Current Affairs (चालू घडामोडी) of 6 January 2015 For MPSC Exams

अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | जमशेदजी टाटा यांच्या सन्मानार्थ नाणी चलनात आणणार |
2. | ‘लोकसत्ता’चे अभिजित घोरपडे यांना ‘वसुंधरा इको जर्नालिस्ट’ पुरस्कार |
3. | विकास महाडिक यांना राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कार |
4. | सरिता पदकी यांचे निधन |
5. | नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी अरविंद पानगढिया |
6. | दिनविशेष |
जमशेदजी टाटा यांच्या सन्मानार्थ नाणी चलनात आणणार :
- भारतीय उद्योगक्षेत्रात मानाचे स्थान असणार्या टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांच्या 175व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारने त्यांची मुद्रा असणारी नाणी चलनात आणण्याचा निर्णय घेतला आहे.
- अशाप्रकारे पहिल्यांदाच चलनी नाण्यांवर एखाद्या उद्योगपतीची मुद्रा छापण्यात येणार आहे.
- ‘मेक इन इंडिया‘ अभियानातंर्गत देशातील उद्योगपतींना प्रेरणा मिळावी, असा उद्देशही साध्य करण्याचा प्रयत्न सरकार या माध्यमातून करणार आहे.
- 6 जानेवारी रोजी पंतप्रधान निवासस्थानी या नाण्यांना प्रकाशित करण्यात येणार आहे.
- आतापर्यंत स्वातंत्र्यसैनिक, शास्त्रज्ञ, एखादी संस्था किवा घटनेच्या स्मरणार्थ सरकारने चलनी नाणी बाजारात आणली आहेत.
‘लोकसत्ता’चे अभिजित घोरपडे यांना ‘वसुंधरा इको जर्नालिस्ट’ पुरस्कार :
- ‘लोकसत्ता’चे वरिष्ठ सहसंपादक अभिजित घोरपडे यांना ‘वसुंधरा इको जर्नालिस्ट‘ सन्मान जाहीर झाला.
- पर्यावरण, पाणी, वातावरणातील बदल आणि निसर्गसंवर्धन आदी विषयांवरील सातत्यपूर्ण लेखन आणि पर्यावरण जागृतीसाठी पूरक काम केल्यामुळे घोरपडे यांना हा पुरस्कार करण्यात येणार आहे.
- नववा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या 16 ते 23 जानेवारी दरम्यान पुण्यात होणार आहे.
- या वर्षीचा यंदाचा महोत्सव विषय ‘शून्य कचरा : सुरवात स्वतःपासून‘हा असणार आहे.
विकास महाडिक यांना राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कार :
- महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी यांच्या वतीने कोकण विभागासाठी दरवर्षी देण्यात येणारा ‘दर्पण’ पुरस्कार या वर्षी विकास महाडिक यांना जाहीर झाला.
- 6 जानेवारी 88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात देण्यात येणार आहे.
सरिता पदकी यांचे निधन :
- ज्येष्ठ कवयित्री, कथालेखिका आणि बालसाहित्यकार सरिता पदकी (वय 85) यांचे वृद्धापकाळाने अमेरिकेमध्ये निधन झाले.
नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी अरविंद पानगढिया :
- योजना आयोग बरखास्त करून स्थापन करण्यात आलेल्या नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष म्हणून अरविंद पानगढिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- तसेच अर्थतज्ज्ञ बिबेक देबरॉय आणि डिआरडिओचे माजी प्रमुख व्ही.के.सारस्वत यांना पंतप्रधान आयोगाचे पूर्णवेळ सदस्य नियुक्त केले आहे.
- केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, अरुण जेटली, सुरेश प्रभू, व राधामोहन सिंग यांना आयोगाचे पदसिद्ध सदस्य म्हणून नेमण्यात आले आहे.
- नितिन गडकरी, स्मृती इराणी व थावरचंद गहलोट हे विशेष निमंत्रक म्हणून काम पहातील.
दिनविशेष :
- 6 जानेवारी – पत्रकार दिन
1664 – मराठी सैन्य सुरतेत शिरले.
- 1832 – बाळशास्र्यी जांभेकर संपादित ‘दर्पण‘चा पहिला अंक मुंबईत प्रसिद्ध झाला.
- 1924 – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जन्मठेपेतून सुटका.