Current Affairs of 6 November 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (6 नोव्हेंबर 2015)

सुवर्ण बचत खाते, सुवर्ण रोखे या योजनांचा प्रारंभ :

  • सोन्याची आयात कमी करण्याबरोबरच घरांमध्ये वापरात नसलेले सोने अर्थव्यवस्थेत आणण्यासाठी केंद्राने जाहीर केलेल्या सुवर्ण बचत खाते (गोल्ड मॉनिटायझेशन), सुवर्ण रोखे या योजनांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रारंभ केला.
  • याचबरोबर अशोकचक्र आणि महात्मा गांधी यांची छबी असलेल्या सुवर्ण नाण्यांचेही पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
  • सुवर्ण योजनांतून महिलांना आर्थिक सुरक्षा लाभेल, असे पंतप्रधान म्हणाले. चालू वर्षात भारतात तब्बल 562 टन सोन्याची विक्री झाली.
  • भारताने सोने विक्रीमध्ये चीनलाही मागे टाकले असल्याचे मोदी यांनी सांगितले.
  • सुवर्ण बचत योजनेमध्ये ग्राहकांना सुवर्ण बचत खात्यावर अडीच टक्के व्याज मिळणार आहे.
  • तर सुवर्ण रोख्यांवर (गोल्ड बॉंड) 2.75 टक्के व्याजदर निश्‍चित करण्यात आला आहे.
  • 20 नोव्हेंबरपर्यंत गोल्ड बॉंड खरेदी करता येतील. सुवर्ण नाणी पाच आणि दहा ग्रॅममध्ये उपलब्ध असून, एमएमटीसीच्या देशभरातील 120 कार्यालयांमध्ये ही नाणी खरेदी करता येणार आहेत.

कॅनडाच्या मंत्रिमंडळात भारतीय वंशाच्या चार सदस्यांचा समावेश :

  • कॅनडाचे नवनिर्वाचित पंतप्रधान जस्टीन ट्रुड्यू यांनी आपल्या मंत्रिमंडळात भारतीय वंशाच्या चार सदस्यांचा समावेश केला आहे.
  • पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर ट्रुड्यू यांनी आपले मंत्रिमंडळ जाहीर केले.
  • कॅनडाच्या मंत्रिमंडळात प्रथमच इतक्‍या संख्येने भारतीय वंशाच्या नागरिकांचा समावेश झाला आहे.
  • महिला आणि पुरुषांना समान संधी देत 15 महिला आणि 15 पुरुषांना मंत्रिमंडळात स्थान दिले गेले आहे.
  • यामध्ये तीन पुरुष आणि एक महिला सदस्य भारतीय वंशाचे नागरिक आहेत.
  • कॅनडामध्ये नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये एकूण 19 भारतीय वंशाचे उमेदवार निवडून आले.
  • 1997 मध्ये हर्ब धालिवाल यांना प्रथम मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते.
  • कॅनडाच्या लष्करी सेवेतून निवृत्त झालेले आणि अनेक लष्करी सन्मान मिळविलेले हरजित सज्जन यांना कॅनडाचे संरक्षण मंत्रिपद देण्यात आले आहे.
  • त्यांच्याशिवाय बार्दिश छग्गर (लघू व्यापार आणि पर्यटन), अमरजित सोही (पायाभूत सुविधा आणि दळणवळण) आणि नवदीप बेन्स (विज्ञान आणि आर्थिक विकास) यांना मंत्रिपदे मिळाली आहेत.

लेखिका अरुंधती रॉय पुरस्कार परत करण्याचा निर्णय :

  • मानवाधिकार क्षेत्रातील सुप्रसिद्ध विचारवंत, लेखिका अरुंधती रॉय यांनीही देशातील वाढत्या असहिष्णुतेविरोधात सरकारला पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • रॉय यांना 1989 मध्ये सर्वोत्तम पटकथेकरिता मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार त्या परत करणार आहेत.

‘फेसबुक न्यूज’ हे नवीन अॅप्लिकेशन सादर करणार :

  • जगातील अग्रगण्य सोशल नेटवर्किंग संकेतस्थळ फेसबुक आठवडाभरात ‘फेसबुक न्यूज’ हे एक नवीन अॅप्लिकेशन सादर करणार आहे.

  • अनेक मीडिया ग्रुप्सने या अॅपला रिअल टाईम बातम्या देण्याचा करार केल्याचे सांगण्यात येत आहे.
  • वॉशिंग्टन पोस्ट, वोग यासारखे मोठे मीडिया ग्रुप या अॅपचे भागीदार आहेत.
  • युझर्सना कोणत्याही न्यूज पब्लिशर्सच्या न्यूज फीड आणि त्याच्याशी संबंधित नोटिफिकेशन सबस्क्राईब करण्याचा पर्याय उपलब्ध असेल.
  • ‘इन्स्टंट आर्टिकल सर्व्हिस’ ही सेवादेखील फेसबुकने सुरू केली आहे.
  • या सेवेतून वृत्तसंस्था आपल्या बातम्या थेट यामध्ये प्रसिद्धकरू शकणार आहेत.
  • यासाठीही जगभरातील मोठ्या पब्लिशर्सनी फेसबुकशी करार केला आहे.
  • ब्रेकिंग न्यूजसाठीही फेसबुक एक अॅप बनविणार आहे असे मागील महिन्यात सांगण्यात आले होते.

चीनमधील सिचुआन प्रांतातील संशोधन :

  • प्राणी मुके असतात पण तरी त्यांची आवाजाची वेगळी भाषा असते ती समजली तर त्यांचे सगळे विस्मयकारक जग आपल्यापुढे खुले होऊ शकते.
  • अलीकडेच चीनमध्ये आढळून येणाऱ्या पांडा या प्राण्याची भाषा उलगडण्यात वैज्ञानिकांना यश आले असून त्यामुळे एरवी बाहेरच्या जगापासून अलिप्त असलेल्या या प्राण्यांच्या खासगी जीवनावर त्यामुळे प्रकाश पडणार आहे.
  • द चायना कन्झर्वेशन अँड रीसर्च सेंटर फॉर द जायंट पांडा या चीनच्या सिचुआन प्रांतातील संस्थेने 2010 पासून पांडा भाषा प्रकल्प राबवला होता.
  • त्यांनी प्रथम पांडा या प्राण्याच्या प्रजनन केंद्रात जाऊन ध्वनिमुद्रण केले होते त्यात त्यांचे बछडे व प्रौढ पांडांचे आवाज होते.
  • अन्न सेवन, मीलन, सुश्रुषा, भांडण व इतर प्रसंगात त्यांचे आवाज टिपण्यात आले व त्यावरून त्यांच्या भाषेचा अर्थ लावण्यात आला असे या संस्थेचे प्रमुख झांग हेमिन यांनी सांगितले.
  • पांडांचे आवाज व कृती यांचेही ध्वनिमुद्रण करण्यात आले आहेत.
  • पांडांच्या भाषेचा उलगडा केला आहे व ती अतिशय आश्चर्यकारक भाषा आहे असे सांगून झांग म्हणाले की, पांडाचे बछडे बोलू शकत नाहीत पण ते गी-गी असा आवाज काढतात तेव्हा भूक लागल्याचे सांगत असतात, वॉ-वॉ असा आवाज करतात तेव्हा आपण दु:खी आहोत असे सांगत असतात. कू-कू असा आवाज करतात तेव्हा सुखात असल्याचे सांगतात.
  • प्रौढ पांडा हे मातेकडून भाषा शिकतात. गर्जना, भुंकण्यासाखा आवाज, ओरडणे, चित्कारणे यासारख्या आविष्कारातून ते संदेश देत असतात.
  • पांडाची आई पक्ष्याप्रमाणे आवाज काढत असेल तर ती बछडय़ांवर चिडली आहे असे समजावे.
  • जर ती जोराने भुंकण्याचा आवाज काढत असेल तर कुणीतरी अनाहुत जवळ आला आहे असे समजावे.
  • तसेच येथून चालते व्हा असा संदेश त्या अनाहुताला त्या देत असतात. पांडा हे प्रेमात असतात तेव्हा कोकराप्रमाणे नम्र असतात.
  • नर पांडा बा असा आवाज काढतात तेव्हा ते प्रणयाराधन करीत असतात. मादी पांडा त्याला पक्ष्यासारखा आवाज काढून प्रतिसाद देतात.

रशियाने सिरियाला विमानभेदी क्षेपणास्त्रे पाठवली :

  • रशियाकडून सिरियातील बंडखोरांच्या विरोधात करण्यात येत असलेल्या हवाई हल्ल्यांपासून संरक्षण करता यावे यासाठी रशियाने सिरियाला विमानभेदी क्षेपणास्त्रे पाठवली आहेत अशी माहिती रशियन हवाईदलाच्या अधिकाऱ्याने दिली.
  • रशियाने सप्टेंबरमध्ये सिरियाचे राष्ट्रपती बशर असाद यांच्या विनंतीवरून सिरियातील आयसिसच्या दहशतवाद्यांवर हवाईहल्ले करण्याचा निर्णय घेतला होता.
  • रशियाचा सिरियातील हस्तक्षेप केवळ हवाई हल्ल्यापुरताच मर्यादित असल्याचेही रशियन अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
  • कर्नल जनरल व्हिक्टर बोंडारेव्ह म्हणाले की, विमानभेदी क्षेपणास्त्रांमुळे रशियाच्या लढाऊ विमानांना मदतच होणार आहे.
  • आयसिस दहशतवाद्यांनी हल्ला केल्यास आणिबाणीच्या परिस्थितीत या क्षेपणास्त्रांमुळे रशियाला मदत मिळेल.
  • बोंडारेव्ह यांनी रशियाकडून पाठविण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांचा प्रकार स्पष्ट केला नाही.

दिनविशेष :

  • डॉमिनिकन प्रजासत्ताक, ताजिकीस्तान संविधान दिन
  • स्वीडन गुस्ताफस ऍडोल्फस दिन
  • 1844 : डॉमिनिकन प्रजासत्ताकने आपले पहिले संविधान अंगिकारले
  • 1860 : अब्राहम लिंकन अमेरिकेचा 16वा राष्ट्राध्यक्ष झाला
  • 1913 : दक्षिण आफ्रिकेत भारतीय वंशाच्या खाणकामगारांच्या मोर्चाचे नेतृत्त्व केल्याबद्दल महात्मा गांधींना अटक

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

2 years ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

2 years ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago