Current Affairs of 6 December 2015 For MPSC Exams
चालू घडामोडी (6 डिसेंबर 2015)
‘व्हॉट्सऍप’च्या आपल्या युजर्ससाठी काही नव्या इमोजी सादर :
- वेगवान आणि साधे-सोपे मेसेंजर म्हणून लोकप्रिय ठरलेले ‘व्हॉट्सऍप’ आता आपल्या युजर्ससाठी काही नव्या इमोजी सादर करत आहे.
- ऑनलाइन संवादादरम्यान एखादी वस्तू, स्थळ, हवामानाची स्थिती, चेहऱ्यावरील हावभाव आदी बाबी प्रदर्शित करणारे चित्र म्हणजे “इमोजी”.
- शब्दांऐवजी चेहऱ्यावरील भावना प्रदर्शित करण्यासाठी त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अशा भावना दाखवण्याचा हा प्रभावी आणि लोकप्रिय मार्ग समजला जातो.
- तसेच “व्हॉट्सऍप’ने आपल्या नव्या आवृत्तीमध्ये (2.12.372) नव्या इमोजी सादर केल्या आहेत. त्यामध्ये सध्यापेक्षा आणखी नव्या आणि आकर्षक इमोजीज देण्यात आल्या आहेत.
- त्यामध्ये फिरणारे डोळे, काल्पनिक घोडा, पॉपकॉर्न बॉक्स आदी इमोजींचा समावेश आहे.
- नव्या अपडेटमध्ये इमोजीच्या प्रकारानुसार विभागही तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये फूड, स्पोर्टस, ऍक्टिव्हिटीज् असे काही विभाग करण्यात आले आहेत. ज्यांनी “व्हॉट्सऍप’चे नवे व्हर्जन अपडेट केलेले नाही,त्यांना जर अशा इमोजी मिळाल्या तर त्या दिसू शकणार नाहीत.
Must Read (नक्की वाचा):
सुषमा स्वराज 8 डिसेंबरला पाकिस्तानला रवाना होणार :
- इस्लामाबादला होणाऱ्या “हार्ट ऑफ एशिया सिक्युरिटी” या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज 8 डिसेंबरला पाकिस्तानला रवाना होणार आहे.
- या वेळी त्यांच्याबरोबर परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव एस. जयशंकर हे असतील.या परिषदेच्या निमित्ताने पाकिस्तानला गेल्यावर स्वराज या पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि पाकिस्तानचे परराष्ट्र खात्याचे सल्लागार सरताज अझीज यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
कोकण रेल्वेवर एसी डबलडेकर एक्स्प्रेस सुरू होणार :
- कोकण रेल्वेवर एसी डबलडेकर एक्स्प्रेस आजपासून सुरू होणार आहे.
- रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते उद्या दुपारी साडेतीन वाजता मडगाव येथे या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात येईल.
जागतिक तापमान वाढीचा कराराचा मसुदा संयुक्त राष्ट्रसंघाने स्वीकारला :
- जागतिक तापमान वाढीपासून मानवजातीचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक असलेल्या कराराचा मसुदा संयुक्त राष्ट्रसंघाने स्वीकारला.
- त्यामुळे याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर तोडगा निघण्याची आशा निर्माण झाली आहे.
- ऊर्जेसाठी कोळशावरील अवलंबित्व कमी करणे, हरितवायूंचे उत्सर्जन कमी करणे अशी प्रमुख उद्दिष्टे या मसुद्यात मांडण्यात आली आहेत.
- तब्बल 150 हून अधिक देशांनी या मसुद्यासाठी आग्रह धरल्याने अखेर तो स्वीकारण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची स्वाक्षरी लंडनमधील स्मारकात लवकरच झळकणार :
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 115 वर्षांपूर्वी प्राथमिक शाळेत प्रवेश घेताना मोडी लिपीत केलेली स्वाक्षरी लंडनमध्ये होणाऱ्या त्यांच्या स्मारकात लवकरच झळकणार आहे.
- दि. 7 नोव्हेंबर 1900 रोजी बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा हायस्कूल (सध्याचे छ. प्रतापसिंह हायस्कूल) येथे प्रवेश घेतेवेळी मोडी लिपीत केलेली स्वाक्षरी 1 हजार 114व्या क्रमांकावर शाळेच्या रजिस्टरला आजही पाहायला मिळते.
- ही नोंद आज अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. याचे कारण, या स्वाक्षरीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा केवळ शाळाप्रवेशच झाला नाही, तर ती एक युगांतराची सुरुवात होती.
- ज्या स्वाक्षरीने डॉ. आंबेडकरांचा ज्ञानाच्या अवकाशामध्ये प्रवेश झाला होता, ती स्वाक्षरी आता केवळ साताऱ्यापुरती मर्यादित राहिली नसून, सातासमुद्रापार लंडनला निघाली आहे.
देशातील शेतकऱ्यांना भूआरोग्यपत्रे देण्याची येतील :
- जमीन अधिकाधिक कसदार करण्यास सरकार बांधील असल्याचे अधोरेखित करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, शनिवारपासून देशातील शेतकऱ्यांना भूआरोग्यपत्रे (सॉइल हेल्थ कार्ड) देण्याची येतील, असे जाहीर केले.
- जागतिक भूदिनानिमित्त जमीन अधिकाधिक कसदार करण्याच्या आमच्या बांधीलकीशी ठाम असल्याचा निर्धार करू या, भूआरोग्य उत्तम असल्यास शेतकऱ्यांना अधिक धन मिळेल, असे मोदी यांनी ट्वीट केले आहे.
- शनिवारपासून यासाठी देशव्यापी पुढाकार घेण्यात येत असून, शेतकऱ्यांना भूआरोग्यपत्रे देण्यात येणार आहेत.
- भूआरोग्य सुधारावे यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचा एक भाग म्हणून भूआरोग्यपत्रे देण्यात येणार आहेत आणि जमिनीशी निगडित प्रश्नांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे, असेही ते म्हणाले.
- गेल्या फेब्रुवारी महिन्यात मोदी यांनी राजस्थानमधील सुरतगड येथे ही योजना सुरू केली. जमिनीच्या खालावलेल्या दर्जाला आळा घालणे आणि शेतमालाचे उत्पादन वाढविणे हे त्यामागील उद्दिष्ट होते. देशातील सर्वच्या सर्व म्हणजे 14.5 कोटी शेतकऱ्यांना पुढील तीन वर्षांत भूआरोग्यपत्रे दिली जाणार आहेत.