Current Affairs of 6 August 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (6 ऑगस्ट 2015)

बांधकाममंत्री चर्चिल अल्माओ यांना अटक :

  • लुईस बर्गर लाचखोरी प्रकरणी गोव्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल अल्माओ यांना अटक करण्यात आली आहे.
  • गोव्यात चर्चेत असलेल्या लुईस बर्गर लाचखोरी प्रकरणात गोवा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चर्चिल अल्माओ यांना रात्री साडेदहाच्या सुमारास दक्षिण गोव्यातील अगासीम येथून अटक करण्यात आली आहे.
  • गोव्यातील पाईपलाईन प्रकल्पासाठी अमेरिकन कंपनी लुईस बर्गरने एका मंत्र्याला लाच दिल्याचा आरोप होता.
  • या प्रकरणात चर्चिल अल्माओ आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच नावही पुढे आले होते.

न्यायाधीशांच्या निवृत्तिवेतन लाभातील त्रुटी सरकारने केल्या दूर :

  • उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवृत्तिवेतन लाभातील त्रुटी सरकारने दूर केल्या आहेत.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला.
  • त्याचप्रमाणे भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या सरकारी दूरसंचार कंपनीच्या टॉवर्सची देशभरातील व्याप्ती पाहता या टॉवर्सची स्वतंत्र कंपनी तयार करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने तत्त्वतः मान्यता दिली.
  • तसेच निवृत्तिवेतनासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी आदेश दिला होता.
  • त्यानुसार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना निवृत्तिवेतनाचे लाभ देताना त्यांच्या दहा वर्षे वकिलीच्या अनुभवाचाही यापुढे विचार केला जाईल.
  • तसेच मंत्रिमंडळाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची आहे त्या स्वरूपात अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला.

सरकारची टॉवर्सची स्वतंत्र कंपनी स्थापण्याची तयारी :

  • “बीएसएनएल”च्या टॉवर्सची संख्या आणि त्यातून संभाव्य महसूलप्राप्तीचा अंदाज या आधारे सरकारने टॉवर्सची स्वतंत्र कंपनी स्थापण्याची तयारी चालविली आहे.
  • देशभरात “बीएसएनएल”चे 65 हजार टॉवर्स असून, या माध्यमातून सरकारी कंपनीला वार्षिक दोनशे कोटी रुपयांचा महसूल मिळतो.
  • मात्र टॉवर्सची स्वतंत्र कंपनी तयार केल्यानंतर हा महसूल दोन हजार कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो, असा दूरसंचार खात्याचा अंदाज आहे.
  • त्या पार्श्‍वभूमीवर या भावी कंपनीची रचना, मनुष्यबळ आणि आर्थिक गुंतवणूक याबाबत सुस्पष्टता यावी यासाठी दूरसंचार मंत्रालयाला आंतरमंत्रालयीन गट तयार करण्यास सांगण्यात आले आहे.
  • ही टॉवर कंपनीतील गुंतवणूक आठ ते दहा हजार कोटी रुपयांची असू शकते.

इलेक्‍ट्रिक ट्रॅफिक सिग्नलला 101 वर्षे पूर्ण :

  • जगभरातील वाहतुकीस शिस्तीचे वळण लावणाऱ्या इलेक्‍ट्रिक ट्रॅफिक सिग्नलला आज 101 वर्षे पूर्ण झाली.
  • नेटविश्‍वातील आघाडीचे सर्च इंजिन असणाऱ्या गुगलनेही आपल्या होमपेजवर अनोख्या पद्धतीने या ऐतिहासिक घटनेचे स्मरण केले आहे.
  • लिस्टर वायर या उटाह प्रांतातील सॉल्टलेक सिटी शहरातील पोलिसाने सर्वप्रथम 1912 मध्ये इलेक्‍ट्रिक ट्रॅफिक लाइटचा शोध लावला होता.
  • याच सिग्नलमध्ये सर्वप्रथम लाल-हिरव्या रंगाचा वापर करण्यात आला होता.
  • तसेच पुढे 5 ऑगस्ट 1914 मध्ये अमेरिकी ट्रॅफिक सिग्नल कंपनीने ओहियो प्रांतातील क्‍लेव्हलॅंडमध्ये “ईस्ट-105 स्ट्रीट अँड युक्‍लिड अव्हेन्यू” येथील चौकामध्ये सर्वप्रथम सिग्नल यंत्रणा
  • बसविली होती.
  • यामध्ये लाल आणि हिरव्या रंगाच्या लाइट्‌सच्या चार जोड्या होत्या तसेच त्याला विद्युत पुरवठा करण्याचे काम नियंत्रण कक्षात नेमण्यात आलेले कर्मचारी करत असत.

आरबीआयचे पतधोरण जाहीर :

  • रोख निधी गुणोत्तर (सीआरआर)4 टक्के
  • वैधानिक तरलता गुणोत्तर (एसएलआर)21.50 टक्के
  • रेपो दर7.25 टक्के
  • रिव्हर्स रेपो दर6.25 टक्के
  • बँक रेट8.25 टक्के
  • मार्जिनल स्टँडींग फॅसिलीटी8.25 टक्के

राष्ट्रीय हातमाग दिवस :

  • हातमागावर तयार होणाऱ्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी तसेच, या वस्तूंची मागणी वाढावी यासाठी केंद्र सरकारतर्फे 7 ऑगस्ट हा राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे.
  • या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडिया हँडलूम या ब्रँडचे अनावरण करणार आहेत.
  • या दिवशी 1905 मध्ये स्वदेशी चळवळ सुरू झाली होती.
  • त्याचे स्मरण म्हणून हा दिवस साजरा होणार असून याचा पहिला मोठा कार्यक्रम चेन्नईमध्ये होईल.

ओबामाज क्लीन पॉवर प्लॅन :

  • औष्णिक विद्युत केंद्रांमधून उत्सर्जित होणाऱ्या हरितगृह वायूंचे प्रमाण कमी करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी महत्त्वाकांक्षी धोरण जाहीर केले आहे.
  • ‘ओबामाज क्लीन पॉवर प्लॅन’ या नावाने हे धोरण ओळखण्यात येत आहे.
  • हवामानातील बदलावर पॅरिस येथे चर्चा होणार असून, त्या दृष्टीने वातावरणनिर्मिती करण्यासाठी अमेरिकेने हे पाऊल उचलल्याचे मानण्यात येते.
  • ‘अमेरिकेच्या वीज प्रकल्पांमधून 2030 पर्यंत कार्बनी वायूंचे प्रदूषण 32  टक्क्यांनी कमी करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे.
  • या धोरणामध्ये कार्बनी वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी पावले उचलण्याबरोबरच दरडोई उर्जेच्या वापराविषयीही विचार करण्यात आला आहे.
  • यामध्ये अपारंपरिक उर्जा आणि किमान खर्चात जास्त उर्जा देणाऱ्या यंत्रणांचा वापर करणाऱ्या राज्यांना जास्तीत जास्त सवलती देण्याचा उल्लेखही या धोरणामध्ये करण्यात आला आहे.

दिनविशेष :

  • 1945 : हिरोशिमा, नागासाकी या जपानच्या शहरावर अमेरिकेने पहिला परमाणुबॉब टाकला.

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (7 ऑगस्ट 2015)

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

2 years ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

2 years ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago