चालू घडामोडी (6 ऑक्टोबर 2016)
महाराष्ट्र पोलिस उपनिरीक्षक तुकडीचा दीक्षांत सोहळा :
- नाशिकमध्ये महाराष्ट्र पोलिस अकादमीत महाराष्ट्र पोलिस प्रशिक्षण प्रबोधिनी, पोलिस उपनिरीक्षक तुकडीचा दीक्षांत सोहळा (दि.5) पार पडला.
- प्रमुख मुद्दे –
- महाराष्ट्र पोलिस अकादमीत दीक्षांत समारंभ
- 114 वी तुकडी
- 237 उपनिरीक्षक पोलिस सेवेत दाखल
- यात 183 पुरुष तर 54 महिला अधिकारी
- पोलिस महासंचालक सतीश माथूर, एस जगन्नाथन, अकादमी संचालक नवल बजाज यांची प्रमुख उपस्थिती
- निशाण संचलन आणि परेड नंतर देण्यात आली शपथ
- पोलिस अधिकाऱ्यांची 114 वी तुकडी
- चाळीसगावचा कल्पेश चव्हाण सर्वोत्कृष्ठ कॅडेट
- अविनाश नडेगावकर सेकंड सर्वोत्कृष्ठ कॅडेट
- ऑलराऊंडर कॅडेट छाया पाटील
- 20 वर्षानंतर, जळगावचा कॅडेट ठरला सर्वोत्कृष्ठ
- राहुल शिंदे, अमोल चौधरी, संदीप काळे, अनिल वाघमोडे, रवींद्र खंडारे, संतोष राठोड, आकाश पवार, राहुल थवील, या कॅडेट्सचा विशेष गौरव.
कबड्डी वर्ल्डकपमध्ये पाककिस्तानला प्रवेश नाही :
- भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांत निर्माण झालेल्या कमालीच्या तणावाची छाया खेळाच्या मैदानावरही पडली असून, येत्या (दि.7) शुक्रवार पासून अहमदाबादमध्ये सुरू होणाऱ्या कबड्डीच्या विश्वचषक स्पर्धेतून पाकिस्तान संघाला वगळण्याच्या निर्णयाने ही स्पर्धा वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत.
- आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाचे अध्यक्ष देवराज चतुर्वेदी म्हणाले, ‘सध्याच्या तणावाच्या वातावरणात दोन्ही देशांच्या हितासाठी पाकला वगळण्यात येत आहे.’
- पाकिस्तान कबड्डी महासंघाचे सचिव राणा मुहम्मद सरवर म्हणाले की, ‘हा अन्याय आहे. तणावाचे कारण असलेल्या दोन्ही देशांचे संघ वगळायला हवेत.’
- 35 देशांमध्ये कबड्डी खेळली जात असली, तरी हा खेळ मूळचा भारतीय उपखंडातील आहे.
चीनने सुरू केल्या ‘5G’ दूरसंचार सेवेच्या चाचण्या :
- जगातील सर्वाधिक मोबाइल वापरकर्ते असलेल्या चीनने आपल्या 100 शहरांत ‘5जी’ दूरसंचार सेवेच्या चाचण्या सुरू केल्या आहेत.
- पुढील पिढीतील दूरसंचार सेवेत अग्रेसर राहण्यासाठी चीनने हे पाऊल उचलले आहे.
- हाँगकाँगमधील ‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’ या दैनिकाने या संबंधीचे वृत्त दिले आहे.
- 5जी दूरसंचार नेटवर्क 4जीच्या तुलनेत 20 पट अधिक गतिमान आहे, तसेच त्यात डाटा लॉस होण्याचे प्रमाणही अत्यल्प आहे.
- 5जीसोबत बहुअँटेना यंत्रणेचीही चाचणी घेतली जात आहे. एकाच वेळी अधिक वापकर्ते या यंत्रणेद्वारे हाताळता येऊ शकतात. त्यामुळे मोबाइल डाटा वापराची क्षमता वाढते.
- चीनच्या उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, जगातील सर्वांत मोठी 4जी बाजारपेठ असलेल्या चीनमध्ये 2015 च्या अखेरीस सध्या 1.3 अब्ज वापरकर्ते होते.
- 5जी नेटवर्कद्वारे 20 गिगाबाइट्स प्रति सेकंड इतकी गतिमान सेवा दिली जाऊ शकते.
- 4जीची गती 1 गिगाबाइट प्रति सेकंद इतकीच आहे. यावरून 5जीच्या गतीची कल्पना यावी. 4जीची लॅटन्सी 10 मिलीसेकंद आहे. 5जीची 1 मिलीसेकंद आहे.
- एखाद्या अॅपला क्लिक केल्यानंतर प्रत्युत्तर येण्यासाठी जो वेळ लागतो, त्याला लॅटन्सी असे म्हणतात.
- आंतरराष्ट्रीय पातळीवर अजून 5जीचे निकष ठरविण्यात आलेले नाहीत.
- संयुक्त राष्ट्रांचा भाग असलेल्या इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन्स युनियनच्या अपेक्षेनुसार, 5जीचे निकष ठरल्यानंतर 2020 मध्ये त्या संबंधीचे नेटवर्क उभारणी सुरू होऊ शकेल.
- 5जी तंत्रज्ञानास आयएमटी-2020 असेही म्हटले जाते.
एसबीआयचे अध्यक्ष अरूंधती भट्टाचार्य यांच्या कार्यकाळात वाढ :
- स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) अध्यक्षा अरूंधती भट्टाचार्य यांचा कार्यकाळ एक वर्षाने वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
- एसबीआयच्या अध्यक्षपदाची मुदत संपल्यानंतर कार्यकाळ वाढविण्यात आलेल्या अरुंधती भट्टाचार्य या पहिल्या अध्यक्षा आहेत.
- तसेच यापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही अध्यक्षांना मुदतीनंतर कार्यकाळ वाढवून मिळालेला नाही.
- 6 ऑक्टोबर 2016 रोजी भट्टाचार्य यांचा कार्यकाळ संपणार होता. मात्र आता 6 ऑक्टोबर 2017 पर्यंत त्या एसबीआयच्या प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळतील.
- जागतिक पातळीवरील धोरणानुसार स्टेट बँकेमध्ये सहयोगी बॅंकांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
- या विलीनीकरणाची जबाबदारी सुरळीत पार पाडावी, म्हणून सरकारकडून अरुंधती भट्टाचार्य यांचा कार्यकाळ वाढविण्यात आल्याची शक्यता आहे.
ब्राझील वकिलातीतर्फे भारतीय खेळाडूंचा सत्कार :
- रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले नाशिक जिल्ह्य़ातील नौकानयनपटू दत्तू भोकनळ आणि धावपटू कविता राऊत यांचा मुंबई येथे ब्राझील वकिलातीतर्फे आयोजित विशेष कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
- ब्राझीलच्या 194 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ताज पॅलेस हॉटेलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
- प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहचलेल्या दत्तू भोकनळ आणि कविता राऊत यांनी रिओ ऑलिम्पिकच्या निमित्ताने जगाला आपली वेगळी ओळख करून दिली.
- तसेच त्यांच्या या वैशिष्टय़ामुळे कार्यक्रमात कौन्सिल जनरल रोजीमर दा सिल्वा सुजानों यांच्या हस्ते दोघांना गौरविण्यात आले.
- या कार्यक्रमास ब्राझीलचे राजदूत टोवर दा सिल्वा नुमैस हे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा