चालू घडामोडी (6 जानेवारी 2016)
सुवर्णपदकाची मानकरी :
- “अखिल भारतीय सांस्कृतिक संघ‘ आणि “ग्लोबल काऊन्सिल ऑफ आर्ट अँड कल्चर‘तर्फे थायलंडमधील बॅंकॉक येथे झालेल्या पाचव्या “ग्लोबल कल्चरल ऑलिंपियाड‘मध्ये शास्त्रीय गीतगायन स्पर्धेत ज्युनिअर गटांत ठाण्यातील 12 वर्षांची अदिती मराठे सुवर्णपदकाची मानकरी ठरली आहे.
- बॅंकॉकमध्ये 28 व 29 डिसेंबरदरम्यान ही स्पर्धा झाली. त्यात 12 ते 16 वयाच्या ज्युनियर गटात ती सहभागी झाली होती.
एक हजार धावांचा विश्वविक्रम :
- सुमारे तीन वर्षे शालेय क्रिकेटपासून दूर असलेल्या प्रणव धनावडे याने एच. टी. भंडारी आंतरशालेय स्पर्धेत पहिल्यांदा शतकी पल्ला करताना थेट एक हजार धावांचा विश्वविक्रम केला.
- धावा करत गेलो, विक्रम घडत गेला, असे साधेसोपे गणित प्रणवने मांडले.
- क्रिकेटच्या मैदनावरील त्याच्या या हजारी कामगिरीने अवघे क्रिकेटविश्व थक्क झाले आहे.
निमलष्करी दलांत कॉन्स्टेबल पदासाठीच्या 33 टक्के जागा :
- देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम करणाऱ्या केंद्रीय राखीव पोलिस दल आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल या दोन्ही निमलष्करी दलांत कॉन्स्टेबल पदासाठीच्या 33 टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या जाणार असून, सीमा सुरक्षा दल, सशस्त्र सीमा दल आणि भारत- तिबेट सीमा पोलिस दलामध्ये महिलांचा वाटा 15 टक्के असणार आहे.
- यामुळे देशातील संरक्षण यंत्रणेत खऱ्या अर्थाने महिलासत्ता येणार असल्याचे बोलले जाते.
- केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांमधील महिलांचे प्रतिनिधित्व वाढविण्याच्या उद्देशाने गृहमंत्री राजनाथसिंह यांनी कॉन्स्टेबल पदाच्या 33 टक्के जागांवर महिला अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यास परवानगी दिली आहे.
- गृहमंत्रालयाच्या वतीने तसे अधिकृत पत्रकच प्रसिद्ध करण्यात आले आहे, यासाठी समान आरक्षण प्रणालीचा वापर केला जाईल.
कायदेक्षेत्रातील महत्त्वपूर्ण व्यक्ती कालवश :
- भारताचे माजी सरन्यायाधीश सरोश होमी कपाडिया यांचे रात्री उशिरा वयाच्या 68 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
- मुंबईतील केम्प्स कॉर्नर येथील ‘टॉवर ऑफ सायलेन्स’मध्ये सोमवारी संध्याकाळी त्यांच्यावर पारसी धर्मानुसार अंतिम संस्कार करण्यात आले.
जीवनगौरव पुरस्काराने सन्मान :
- कायम तिरंगा अभिमानाने फडकत राहावा यासाठी मी माझे योगदान दिले, असे उद्गार भारताचे माजी यष्टिरक्षक सय्यद किरमाणी यांनी काढले.
- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) वार्षिक बक्षीस समारंभ मुंबईत पार पडला.
- या वेळी किरमाणी यांचा प्रतिष्ठेचा सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला.
“एनएसजी’ने वापरली अत्याधुनिक शस्त्रे :
- हवाई दलाच्या पठाणकोट तळावर घुसलेल्या दहशतवाद्यांचा निःपात करण्यासाठी “नॅशनल सिक्युरिटी गार्ड‘च्या (एनएसजी) “ब्लॅक कॅट‘ कमांडोंना अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्याचा वापर करावा लागला.
- “एनएसजी‘चे युनिट हरियानातील मनेसर येथे असून, कोणत्याही क्षणी निघण्यासाठी हे दल सज्ज असते.
दिनविशेष :
- 1832 : बाळशास्त्री जांभेकरांनी मराठीतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ सुरु केले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा