Current Affairs (चालू घडामोडी) of 6 March 2015 For MPSC Exams
अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | पुन्हा येणार एक रुपयाची नोट |
2. | दानवेंचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा |
3. | इस्त्रोच्या दिशादर्शक उपग्रहाचे उड्डाण लांबणीवर |
4. | मुस्लिम आरक्षण आखेर रद्द |
पुन्हा येणार एक रुपयाची नोट :
- तब्बल 20 वर्षाच्या कालावधीनंतर सरकारने पुन्हा एक रुपयाची नोट चलनात आणण्याचा निर्णय घेतला आहे.
- भारतीय रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात परिपत्रक जारी केले असून, त्यामध्ये लवकरच एक रुपये मूल्याच्या नोटांची छपाई करणार असल्याचे म्हटले आहे.
- नोटवर अशोक स्तंभाचे चिन्ह असेल. मात्र, या अशोक स्तंभावर ‘सत्यमेव जयते’ या अक्षरांची छपाई करणार नसल्याचे रिझर्व्ह बँकेच्या पत्रकात म्हटले आहे.
- 9.7 बाय 6.6 सेंटीमीटर आकारात या नोटांची छपाई करण्यात येणार आहे.
दानवेंचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा :
- भाजपाचे अध्यक्ष खासदार रावसाहेब दानवेंनी केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत.
- दानवेंच्या जागी रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांचे नाव सुचवण्यात येत आहे.
इस्त्रोच्या दिशादर्शक उपग्रहाचे उड्डाण लांबणीवर :
- आयआयएनएसएस 1 डी या भारताच्या चौथ्या दिशादर्शक उपग्रहाचे उड्डाण 9 मार्चला होणार होणार होते, परंतु ते तांत्रिक कारणास्तव लांबणीवर टाकण्यात आले आहे.
मुस्लिम आरक्षण आखेर रद्द :
- मुस्लिमांना मिळालेले 5% आरक्षण आखेर रद्द करण्यात आले आहे.
- राज्य सरकारने याबाबद आदेश काढून मुस्लिम आरक्षण रद्द झाल्याचे शिक्कामोर्तब केले.