभारतातील भूमिकेमुळे घराघरांत पोचले.
गॅस अनुदानसाठी आधार कार्ड आवश्यक :
- 1 डिसेंबरपासून ‘आधार’ कार्ड असल्याशिवाय कोणालाही स्वयंपाकाच्या गॅसचे अनुदान न देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून गॅस ग्राहकांना ‘आधार’साठी नोंदणी करण्याची दोन महिन्यांची शेवटची मुदत दिली आहे.
- सरकारी योजनांचे लाभ आणि अनुदान यासाठी ‘आधार’चा वापर करण्यासंबंधीचा कायदा 16 सप्टेंबरपासून लागू करण्यात आला असून त्यानुसार तेल मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.
- तसेच हा निर्णय आसाम, मेघालय आणि जम्मू-काश्मीर ही राज्ये वगळून देशभर लागू होईल.
- सध्या सरकार घरगुती गॅस ग्राहकास वर्षाला स्वयंपाकाच्या गॅसचे 12 सिलिंडर अनुदानित दरात देते.
- अनुदानाची रक्कम ग्राहकाच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते व त्याने गॅस सिलिंडर घरी आल्यावर त्याची पूर्ण किंमत द्यायची असते.
- नव्या आदेशानुसार ज्या गॅस ग्राहकांनी अद्यापही ‘आधार’ कार्ड घेतलेले नाही त्यांना नोंदणी करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे.
रशियाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा :
- रशियाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा होत असून, तेलाच्या किमती वाढविल्याबद्दल आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) आभार मानत रशियाला आणखी सुधारणेला वाव असल्याचे सांगितले.
- रशियाचा जीडीपी 0.8 टक्क्यांनी घटला असला, तरी तो आवाक्यात येण्यास वेळ लागणार नाही.
- रशियाची सध्याची स्थिती अर्थव्यवस्थेच्या स्थिरतेची असल्याचेही ‘आयएमएफ’ने या वेळी नमूद केले.
- तेलाच्या घसरलेल्या किमतीनंतर रशियन बाजारात हडकंप माजला होता.
- मात्र त्यानंतर विविध घटकांमध्ये सुधारणा करत रशियाने आपली आर्थिक आघाडी परत मिळविल्याचेही ‘आयएमएफ’ कडून सांगण्यात आले आहे.
भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार 2016 :
- पदार्थांच्या उन्नत अवस्थांवर प्रकाश टाकणाऱ्या ब्रिटिश शास्त्रज्ञ डेव्हिड थुल्स, डंकन हाल्डेन आणि मायकेल कोस्टरलिट्स यांना 2016 चा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार विभागून देण्यात येणार आहे.
- वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या स्थिती धारण करतात. या स्थितींचा अभ्यास थुल्स, हाल्डेन व कोस्टरलिट्स यांनी केला. त्यांच्या संशोधनामुळे पदार्थांच्या स्थितींचे अनोखे विश्व जगासमोर आले, असे नोबेल पुरस्कार समितीने म्हटले आहे.
- सन्मानचिन्ह आणि आठ लाख स्वीडिश क्रोनर असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
- पुरस्काराच्या रकमेपैकी निम्मी रक्कम थुल्स यांना, तर उर्वरित रक्कम हाल्डेन व कोस्टरलिट्स यांना विभागून देण्यात येणार आहे.
- इलेक्ट्रॉनिक्स, सुपरकंडक्टर किंवा भविष्यातील पुंज संगणक यांच्यात ‘टोपोलॉजिकल मटेरिअल्स’चा वापर करता येऊ शकतो.
- तसेच यासाठी पदार्थ घनरूपात असताना त्यांचे गुणधर्म कसे ‘वर्तन’ करतात, याबाबतच्या संशोधनाची दारे खुली करण्याचे काम या तिघांच्या संशोधनातून झाले आहे.
- ताणासह वेगवेगळे बल काम करत असतानाही पदार्थांचे भौतिक गुणधर्म आणि दोन कणांतील अंतर कायम राहते, अशा अवस्थेतील पदार्थांचा अभ्यास ‘टोपोलॉजी’मध्ये केला जातो.
- तापमान मोठ्या प्रमाणात न वाढता टोपोलॉजिकल अवस्थेतील पदार्थांमधून ऊर्जेचे वहन होऊ शकते.
- भविष्यातील पुंज संगणकांसाठी असे पदार्थ अत्यंत उपयोगी ठरू शकतात.
- अत्यंत कमी तापमानाला अतिवाहकता (सुपरकंडक्टिव्हिटी) निर्माण केली जाऊ शकते आणि उच्च तापमानाला ती नष्ट होते, हे थुल्स, हाल्डेन आणि कोस्टरलिट्स यांच्या संशोधनामुळे स्पष्ट झाले आहे.
डेंगी आजारावरील औषधास 14 देशांत मान्यता :
- डेंगी आजारासंदर्भातील उपचारांसाठी संमत करण्यात आलेल्या एकमेव औषधाची निर्माती कंपनी असलेल्या सानोफी पास्टेउर या फ्रेंच कंपनीने या औषधास एकूण 14 देशांत मान्यता मिळाल्याची माहिती दिली आहे.
- इंडोनेशिया, थायलंड, सिंगापूर, मेक्सिको, फिलीपीन्स, ब्राझील, एल साल्व्हाडोर, कोस्टारिका, पॅराग्वे. ग्वाटेमाला, पेरु या देशांनी या औषधास मान्यता दिली आहे.
- ‘2020 पर्यंत मृत्युदरामध्ये 50 टक्क्यांची घट करण्याच्या जागतिक आरोग्य संघटनेचे ठेवलेल्या उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी नवे, परिणामकारक साधन या औषधाच्या माध्यमामधून मिळाले आहे,’ असे कंपनीतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनामध्ये जाहीर केले आहे.
दिनविशेष :
- 1932 : भारतीय क्रिकेट खेळाडू, माधव आपटे यांचा जन्मदिन.
- 1964 : भारतीय क्रिकेट खेळाडू, सरदिंदू मुखर्जी यांचा जन्मदिन.
- 1992 : परशुराम भवानराव पंत, भारतीय राजनैतिक मुत्सद्दी स्मृतीदिन.
- 2001 : थॉमस वॉटरफील्ड, ब्रिटिश-भारतीय साहित्यिक स्मृतीदिन.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा